settings icon
share icon
प्रश्नः

देव पुरुष आहे की स्त्री?

उत्तरः


शास्त्रवचनाचे परीक्षण करताना, दोन गोष्टी स्पष्ट होतात. प्रथम, देव आत्मा आहे आणि त्याला मानवी वैशिष्ट्ये किंवा मर्यादा नाहीत. दुसरे म्हणजे, पवित्र शास्त्रातील सर्व पुरावे सहमत आहेत की देवाने स्वतःला मानवजातीवर पुरुषाच्या स्वरूपात प्रकट केले. आरंभी, देवाचे खरे स्वरुप समजून घेणे आवश्यक आहे. देव एक व्यक्ती आहे, अर्थातच, कारण देव व्यक्तिमत्त्वाची सर्व वैशिष्ट्ये प्रगट करतो: देवाकडे मन, इच्छा, बुद्धी आणि भावना आहेत. देव संवाद साधतो आणि त्याचे नातेसंबंध आहेत, आणि देवाच्या वैयक्तिक कृतींचा पुरावा संपूर्ण पवित्र शास्त्रात दिसून येतो.

योहान 4:24 म्हणते की “देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” देव एक आत्मिक प्राणी असल्याने, त्याच्यात शारीरिक मानवी वैशिष्ट्ये नाहीत. परंतु, कधीकधी पवित्र शास्त्रात वापरली गेलेली लाक्षणिक भाषा देवाला मानवी वैशिष्ट्ये देते, जेणेकरून मनुष्याला देवाला समजून घेणे शक्य व्हावे. देवाचे वर्णन करण्यासाठी मानवी वैशिष्ट्यांचा त्यावर आरोप लावण्यास “मानवत्वारोप” म्हणतात. मानवत्वारोप त्याच्या स्वभावाबद्दल, मानवजातीस जो भौतिक प्राणी आहे, परमेश्वराविषयी (आत्मिक प्राणी) सत्यता सांगण्याचे एक साधन आहे. मानवता भौतिक असल्याने आपण भौतिक क्षेत्रापलीकडील गोष्टी समजण्याबाबत मर्यादित आहोत. म्हणूनच, शास्त्रात मानवत्वारोप आपल्याला देव कोण आहे हे समजण्यास मदत करतो.

मानवास देवाच्या स्वरूपात निर्माण करण्यात आले आहे या गोष्टीचे परीक्षण करण्यात काही अडचणी येतात. उत्पत्ति 1:26-27 म्हणते, “मग देव बोलला, ‘आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांवर ते सत्ता चालवतील.‘ देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.”

स्त्री आणि पुरुष दोघेही देवाच्या स्वरूपात उत्पन्न करण्यात आले आहेत, याबाबतीत ते आपल्यासारख्या इतर सर्व सृष्ट प्राण्यांपेक्षा महान आहेत, देवासमान, त्यांना मन, इच्छा, बुद्धी, भावना आणि नैतिक क्षमता आहे. प्राण्यांमध्ये नैतिक क्षमता नसते आणि मानवांसारखा एखादा अमूर्त घटक त्यांत नसतो. देवाचे स्वरूप हा आत्मिक घटक आहे जो केवळ मानवाच्याच मालकीचा आहे. देवाने त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी मानवास निर्माण केले. मानवजात ही त्या हेतूसाठी तयार केलेली एकमेव निर्मिती आहे.

असे म्हटल्यानंतर, पुरुष आणि स्त्री हेच केवळ देवाच्या प्रतिरूपात रचण्यात आले आहेत - ते देवाच्या लहान “प्रती” नाहीत. ही वस्तुस्थिती की पुरुष आणि स्त्रिया आहेत म्हणून स्त्री व पुरुषाची वैशिष्ट्ये असणे देवाला आवश्यक नाही. लक्षात ठेवा, की देवाच्या प्रतिरूपात घडविले जाण्याचे शारीरिक वैशिष्ट्यांशी काही देणेघेणे नाही.

आम्हाला माहित आहे की देव एक आत्मिक प्राणी आहे आणि त्याला शारीरिक वैशिष्ट्ये नाहीत. तथापि, देव स्वतःला मानवांसमोर कसे प्रकट करू शकतो यास त्यामुळे मर्यादा पडत नाही. पवित्र शास्त्रात देवाने स्वतःबद्दल मानवांना दिलेली सर्व प्रकटीकरणे समाविष्ट आहेत आणि म्हणूनच तो देवाबद्दल माहितीचा एकमात्र वस्तुनिष्ठ स्रोत आहे. पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगते याकडे पाहत असतांना, देव स्वतःस मानवजातीवर ज्या स्वरुपात प्रगट करतो त्याविषयी पुराव्यांची अनेक निरीक्षणे आहेत.

पवित्र शास्त्रात देवाला “पिता” म्हणून संबोधित करणारी 170 संदर्भ आहेत. आवश्यकतेनुसार, मुलगा असल्याशिवाय कोणी पिता होऊ शकत नाही. जर देवाने स्त्रीच्या रूपात मनुष्यावर स्वतःस प्रकट करण्याची निवड केली असती तर “आई” हा शब्द या ठिकाणी आला असता, “पिता” नाही. जुन्या आणि नवीन करारांमध्ये, पुल्लिंगी सर्वनामांचा उल्लेख देवाच्या संदर्भात वारंवार केला जातो.

येशू ख्रिस्ताने देवाला अनेक वेळा पिता म्हणून संबोधले व इतर बाबतीत देवाच्या संदर्भात पुल्लिंगी सर्वनामांचा उपयोग केला. केवळ शुभवर्तमानातच, ख्रिस्त देवाचा थेट संदर्भ म्हणून “पिता” हा शब्द जवळजवळ 160 वेळा वापरतो. योहान 10:30 मधील ख्रिस्ताचे विधान हे विशेष रोचक आहे: “मी व माझा पिता एक आहोत.”¯अर्थात, येशू ख्रिस्त जगाच्या पापांची भरपाई म्हणून वधस्तंभावर मरण्यासाठी मानवी रूपात आला. देवपित्याप्रमाणे, येशू मानवजातीस पुरुषाच्या रूपात प्रगट झाला. बायबलमध्ये इतर उदाहरणे नमूद केली आहेत जिथे ख्रिस्ताने देवाच्या संदर्भात पुल्लिंगी नामांचा आणि सर्वनामांचा उपयोग केला होता.

नवीन करारातील पत्रांमध्ये (प्रेषितांपासून प्रकटीकरणापर्यंत) सुद्धा जवळजवळ 900 वचने आहेत जिथे थिओस - गीक भाषेतील पुल्लिंगी नाम - प्रत्यक्ष देवाचा उल्लेख करण्यासाठी उपयोग करण्यात आला आहे. पवित्र शास्त्रात देवाविषयीच्या असंख्य संदर्भांमध्ये पुष्कळदा पुरुष आणि पुरुषार्थी पदव्या, नाम आणि सर्वनामांचा उल्लेख केला जातो. देव मनुष्य नसला तरी त्याने स्वतःला मानवजातीसमोर प्रकट करण्यासाठी पुरुष रूपाची निवड केली.

त्याचप्रमाणे, येशू ख्रिस्त, ज्याचा उल्लेख सतत पुरुषार्थी पदवी, नाम आणि सर्वनामांच्या रूपात केला जातो, त्याने पृथ्वीवर असताना पुरुष रूप धारण केले. जुन्या कराराचे संदेष्टे आणि नवीन कराराचे प्रेषित देव आणि येशू ख्रिस्त या दोघांचा उल्लेख पुल्लिंगी नावे आणि पदव्यांसह करतात. मनुष्याने तो कोण आहे हे अधिक सहजपणे समजून घ्यावे यासाठी देवाने या स्वरुपात प्रकट होण्याची निवड केली. देव त्याला समजण्यात आमची मदत करण्यासाठी मुभा देत असला तरीही “देवाला जबरदस्तीने एका पेटीत बंदिस्त” करण्याचा प्रयत्न करता कामा नये हे महत्त्वाचे आहे, अर्थात, त्याच्यावर अशा मर्यादा घालणे ज्या त्याच्या स्वभावासाठी अनुरूप नाहीत.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देव पुरुष आहे की स्त्री?
© Copyright Got Questions Ministries