आत्ताच मी माझा विश्वास जिझसवर ठेवला आहे… आता पुढे काय?आत्ताच मी माझा विश्वास जिझसवर ठेवला आहे… आता पुढे काय?

अभिनंदन ! तुम्ही तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेतला आहे. कदाचित तुम्ही विचारात असाल “आता काय? मी माझा प्रवास परमेश्वरा बरोबर कसा सुरू करणार आहे?” बायबल मधील पुढील पाच पाय-या तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुमच्या प्रवासात तुम्हाला प्रश्न पडले असेल तर कृपया www.GotQuestions.org/Marathi या संकेत स्थळाला भेट द्या.

1. तुम्हाला मुक्ती संपूर्णपणे कळली आहे याची खात्री करा.

जोन ५.१३ आम्हाला सांगतो की मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहीत आहे कारण तुम्ही जिझस, देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला आहे. ज्यामुळे तुम्ही शाश्वत जीवन समजू शकाल. परमेश्वराची ईच्छा आहे की आपण मुक्ती समजून घेतली पाहिजे. परमेश्वराची ईच्छा आहे की आपल्यातही आत्मविश्वास असला पाहीजे की आपल्याला वाचविण्यात आले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्याला मुक्तीच्या महत्वाच्या मुद्यांकडे वळले पाहीजे.

(A) आपण सर्वांनी पापं केली आहेत. आपण सर्वांनी परमेश्वराला न आवडत असलेल्या, नाखुश करणा-या गोष्टी केल्या आहेत. (रोमन्स 3:23)

(B) आपल्या पापांमुळे आपण परमेश्वरापासून कायमसाठी विभक्त होण्याच्या सजेस पात्र झालो आहोत. (रोमन्स 6:23)

(C) जिझसने सुळावर प्राण त्यागले कारण त्याला आपल्या पापासाठी दंड भरावा लागला. (रोमन्स 5:85 मधील 5:21 मधून ) आपल्या जागी जिझसने प्राण त्यागले आणि आपली सजा त्याने स्विकारली, त्याचे हे कृत्यच सिध्द करते की त्याचा अंत आपल्या पापाची सजा ठरू शकेल.

(D) परमेश्वर आपल्याला माफ़ी आणि मुक्ती याकरीता देतो कारण आपण आपला विश्वास जिझसमध्ये ठेवला होता ज्याने आपल्या पापाची सजा मरण स्विकारले होते. (जोन 3:16रोमन्स 5:1 रोमन्स 8:1)

हा मुक्तीचा संदेश आहे. जर तुम्ही जिझसवर तुमचा राखणदार आहे असा विश्वास ठेवत असाल तर तुम्हा सर्वांना वाचविण्यात येईल आणि परमेश्वर असे वचन देतो की तुमच्या कल्याणासाठी तुम्हाला कधीही सोडुन जाणार नाही. तुमची सर्व पापे तो माफ़ करेल (रोमन 8:38,39 मैथ्यू 28:20) ध्यानात असू द्या जिझस तुमच्या करीता मुक्ती राखून ठेवतो. (जोन 10:28,290) जर तुमचा जिझस वर विश्वास असेल तर तोच एकमात्र राखणदार आहे, आणि तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की तुम्ही स्वर्गात परमेश्वरासोबत शाश्वत जीवन जगू शकाल.

2. जेथे बायबल शिकविण्यात येते असे एक चांगले चर्च शोधा.

असे समजू नका की चर्च केवळ एक इमारत आहे. चर्च म्हणजे तेथे असलेले लोक. जिझसवर विश्वास असेल असे सर्व अनुयायी एकत्र येणे खुप महत्वाचे आहे. ही चर्चची प्राथमिक ध्येयाची पायरी आहे. आता तुम्ही जिझसवर विश्वास ठेवलाच आहे तर अतीशय समर्थपणे अशा एका चर्चचा शोध करायचा आहे ज्या ठिकाणी बायबलमध्ये विश्वास असेल जे तुमच्या आसपासच्या प्रदेशात असेल त्याकरीता आम्ही आपल्याला प्रोत्साहित करीत आहोत. त्यासाठी तुम्ही धर्मगुरु जिझस वरील नव्या विश्वासा संबंधी जाणून घेवू द्या.

चर्चचा दुसरा महत्वाचा उद्देश आहे- सर्वांना बायबल शिकविण्याचा. तुम्ही परमेश्वराकडून त्याच्या सूचना प्रत्यक्ष जीवनात अमलात कशा प्रकारे आणायच्या ते शिकवू शकतात. बायबल शिकणे ही सफ़ल आणि शक्तिमान ख्रिश्चनच्या आयुष्याची सुरूवात आहे. 2 टिमोथी 3:16 – 17म्हणतो की प्रत्येक शब्द हा परमेश्वराचा श्वास आहे आणि त्याचा अभ्यास आपल्याला सुधारतो आणि योग्य प्रशिक्षण देतो. चांगल्या मार्गाने धार्मिक व पवित्र मर्गाने जाण्यासाठी प्रशिक्षण देते ज्यामुळे परमेश्वराची माणंस नविन चांगल्या कामासाठी संपूर्ण पणे सुसज्ज बनतात.

तिसरा हेतु म्हणजे चर्च हे एक प्रार्थना स्थळ आहे.परमेश्वराने आपल्याकरिता जे काही केले आहे, त्याचे ते आभार मानण्याचे ते ठीकाण आहे. परमेश्वराने आपल्याला वाचवले आहे. तो आपल्या सर्व गरजा पूर्ण करतो. तो आपल्याला मार्गदर्शन करतो आणि दिशाही दाखवतो तर मग आपण त्याचे आभार का मानू नये? परमेश्वर पवित्र,शुध्द,प्रेमपूर्ण,दयावान आणि उमद्यागुणांनी भरलेला आहे. मुक्ती (4:1) स्पष्ट सांगते की तुम्ही आपल्या परमेश्वराकडे मान,सन्मान शक्ती मिळवण्यासाठी लायक आहात कारण तुम्ही भरपूर गोष्टी केलेल्या आहेत आणि तुमच्या ईच्छेने त्या निर्माण करण्यात आल्या आणि त्यांचा क्रम सुरु झाला.

3. दररोज ईश्वर चिंतनासाठी थोडा वेळ काढा.

आपण सर्वांसाठी हे खूपच महत्वाचे आहे की परमेश्वराला केंद्रस्थान ठेवून काही जण ह्यालाच “शांत वेळ” असेही म्हणतात.काही जण ह्याला “भक्ती” म्हणतात.कारण हीच ती वेळ आहे जेव्हा आपण परमेश्वराला स्वत:ला समर्पित करतो.काही जण सकाळी तर काही जण संध्याकाळी अशी वेळ राखून ठेवतात, हे महत्वाचे नाही की तुम्ही कोणता वेळ काढतात किंवा ह्या वेळेला तुम्ही काय म्हणतात, हे महत्वाचे आहे की तुम्ही नियमितपणे परमेश्वरासोबत काही वेळ घालवतात. तुमचे नियमितपणे परमेश्वरासोबत वेळ घालवणे महत्वाचे आहे. परमेश्वरासोबत वेळ घालवावा म्हणजे नक्की काय घटना घडतील:

(A) प्रार्थना : प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी प्रत्यक्ष बोलणे : परमेश्वराच्या सोबत तुमच्या काळज्या आणि समस्यांविषयी बोला. परमेश्वराला त्यासाठी मार्गदर्शन आणि चातुर्य़ देण्यास सांगा. जर परमेश्वरा सोबत नियमितपणे थोडा वेळ घालवला तर कोणत्या घटना घडतील. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला सांगा. परमेश्वराला सांगा की तुमचे त्याच्यावर किती प्रेम आहे आणि त्याने जे काही केले आहे त्याबद्दल तुम्ही त्यांची प्रशंसा करीत आहात ह्याला म्हणतात प्रार्थना.

(B) बायबल वाचन : ह्या शिवाय अधिक सांगायचे म्हणजे दर रविवारच्या शाळेत बायबल वाचन होईल कारण तुम्हाला त्याची गरज आहे. बायबल तुम्ही स्वत: वाचले पाहीजे. एक सफ़ल ख्रिश्चन बनण्यासाठी ज्या काही गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी बायबल मध्ये दिल्या आहेत, त्यात परमेश्वराचे मार्गदर्शन आहे,उत्तम निर्णय आहेत. बायबल म्हणजे स्वत: परमेश्वराच्या सूचना आहेत .परमेश्वराची ईच्छा जाणून घेण्यासाठी, इतरांवर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी बायबल वाचन आवश्यक आहे. बायबल आपल्या आयुष्यात प्रामुख्याने सुचना देत असते आणि आपण आपले जीवन परमेश्वराला खुष करण्यासाठी कसे जगावे ते सांगते आणि ज्याने आपल्याला समाधान ही मिळेल.

4. जे लोक तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत मदत करतील, त्यांचा तुमच्या बरोबरचा संपर्क वाढवावा.

(कोरीथीयन्स 15:33) आपल्याला असे सांगते कि तुम्ही कोणाकडुनही चुकीच्या मार्गी ढकलेले जाऊ नये. वाईट संगतीने चांगल्या चारित्र्याचे लोकही बिघडतात. बायबल मध्ये वाईट लोकांचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो याबद्दल अनेक धोक्याच्या सूचना आहेत. जे लोक वाईट कामे करतात, त्यांच्या संगतीने आपल्यालाही तशीच कामे करण्याचा मोह होतो. आपल्या आजूबाजूला असलेले लोक, आपले चारित्र्य पूर्णपणे मिटवून टाकतात, म्हणून आपल्या आजूबाजूला असे लोक हवेत जे परमेश्वरावर प्रेम करतात आणि स्वत: स्वत:ला परमेश्वराजवळ समर्पित करतात. त्यांचे असे असणे महत्वाचे आहे.

एक किंवा दोन असे मित्र शोधून काढा,कदाचित तुमच्या चर्च मधून तुम्हाला ते भेटतील आणि तुम्हाला ते प्रोत्साहीत करतील. (हेब्रुस 3:13,10:24).तुमच्या मित्रांना तुमच्या शांत वेळेचा हिशेब ठेवण्यास सांगा. तुमच्या निरनिराळ्या कार्यपध्दतीचा आणि तुमच्या परमेश्वरासोबत चालण्याचा विचार करतील. ते तुमच्यासाठी तसेच करु शकतात का? ते विचारा ह्या चा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना सोडून द्या, ज्यांनी जीझसला स्वत: राखणदार मानले नाही. तुम्ही त्यांच्याशी मित्रता चालू ठेवा आणि पूर्वीप्रमाणेच त्यांच्यावर प्रेम करा. केवळ एवढेच त्यांना कळू द्या की जिझसने तुमचे जीवन बदलले आहे, आणि तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी करण्याची सवय आहे, त्या तुम्ही आता करु शकणार नाही. देवाला तुम्हाला नवीन संधी देण्यास विनंती करा की जिझस तुमच्या मित्रांच्या आनंदात सहभागी होईल.

5. बाप्तिस व्हा.

पुष्कळ जणांना बाप्तिसमा ह्या शब्दाचा अर्थ कळत नाही. यातील बाप्तिस ह्या शब्दाचा अर्थ आहे, पाण्यात विसर्जित करणे. बाप्तिसमा हा बायबल मधिल एक मार्ग आहे ज्यामुळे जाहिरपणे लोकांना तुम्ही जिझस मध्ये विश्वास ठेवत असल्याचे सांगीतले जाते आणि तुम्ही त्याला अनुसणार आहात हे कळवले जाते हे काम स्पष्टपणे जिझस बरोबर पुरले गेल्याचे किंवा पाण्यात विसर्जित झाल्याचे दिसते. पाण्यातून बाहेर येण्याचे काम म्हणजे जिझसचे पुनर्जिवित होणे होय. बाप्तिसमा घेणे म्हणजे स्वत: ला जिझसच्या अंताबरोबर, त्याला दफ़न करण्याच्या क्रियेबरोबर तसेच त्याच्या पुनर्जिवित होण्याबरोबर स्वत:ला ओळखण्याची क्रिया होय. (रोमन्स 6:3-4)

बाप्तिसमा म्हणजे तुम्हाला वाचवणारे कार्य़ नव्हे, त्यामुळे त्याने तुमची पापे धुवून निघत नाहीत, बाप्तिसमा म्हणजे केवळ एक पायरी आहे त्यात नम्रता आहे, जिझस मध्ये असलेल्या तुमच्या विश्वासाचे जाहीर निवेदन आहे, ज्यात तुमची मुक्ती सामावलेली आहे. बाप्तिसमा अत्यंत महत्वाचा आहे कारण ती नम्रतेची एक पायरी आहे आणि जाहीरपणे जिझसमध्ये दाखवलेला विश्वास आणि त्याच्या प्रती तुमच्या समर्पणाची भावना आहे. जर तुम्ही बाप्तिसमा घेण्यासाठी तयार असाल तर तुम्ही मुख्य धर्मगुरूंशी बोलू शकतात.भाषा ‘होम पेज’ कडे परत याआत्ताच मी माझा विश्वास जिझसवर ठेवला आहे… आता पुढे काय?