settings icon
share icon
प्रश्नः

आपणास सार्वकालीक जीवन मिळाले आहे का?

उत्तरः


सर्वकालीक जीवन प्राप्तीचा मार्ग् आम्हाला पवित्र शास्त्र स्पष्टकरते पहिल्यांदा हे जानून घेणे गरजेचे आहे.की, आम्ही सर्वानी देवा विरुध्द पाप केले आहे. “सर्वानी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत” (रोम 3:23) आम्ही सर्वानी पाप कृत्य करुन देवाला क्रोधीत केले त्यामुळे आम्हाला सार्वकालीक नरकाच्या शिक्षसेस आम्हाला पात्र ठविण्यात आले होते “पापाचे वेतन मरण आहे,पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशु ख्रिस्तामध्ये सर्वाकालचे जीवन आहे” ( रोम 6:23)

प्रभु येशु हा पापविरहित होता (I पेत्र 2:22) देवाचा सार्वकालीक पुत्र हा मनुष्य बनला (योहान 1:1 ,14) व तो आमच्या पापाच्या बदल्यात मरण पावला “देवाने त्याचा पूत्र जगात आमच्यासाठी पाठवून त्याचे प्रेम दाखविले जेव्हा आम्ही पापी होतो.तेव्हा प्रभु येशु आमच्या पापासाठी मरण पावला (रोम 5:8) येशु ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला (योहान 19:31-42) ज्या शिक्षेस आम्ही पात्र होतो ती त्याने स्वतावर घेतली (II करिथ 5:21) तिसऱ्या दिवशी मरणातून उठला (I करिथ15:1-4) त्यांने मृत्युवर व पापावर विजय मिळविला “त्यांने आपल्या महादयेनूसार आपल्याला मरणातून येशु ख्रिस्ताच्या उठविण्या द्वारे पुन्हा जन्म दिला. (पहिले पेत्र 1:3)

विश्वासाच्या द्वारे येशु ख्रिस्ता विषयी आपले मन बदले पाहीजे- तो कोण आहे तारणासाठी त्याने काय केले. व का केले (प्रेषीत 3:19) येशु ख्रिस्ताच्या पापासाठी मरण पावला असा आम्ही जर विश्वास ठेवीतो तर तो आमच्या पापाची क्षमा करुन सार्वकालीक जीवनाचे दान देतो. “देवाने जगावर येवढी प्रीती केली की त्याने आपला एकूलता एक पुत्र दिला अशा साठी की ,जो कोणी त्याजवर विश्वास ठेवीता त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे” (योहान 3:16) “ जर तू आपल्या मुखाने असे कबुल करशील येशु हा प्रभु आहे, अंतकरणापासून असा विश्वास धरशील की, देवाने त्याला मेलेल्यातून उठविले तर तुझे तारण होईल” (रोम 10:09) जर आम्ही असा विश्वास करतो की, येशु ख्रिस्ताने वधस्तभावर पूर्ण कार्य केले आहे. तर आम्हास सार्वकालीक जीवन प्राप्त होते. व हाच मार्ग सार्वकालीक जीवनासाठी आहे.” तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे. आणि हे तुच्या हातून झाले नाही तर हे देवाचे दान आहे. कोणही आढयता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही” (इफिस 2:8-10)

जर आपणाला वाटते की, येशु ख्रिस्ताला वैक्तीक तारणरा म्हणून स्विकार करावा.तर या ठिकाणी एक प्रार्थना आहे. लक्षात ठेवा फक्त प्रार्थना म्हटल्याने दुसऱ्याने प्रार्थना करुन घेतल्याने तुमचे तारण होत नाही. तुमचे तारण येशुववर विश्वास ठेवून की, तो आमच्या पापासाठी मरण पावला असा विश्वास ठेवल्यानेच तारण होते. ही प्रार्थना देवावर आमचा विश्वास प्रगट करण्यासाठी व दिलेल्या तारणाच्या दाना बदल आभार मान्यासाठी मार्ग आहे.” देवा मला माहित आहे. मी तुज विरुध्द पाप केले आहे. त्या पापा बद्दल माला शिक्षा व्हायला पाहिजे होती परंतु तुझा पुत्र येशु ख्रिस्त याने ती स्वतावर घेवून माझ्या पापाची क्षमा केली व सार्वकालीक जीवनाचे दान तारण दिले. त्या बद्दल उपकार मानतो! “आमेन”

जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आपणास सार्वकालीक जीवन मिळाले आहे का?
© Copyright Got Questions Ministries