settings icon
share icon
प्रश्नः

देव आपले मन बदलतो काय?

उत्तरः


मलाखी 3:6 घोषित करते, “कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही; म्हणून याकोबवंशजहो, तुम्ही नष्ट झाला नाहीत.” त्याचप्रमाणे, याकोब 1:17 आपल्याला सांगते, ”प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.“ गणना 2:19 स्पष्ट आहे: “देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?“ या वचनांच्या आधारे, नाही, देव बदलत नाही. देव बदलू शकत नाही आणि तो न बदलणारा आहे. तो सर्वज्ञ आहे. म्हणून एखादी चूक समजून, आपला विचार बदलून नवीन प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्याच्या अर्थाने तो ”त्याचे मन बदलू शकत नाही.“

या परिच्छेदात दोन महत्वाचे विचार आहेत जे म्हणतात की देव आपले मन बदलतो. सर्वप्रथम, आपण असे म्हणू शकतो की ”मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला“ (उत्पत्ति 6:6) यासारखी विधाने मानववंशशास्त्राची (किंवा मानववंशविज्ञान) उदाहरणे आहेत. हा एक अलंकार आहे ज्यात मर्यादित मानवतेच्या भावना किंवा विचारांच्या प्रक्रियेस अनंत परमेश्वराची नावे दिली जातात. मानवी दृष्टीकोनातून देवाचे कार्य समजून घेण्यात मदत करण्याचा हा एक मार्ग आहे. उत्पत्ति 6:6 मध्ये, विशिष्टरित्या, आम्हाला मनुष्याच्या पापाबद्दलचे देवाचे दुःख समजते. मानव निर्माण करण्याचा त्याचा निर्णय देव स्पष्टपणे बदलत नाही. आज आपण जिवंत आहोत याचा पुरावा आहे की सृष्टीबद्दल देवाने “आपले मन बदलले नाही”.

दुसरे म्हणजे, आपण देवाची सशर्त घोषणा करणे आणि देवाची बिनशर्त निर्धारणे यांत फरक करणे आवश्यक आहे. दुसर्या शब्दांत, जेव्हा देव म्हणाला, “मी चाळीस दिवसांत निनवेचा नाश करीन” तेव्हा तो अश्शूरच्या प्रतिसादावर सशर्त बोलत होता. आम्हाला हे माहित आहे कारण अश्शूरांनी पश्चात्ताप केला आणि देव पस्तावला नाही, खरे म्हणजे त्याने दंड दिला नाही. देवाने त्याचा विचार बदलला नाही; त्याऐवजी, निनवेला दिलेला त्याचा संदेश म्हणजे पश्चात्ताप करण्यास उद्युक्त करणारा इशारा होता आणि त्याचा इशारा यशस्वी झाला.

परमेश्वराच्या बिनशर्त घोषणेचे एक उदाहरण म्हणजे दाविदाला परमेश्वराचे अभिवचन, “तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ्यापुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल” (2 शमुवेल 7:16) या घोषणेमध्ये कोणतीही पात्रता व्यक्त केलेली किंवा सूचित केलेली नाही. दाविदाने काही केले असो वा नसो परमेश्वराचा संदेश पूर्णत्वास येईल.?

देव आपल्याला त्याच्या काही घोषणांच्या सावध करणार्या स्वरूपाविषयी सांगतो आणि हे की आपल्या निवडीच्या अनुषंगाने कार्य करेल याविषयी सांगतो: “एखादे राष्ट्र अथवा राज्य समूळ उपटून नष्ट करीन असे मी एकदा बोललो; तरीपण ज्या राष्ट्राविरुद्ध हे मी बोललो, ते आपली दुष्टता सोडील तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता त्याविषयी मला अनुताप होईल. एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची लागवड करून ते मी स्थापीन असे मी एकदा बोललो, तरीपण माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्याने माझे वचन पाळले नाही, तर त्याचे मी हित करीन म्हणून बोललो त्याविषयी मला अनुताप होईल. तर आता यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्यांना जाऊन सांग: ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुमच्यावर अनर्थ योजत आहे, तुमच्याविरुद्ध मनसुबा योजत आहे; तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा.” (यिर्मया 18:7-11). सशर्त विधान लक्षात घ्या जर: ़“ज्या राष्ट्राविरुद्ध हे मी बोललो, ते आपली दुष्टता सोडील तर ...(योना 3 मधील अश्शूरांप्रमाणे). . . त्याविषयी मला अनुताप होईल.” उलट, देव कदाचित एखाद्या राष्ट्राला असे सांगेल की त्यांना आशीर्वाद मिळेल, परंतु “तरीपण माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून (मीका 1 मधील इस्राएलासमान ) त्याने माझे वचन पाळले नाही, तर त्याचे मी हित करीन म्हणून बोललो त्याविषयी मला अनुताप होईल.”

मुख्य गोष्ट अशी आहे की देव संपूर्णपणे सुसंगत आहे. त्याच्या पावित्र्यात, देव निनवेचा न्याय करणार होता. तथापि, निनवेने पश्चात्ताप केला आणि आपले मार्ग बदलले. याचा परिणाम असा झाला की, परमेश्वराने आपल्या पवित्रतेस स्मरून निनवेवर दया केली आणि त्याला वाचविले. हे “मन बदलणे” त्याच्या स्वभावाशी पूर्णपणे सुसंगत आहे. त्याची पवित्रता लेशमात्रही खचली नाही.

आपल्या निवडीस प्रतिसाद म्हणून देव आपल्या वागण्यात बदल करतो या गोष्टीचा त्याच्या स्वभावाशी काहीही संबंध नाही. खरे तर, देव बदलत नाही म्हणून त्याने नीतिमानांशी अनीतिमानांपेक्षा वेगळे वागले पाहिजे. जर कोणी पश्चात्ताप केला तर देव सतत क्षमा करतो; जर कोणी पश्चात्ताप करण्यास नकार दिला तर देव सुसंगतपणे न्याय करतो.

त्याचा स्वभाव, त्याची योजना आणि त्याच्या अस्तित्वात बदल घडत नाही. तो एका दिवसात पश्चतप्त व्यक्तीशी प्रसन्न होऊन दुसर्या दिवशी पश्चतप्त व्यक्तीवर रागावू शकत नाही. हे त्याला बदलण्यायोग्य आणि अविश्वासू असल्याचे दर्शवेल. देव निनवेला सांगतोे, “मी तुमचा न्याय करणार आहे,” आणि मग (त्यांनी पश्चात्ताप केल्यानंतर) त्यांचा न्याय करण्यास नकार देतो हे असे दिसते की देवाने आपला विचार बदलला आहे. प्रत्यक्षात, देव फक्त त्याच्या चरित्रानुसार खरा ठरला होता. तो दयाळू आहे आणि पश्चात्ताप करणार्यास क्षमा करतो. “देव कृपा करायचे विसरला काय?” (स्तोत्र 77:9). उत्तर आहे, नाही.

एका वेळी आम्ही सर्व जण आमच्या पापामुळे देवाचे शत्रू होतो (रोम 8:7). आपण पश्चात्ताप करावा म्हणून देवाने आम्हाला पापाच्या वेतनाविषयी (रोम 6:23) चेतावणी दिली. जेव्हा आम्ही पश्चात्ताप केला आणि तारणासाठी ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हा परमेश्वराने आमच्याबद्दल “आपले मन बदलले” आणि आता आम्ही शत्रू नाही तर त्याची प्रिय मुले आहोत (योहान 1:12). आम्ही पाप करीत राहिलो तर आपल्याला शिक्षा न करणे हे देवाच्या स्वभावाच्या विरूद्ध ठरेल, म्हणूनच पश्चात्ताप केल्यानंतर आम्हाला शिक्षा करणे त्याच्या चरित्राविरूद्ध आहे. आपल्या अंतःकरणात बदल याचा अर्थ असा आहे का की देव बदलतो? नाही, जर काही असेल तर, आपले तारण या तथ्याकडे इशारा करते की देव बदलत नाही, कारण, जर ख्रिस्तासाठी त्याने आपल्याला वाचवले नसते तर तो आपल्या चारित्र्याच्या विरुध्द वागला असता.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देव आपले मन बदलतो काय?
© Copyright Got Questions Ministries