settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती विश्वासनाऱ्याला जुन्या कराराचे पालन करायला पाहिजे का?

उत्तरः


या विषयाला समजण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ही जाणून घ्यायची आहे की जुना करार हा इस्राईल लोकांना देण्यात आला होता, तो काही ख्रिस्ती विश्वासनाऱ्यांना लागू नाही.यामधील काही करार ईस्राईल लोकांसाठी देण्यात आले होते की त्यांनी देवाची आज्ञा मागावी त्यांना प्रसन्न करावा (उदा. दहा आज्ञा). यामध्ये त्यांना दर्शविण्यात आले होते की, देवाची उपासना आणि पापासाठी प्रायश्चित्त (बलीदानाची पध्दत). काही करार यासाठी दिलेले आहेत इस्त्राईल देशाला वेगळे बनविण्यासाठी(खाण्यापिण्या विषयी व कपडे घालण्या विषयी). जुन्याकराराचा कोणताही नियम ख्रिस्त विश्वासनाऱ्याला लागू होत नाही, कारण येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरणाने, त्याने जुण्या कराराचे सर्व नियम पूर्ण करुन त्याचा शेवट केला(रोम 10:4;गलती 2:23-25;इफिस 2:15).

जुन्या कराराच्या नियमाच्या जागी, आम्ही ख्रिस्ताच्या नियमाच्या आधीन आहोत (गलती 6:2), जो की,“तु आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण अंत:करणाने पूर्ण जीवाने पूर्ण मनाने प्रिती कर…….. तु आपल्या शेजाऱ्यावर आपणसारखी प्रिती कर”(मत्तय 22:37:39).जर आम्ही दोन आज्ञांचे पालन केले तर खिस्तांच्या सर्व मागण्या आम्ही पूर्ण करतो, या दोन आज्ञांवर सर्व नियम शास्त्र व संदेष्ट शास्त्र ही अवलंबून आहेत(मत्तय 22:40). आता, याचा अर्थ असा नाही की जुन्या कराराचे नियम आजच्या काळासाठी ते अप्रासंगीक झालेले आहेत. जुन्या करारात पुष्कळच्या नियमामध्ये “देवावर प्रेम करणे” आणि “शेजाऱ्यावर प्रेम करण्यासाठी” या दोन नियमात येते. जुण्या कराराची व्यवस्था देवावर प्रेम कसे करता येते. व शेजाऱ्यावर प्रेम करण्यासाठी काय करावे हे समजून घेण्यासाठी ते दिशा देणारे साधन होते.त्याच बरोबर जुण्या कराराचे नियम आज ख्रिस्ती विश्वासनाऱ्यावर लागू होत नाहीत. जुन्या कराराचे नियम हा एक गट आहे(याकोब 2:10). काही एक तर ते सर्व लागू होते किंवा कोणतीच नाही, बलीदानाच्या पध्दतीला त्याने प्रत्येक भागाला पूर्ण केले.

“देवावर प्रिती करणे म्हणजे: त्याच्या आज्ञा पाळणे हे आहे. आणि त्याच्या आज्ञा भारी नाहीत.”(1 योहान 5:3) दहा आज्ञा हे जुण्या कराराचा महत्वाचा सार होता. दहा आज्ञापैकी नऊ आज्ञा नविन करारात सांगितल्या आहेत(एक केवळ शब्बाथ दिवसाला मानन्या बाबत). स्पष्ट पणे, जर आम्ही देवावर प्रिती करतो तर आम्ही खोटया देवाची उपासना देणार नाहीत, किंवा मृत्यूच्या पाया पडणार नाहीत, जर आम्ही शेजाऱ्यावर प्रिती करतो,तर आम्ही त्याचा खुन करणार नाहीत, त्याच्या संगती लबाड बोलणार नाहीत,त्याच्या विरुध्द व्यविचार करणार नाहीत,त्याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरणार नाहीत. जुन्या कराराच्या उद्देशाचे लोकांनी पालन न केल्यामुळे व त्याच्या असमथ्यमुळे ते दोषी ठरले गेले त्यासाठी येशु ख्रिस्त त्यांच्या तारणकर्त्याच्या रुपात आम्हाला संकेत देत होते(रोम, 7:7-9; गलती 3:24). जुन्या कराराचे नियम कधी कधी सर्व वेळी सर्व लोकांसाठी विश्व्यापी करार म्हणून निश्चित केली नाहीत जर आम्ही देवावर प्रिती करीतो आम्ही शेजाऱ्यावर प्रेम करीतो तर हया दोन्ही गोष्टी निष्ठापूर्वक करतोत ,तर आम्ही सर्व कार्य करु शकतो त्याची देव आमच्याजवळ मागणी करतो.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती विश्वासनाऱ्याला जुन्या कराराचे पालन करायला पाहिजे का?
© Copyright Got Questions Ministries