प्रश्नः
तो परमेश्वर प्रीती आहे की काय अर्थ आहे?
उत्तरः
बायबल प्रीतीचे वर्णन कसे करतो ते प्रथम पाहूया, आणि नंतर आपण परमेश्वर प्रेमाचा सार कसा आहे ते बघू. "प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. तो हेवा करीत नाही, तो फुशारकी मारत नाही आणि अभिमान बाळगत नाही. तो उद्धट, तो स्वार्थी नाही आणि त्याला राग येत नाही आणि तो चुकांची नोंद ठेवत नाही. प्रीती वाईट करण्यात आनंद मानत नाही तर सत्य गोष्टी करण्यामध्ये रममाण असते. ते नेहमी रक्षण करते, नेहमी विश्वास ठेवते, नेहमी आशा देते नेहमी पाठपुरावा करते. प्रीती कधी संपत नाही "(1 करिंथ 13: 4-8अ). हे ईश्वराच्या प्रीतीचे वर्णन आहे, आणि कारण परमेश्वर प्रीती आहे (1 योहान 4: 8), तो अशाच प्रकारचा आहे.
प्रीती (परमेश्वर) कोणावरही स्वत: बळजबरी करत नाही. त्याच्या कडे येणारे लोक त्याच्या प्रेमापोटी येतात. प्रीती (परमेश्वर) सर्वांना दया दाखवतो. प्रीती (येशू) पक्षपात न करता सर्वांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. प्रीती (येशू) कोणतीही तक्रार न करता एक नम्र जीवन जगत गेला. प्रीती (येशू) तो काय आहे किंवा काय करू शकतो याबद्दल कधीही फुशारकी मारली नाही जरी तो कोणालाही हरवू शकत होता तरी देखील. प्रीती (परमेश्वर) आज्ञाधारकता मागत नाही. परमेश्वराने आपल्या पुत्रापासून आज्ञाधारकतेची मागणी केली नाही, तर या उलट येशूने स्वेच्छेने स्वर्गात आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या. (योहान 14:31) "मी माझ्या पित्यावर वर प्रीती करतो आणि माझ्या पित्याने मला दिलेली आज्ञा माझ्यासाठी सर्वपरी आहे, हे या जगातील लोकांनी जाणून घ्यायला हवे". प्रीती (येशू) होता / नेहमी असेल आणि तो इतरांच्या हितामध्ये काम करीत राहील.
योहान 3:16 मध्ये परमेश्वराने आम्हा प्रती त्याची महान प्रीती आणि करुणा व्यक्त केली आहे: "कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र जगाला दिला म्हणूनच जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल." रोमन्स 5: 8 एकच संदेश देतो: "पण परमेश्वराने आपल्यासाठी त्याची प्रीती व्यक्त केली. जेंव्हा आम्ही पापी होतो, तेंव्हा येशूने आपल्यासाठी स्वतःचे बलिदान दिले". या अध्यायापासून हे दिसते की परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही देखील त्याच्या शाश्वत घरात यावे, म्हणजेच स्वर्गात यावे. त्याने बलिदान करून आपला तिथे जाण्याचा मार्ग सुकर केला आहे. त्याने आपल्या पापांची किंमत देऊन ते शक्य केले आहे. प्रीती म्हणजे क्षमादान . "जर आम्ही आमची पापे कबूल केले, तर तो आम्हाला आमच्या पापांपासून मुक्त करेल आणि सर्व अपराधांपासून आम्हाला शुध्द करेल" (1 योहान 1: 9).
त्यामुळे, परमेश्वर प्रीती आहे याचा अर्थ काय? ''प्रीती ईश्वराची एक विशेषता आहे. प्रीती ईश्वराचे वर्ण आहे, त्याच्या व्यक्तीत्वाचे मूळ पैलू आहे. ईश्वराच्या प्रीतीचा त्याच्या पवित्रातेशी, चांगुलपणा, न्याय, किंवा त्याच्या अगदी क्रोधाशी विरोधाभास नाही. देवाच्या गुणधर्म सर्व परिपूर्ण सुसंवाद आहेत. जसे काही परमेश्वर करतो ते प्रीतीपूर्ण आहे कारण तो न्यायपूर्ण आणि रास्त आहे. परमेश्वर खऱ्या प्रीतीचे परिपूर्ण उदाहरण आहे. अक्षरश, परमेश्वर प्रीती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याचा पुत्र येशूला जो वैयक्तिक तारणहार म्हणून मानेल त्याला तेवढीच प्रीती करण्याची क्षमता दिली आहे (योहान 1:12; 1 योहान 3: 1, 23-24).
English
तो परमेश्वर प्रीती आहे की काय अर्थ आहे?