settings icon
share icon
प्रश्नः

देव/बायबल लिंगभेद रखणारा/राखणारे आहे का?

उत्तरः


लिंगभेद म्हणजे एक लिंगाचे, सामान्यतः पुरुषाचे इतर लिंगांवर, सामान्यतः स्त्रीवर वर्चस्व राखणे होय, बायबलमध्ये स्त्रियांबद्दल बरेच संदर्भ आहेत जे आपल्या आधुनिक मानसिकतेनुसार स्त्रियांबद्दल भेदभावकारक वाटतात. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा बायबल एखाद्या क्रियेचे वर्णन करते तेव्हा याचा अर्थ असा नाही की बायबल त्या क्रियेला मान्यता देते. बायबल अशा पुरुषांचे वर्णन करते ज्यांनी स्त्रियांशी संपत्तीपेक्षा थोडे अधिक महत्वाचे म्हणून वागणूक केली परंतु याचा अर्थ असा नाही की देव त्या कृतीला मान्यता देतो. बायबलमध्ये आपल्या समाजांपेक्षा आपल्या जीवनात सुधारणा करण्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. देवाला माहित आहे की बदललेल्या मनाचा परिणाम म्हणून आचरणात बदल घडून येेईल.

जुन्या कराराच्या काळात, संपूर्ण जगातील प्रत्येक संस्कृतीची रचना पुरुषप्रधान होती. इतिहासाची ही स्थिती अगदी स्पष्ट आहे - केवळ शास्त्रवचनांतच नव्हे तर बहुतेक समाजांवर चालणाऱ्या नियमांतही. आधुनिक मूल्य प्रणाली आणि सांसारिक मानवी दृष्टिकोनातून त्यास “लिंगभेद राखणारे” असे म्हणतात. मनुष्याने नव्हे तर देवाने समाजात व्यवस्था स्थापन केली आणि तो अधिकार स्थापनेच्या तत्त्वांचा कर्ता आहे. तथापि, इतर सर्व गोष्टीप्रमाणे, पतन पावलेल्या मनुष्याने ही व्यवस्था भ्रष्ट केली आहे. याचा परिणाम म्हणून इतिहासात पुरुष आणि स्त्रियांच्या पदांत असमानता घडून आली. आपल्या जगात आपण जे अपवर्जन आणि भेदभाव पाहतो त्यात काही नवीन नाही. हा मनुष्याच्या पतनाचा आणि पापाच्या परिचयाचा परिणाम आहे. म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की “लिंगभेद” हा शब्द आणि लिंगभेदाची प्रथा पापाचा परिणाम आहे. बायबलचे प्रगतीशील प्रकटीकरण आपल्याला लिंगभेदासाठी आणि मानवजातीच्या सर्व पापी प्रवृत्तींवर उपचार करण्याचा मार्ग दाखवते.

परमेश्वराद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारपदांमधील आत्मिक संतुलन शोधण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी आपण शास्त्रवचनाकडे लक्ष दिले पाहिजे. नवीन करार जुन्या गोष्टीची पूर्तता आहे आणि त्यामध्ये आम्हाला अशी तत्वे आढळतात जी आम्हाला अधिकारांची योग्य रेखा आणि सर्व मानवतेच्या पापाचा उपाय सांगतात, सर्व मानवजातीची पापमयता आणि त्यात लिंग आधारित भेदभाव समाविष्ट आहे.

ख्रिस्ताचा वधस्तंभ मोठी समानता स्थापित करणारा आहे. योहान 3:16 म्हणते, “जो कोणी विश्वास ठेवतो” आणि हे सर्वसमावेशक विधान आहे जे समाजातील स्थान, मानसिक क्षमता किंवा लिंगाच्या आधारे कोणालाही सोडत नाही. आम्हाला गलतीकरांमध्ये एक परिच्छेद आढळतो, “कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात” (गलती 3:26-28) वधस्तंभाजवळ कोणतीही लिंगभेद नाही.

बायबल पुरुष आणि स्त्रिया दोन्हीमध्ये पापाच्या परिणामाच्या अचूक चित्रणात लिंगभेद करीत नाही. बायबलमध्ये सर्व प्रकारच्या पापाची नोंद आहे: गुलामगिरी आणि बंधन आणि त्याच्या महान नायकांचे अपयश. तरीसुद्धा हे आपल्याला उत्तर, तसेच देव आणि त्याच्या स्थापित व्यवस्थेच्या विरोधात केलेल्या पापांबद्दलचा उपचार - देवाशी एक योग्य नाते देते. जुना करार सर्वोच्च बलिदानाची वाट पाहत होता आणि प्रत्येक वेळी जेव्हा पापांसाठी बलिदान दिले जात होते तेव्हा ते देवासोबत समेट घडवून आणण्याची गरज शिकवीत होते. नवीन करारामध्ये, “जगाचे पाप वाहून नेणारा कोकरा” जन्मला, मेला, पुरला गेला व पुन्हा जिवंत झाला, आणि मग स्वर्गात त्याच्या जागी वर चढला, आणि तेथे तो आपल्यासाठी मध्यस्थी करतो. त्याच्यावरच्या विश्वासामुळेच पापाचा उपाय आढळतो आणि त्यात लिंगभेदाच्या पापाचा समावेश आहे

बायबलमध्ये लिंगभेदाचा आरोप शास्त्रवचनाच्या अभावावर आधारित आहे. जेव्हा सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या देवाने नियुक्त केलेल्या जागा घेतात आणि “परमेश्वर असे म्हणतो” यानुसार जगतात तेव्हा लिंगांमध्ये एक आश्चर्यकारक समतोल असतो. या समतोलाने देवाने सुरुवात केली आणि तोच त्याचा शेवट करेल. पापाच्या निरनिराळ्या उत्पादनांकडे अनुचित लक्ष दिले जात आहे आणि त्याच्या मुळाकडे नाही. जेव्हा प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर वैयक्तिक सलोखा केला जातो तेव्हाच आपल्याला खरी समानता आढळते. “तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील” (योहान 3:32).

हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे की बायबलमध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या भूमिका नोंदवल्या गेल्याने लिंगभेद निर्माण होत नाही. बायबलमध्ये हे अत्यंत स्पष्ट आहे की देव पुरुषांकडून अपेक्षा करतो की त्यांनी मंडळीत आणि घरात नेतृत्व करण्याची भूमिका घ्यावी. हे महिलांना निकृष्ट दर्जाचे बनवते का? नक्कीच नाही. याचा अर्थ असा की स्त्रिया कमी हुशार, कमी सक्षम, किंवा देवाच्या नजरेत कमी दिसतात? नक्कीच नाही! याचा अर्थ असा आहे की आपल्या पापमय जगात रचना आणि अधिकार असले पाहिजेत. देवाने आपल्या भल्यासाठी अधिकाराच्या भूमिका स्थापन केल्या आहेत. लिंगभेद ही या भूमिकांचा गैरवापर आहे, या भूमिकांचे अस्तित्व नाही.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देव/बायबल लिंगभेद रखणारा/राखणारे आहे का?
© Copyright Got Questions Ministries