settings icon
share icon
प्रश्नः

आपण कोणते पदार्थ (कोशर) खावेत याबाबत पवित्र शास्त्र काय सांगते का? ख्रिस्ती लोकांनी टाळावेट असे कोणते पदार्थ आहेत का?

उत्तरः


लेवीय अध्याय 11 मध्ये इस्राएल राष्ट्राला देवाने दिलेल्या आहार प्रतिबंधांची यादी आहे. आहार कायद्यांमध्ये डुकराचे मांस, खेकड, बहुतेक कीटक, गिधाडे आणि इतर विविध प्राणी खाण्यास मनाईचा समाविष्ट आहे. इस्राएली व्यतिरिक्त इतर कोणासही आहाराचे नियम लागू करण्याचा हेतू नव्हता. अन्न कायद्यांचा हेतू इस्रायली लोकांना इतर सर्व राष्ट्रांपेक्षा वेगळे बनवणे हा होता. हा उद्देश संपल्यानंतर, येशूने सर्व पदार्थ स्वच्छ घोषित केले (मार्क 7:19) देवाने प्रेषित पेत्राला एक दृष्टांत दिला ज्यामध्ये त्याने घोषित केले की पूर्वी अशुद्ध मानलेले प्राणी खाल्ले जाऊ शकतात: “देवाने शुद्ध केलेल्या कोणत्याही गोष्टीला अशुद्ध म्हणू नका” (प्रेषितांची कृत्ये 10:15). जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला, तेव्हा त्याने जुन्या कराराचा नियम पूर्ण केला (रोमकरांस पत्र 10:4; गलतीकरांस पत्र 3:24-26; इफिसकरांस पत्र 2:15). यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध खाद्यपदार्थांसंबंधी कायदे समाविष्ट आहेत.

रोमकरांस पत्र 14:1-23 आपल्याला शिकवते की सर्व पदार्थ शुद्ध आहेत हे सत्य स्वीकारण्यासाठी सर्व लोक विश्वासात परिपक्व नाहीत. परिणामी, जर आपण "अशुद्ध" अन्न खाल्ल्याने नाराज होणा-या एखाद्या व्यक्तीसोबत आहोत, तर आपण असे करण्याचा आपला अधिकार सोडला पाहिजे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही. आम्हाला हवं ते खाण्याचा अधिकार आहे, पण इतर लोक चुकीचे असले तरी त्यांना नाराज करण्याचा आम्हाला अधिकार नाही. या युगातील ख्रिस्ती लोकांसाठी, तथापि, जोपर्यंत आपण इतरांना, त्याला/तिला, त्याच्या विश्वासामध्ये अडथळा आणत नाही तोपर्यंत आपल्याला पाहिजे ते खाण्याचे स्वातंत्र्य आहे.

कृपेच्या नवीन करारामध्ये, आपण जे खातो त्यापेक्षा आपण किती खातो याविषयी बायबल खूप जास्त चिंतित आहे. शारीरिक भूक ही आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेचे सादृश्य आहे. जर आपण आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ आहोत, तर कदाचित आपण इतर सवयी जसे की मनाच्या (वासना, लोभ, अनीतीचा द्वेष/राग) नियंत्रित करू शकत नाही आणि आपले तोंड गप्पाटप्पा किंवा कलहापासून दूर ठेवण्यास असमर्थ आहोत. आपण आपल्या भुकेला आपणावर नियंत्रण करून देऊ नये; त्याऐवजी, आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे (अनुवाद 21:20; नीतिसूत्रे 23:2; 2 पेत्र 1:5-7; 2 तीमथ्य 3:1-9; 2 करिंथ 10:5).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आपण कोणते पदार्थ (कोशर) खावेत याबाबत पवित्र शास्त्र काय सांगते का? ख्रिस्ती लोकांनी टाळावेट असे कोणते पदार्थ आहेत का?
© Copyright Got Questions Ministries