ख्रिश्चन म्हणून पुनर्जन्म म्हणजे काय?प्रश्नः ख्रिश्चन म्हणून पुनर्जन्म म्हणजे काय?

उत्तरः
ख्रिश्चन म्हणून पुनर्जन्म म्हणजे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर देणारा बायबलमधील उत्कृष्ट उतारा म्हणजे जॉन ३:१-२१. प्रभू येशू एक प्रमुख फारीसी आणि सेन्हेद्रीनचा (यहुद्यांचा शासक) सदस्य निकोडेमसशी बोलत आहे. निकोडेमस रात्रीच्यावेळी येशूपाशी आला होता. त्याला येशूला प्रश्न विचारायचा होता.

निकोडेमसशी बोलतांना येशू म्हणाला, ‘’मी तुला सत्य सांगत आहे. जोपर्यंत पुनर्जन्म घेत नाही, तोपर्यंत कोणीही देवाचे राज्य पाहू शकत नाही.’’ ‘माणूस मोठा झाला असतांना पुनर्जन्म कसा घेऊ शकतो?’ निकोडेमसने विचारले. ‘खात्रीने, पुनर्जन्म घेण्यासाठी तो पुन्हा मातेच्या उदरात जाऊ शकत नाही ! येशू उत्तरला, ‘’मी तुला सत्य सांगत आहे, कोणीही तोपर्यंत देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही जोपर्यंत तो जल आणि आत्म्यापासून जन्म घेत नाही. शरीर शरीराला जन्म देते पण आत्मा आत्म्याला जन्म देतो. माझ्या सांगण्याचे तुला आश्चर्य वाटू नये, ‘तुला पुनर्जन्म घ्यावा लागेल’’ (जॉन ३:३-७).

‘‘पुनर्जन्म’’ ह्याचा शब्दशः अर्थ ‘‘वरून जन्म घेणे’’ असा होतो. निकोडेमसला खरोखरीच गरज होती. त्याला त्याच्या ह्रदयाचे परिवर्तन हवे होते-आत्मिक परिवर्तन. नवीन जन्म, पुनर्जन्म, ही भगवंताची कृती आहे जिथे श्रद्धावान माणसाला चिरंतन जीवन दिले जाते (२ कोरिन्थियन ५:१७; टाइटस ३:५; १ पीटर १:३; १ जॉन २:२९; ३:९; ४:७; ५:१-४,१८). जॉन १:१२,१३ दर्शविते की ‘‘पुनर्जन्म’’ म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावात विश्वास ठेवून ‘’भगवंताची बालके‘’ बनणे अशी संकल्पना होय.

तार्किकदृष्ट्या प्रश्न उपस्थित होतो, ‘’ माणसाला पुनर्जन्म घेण्याची आवश्यकता का आहे?’’ प्रेषित पॉल एफिसियन्स २:१ मध्ये म्हणतो, ‘’आणि तू जो आगळिक व पाप यांमध्ये मृत झाला होतास, ज्याला त्याने जिवंत केले...’’ (NKJV). प्रेषिताने रोमनांना रोमन ३:२३ मध्ये लिहिले, ‘’सर्वांनीच पाप केले असून भगवंताच्या कीर्तीस कमी पडलो आहोत.’’ त्यामुळे, माणसाला त्याच्या पापांच्या क्षमेसाठी आणि भगवंताशी नाते निर्माण करण्यासाठी पुनर्जन्म घेण्याची आवश्यकता आहे.

ते कसे शक्य आहे? एफिसियन्स २:८-९ सांगते, ‘’श्रद्धेमुळे-कृपादृष्टीने तुम्ही वाचला आहात, आणि हे तुम्हांमुळे नाही, ही भगवंताची देणगी आहे-कामामुळे नाही, म्हणून कोणी बढाई मारू नये.’’ जेव्हा कोणास ‘’वाचविले आहे,’’ त्याचा / तिचा पुनर्जन्म झाला आहे, आत्मिक पुनरुज्जीवन, आणि आता नवीन जन्माच्या अधिकारामुळे तो भगवंताचे बालक झाले आहे. येशू ख्रिस्त, ज्याने क्रूसावर बलिदान देतांना पापांसाठी दंड भरला, त्याच्यामध्ये विश्वास बाळगणे म्हणजेच आत्मिकदृष्ट्या ‘’पुनर्जन्म’’ घेणे होय. ‘’त्यामुळे, जर कोणी ख्रिस्तामध्ये वसत असेल, तर तो नवीन निर्मिती आहे: जुने नाश पावले आहे, नवीन आले आहे !’’ (२ कोरिन्थियन्स ५:१७).

जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये तुमचा तारणहार म्हणून कधीच विश्वास ठेवला नसेल तर तो तुमच्या ह्रदयाशी बोलतो ही पवित्र आत्म्याची सूचना तुम्ही विचारात घ्याल? तुम्हाला पुनर्जन्म घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही पश्चात्तापाची प्रार्थना म्हणून आज ख्रिस्तामध्ये नवीन निर्मिती होणार? ‘’अजून त्या सर्वांना, ज्यांनी त्याचा स्वीकार केला, ज्यांनी त्याच्या नावात विश्वास ठेवला, त्याने भगवंताची बालके होण्याचा अधिकार दिला-निसर्गनियमाने जन्मलेली बालके नाही, माणसाच्या निर्णयाने किंवा पतीच्या इच्छेनेसुद्धा नाही, पण भगवंताच्या इच्छेने जन्मलेली बालके’’ (जॉन १:१२-१३).

जर तुम्हाला येशू ख्रिस्त तुमचा तारणहार म्हणून मान्य करावयाचे असेल आणि पुनर्जन्म प्राप्त करावयाचा असेल, तर इथे प्रार्थनेचा नमुना आहे. लक्षात ठेवा, ही किंवा अन्य कोणतीही प्रार्थना म्हटल्याने तुमचे रक्षण होणार नाही. केवळ येशू ख्रिस्तामध्ये श्रद्धा ठेवल्यानेच तुमचे पापांपासून रक्षण होणार आहे. ही प्रार्थना म्हणजे केवळ भगवंतामध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करण्याचा आणि तुम्हाला मोक्ष देण्याबद्दल त्याला धन्यवाद देण्याचा मार्ग आहे. ‘’भगवंता, मला माहित आहे मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे आणि शिक्षेस पात्र आहे. पण मला पात्र असलेली शिक्षा येशू ख्रिस्ताने भोगली, जेणेकरून त्याच्यावरील श्रद्धेतून मला क्षमा मिळावी. मी मोक्षाबद्दल तुझ्यामध्ये माझी श्रद्धा ठेवतो. तुझी विलक्षण कृपादृष्टी आणि क्षमाशीलता-चिरंतन जीवनाची देणगी यासाठी तुला धन्यवाद ! आमेन !’’

जे काही तुम्ही इथे वाचले आहे त्याचा तुम्ही ख्राईस्ट साठी निर्णय घेतला आहे का? जर तसे, असेल तर "मी आज ख्राईस्टला स्वीकारले आहे" हे बटण दाबा.भाषा ‘होम पेज’ कडे परत याख्रिश्चन म्हणून पुनर्जन्म म्हणजे काय?