settings icon
share icon
प्रश्नः

प्रत्येकाजवळ ‘देवाच्या आकाराचे छिद्र’ आहे काय?

उत्तरः


“देवाच्या-आकाराचे छिद्र” संकल्पना असे सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या प्राणात/आत्म्यात एक पोकळी असते जी केवळ देवच भरू शकतो. “देवाच्या-आकाराचे छिद्र” म्हणजे स्वतःच्या बाहेरील, काहीतरी अतींद्रिय, काहीतरी “इतर” साठी मानवी अंतःकरणाची उत्कट इच्छा. उपदेशक 3:11 देव “मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना” ठेवत असल्याचा उल्लेख आहे. देवाने मानवास त्याच्या सार्वकालिक हेतूसाठी बनविले आहे आणि फक्त देवच आपली अनंतकाळची इच्छा पूर्ण करू शकतो. सर्व धर्म देवाशी “संबंध” स्थापन करण्याच्या जन्मजात इच्छेवर आधारित आहे. ही इच्छा केवळ देवच पूर्ण करू शकतो, आणि म्हणूनच त्याची तुलना “देवाच्या आकाराच्या छिद्राशी” केली जाऊ शकते.

तथापि, समस्या अशी आहे की मानवजात या छिद्राकडे दुर्लक्ष करते किंवा देवाला सोडून इतर गोष्टींनी ते भरण्याचा प्रयत्न करते. यिर्मया 17:9 मध्ये आपल्या अंतःकरणाच्या स्थितीचे वर्णन करण्यात आले आहे: “हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?” शलमोन त्याच संकल्पनेचा पुनरूच्चार करतो: “भूतलावर जे काही घडते त्या सर्वांत हे एक अनिष्ट आहे की सर्वांची सारखीच गती होतेय मानवपुत्रांच्या मनात दुष्टता भरलेली असते, त्यांचे मन जन्मभर भ्रांतिमय असते, मग ते मेलेल्यांना जाऊन मिळतात” (उपदेशक 9:3). नवीन करारात असे म्हटले आहे: “कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही” (रोम 8:7). रोम 1:18-२२ मध्ये वर्णन केले आहे की देवाबद्दल काय जाणता येते याकडे मानवजात दुर्लक्ष करते, ज्यात शक्यतो “देवाच्या आकाराचे छिद्र” देखील समाविष्ट आहे आणि त्याऐवजी मानव देवास सोडून इतर कशाचीही आणि सर्व गोष्टींची उपासना करतो.

दुःखाची गोष्ट अशी आहे की अनेक लोक जीवनात अर्थ शोधण्याची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाशिवाय दुसरे काहीतरी शोधण्यात जीवन घालवतात - व्यवसाय, कुटुंब, खेळ. परंतु शाश्वत नसलेल्या या गोष्टींचा पाठपुरावा करताना ते अपूर्ण राहतात आणि आश्चर्य करतात की त्यांचे आयुष्य कधीच समाधानकारक का दिसत नाही. देवास सोडून इतर गोष्टींचा पाठलाग करणारे बरेच लोक काही काळासाठी “आनंद” मिळवतात यात काही शंका नाही. परंतु जेव्हा आपण जगातील सर्व ऐश्वर्य, यश, सन्मान आणि सामर्थ्य लाभलेल्या शलमोनाचा विचार करतो - तेव्हा थोडक्यात, लोक या आयुष्यात ज्या गोष्टींच्या शोधात असतात - त्यापैकी कोणतीही गोष्ट अनंतकाळाची इच्छा परिपूर्ण करीत नाही. त्याने त्या सर्वांना “व्यर्थ” आहेत असे घोषित केले याचा अर्थ असा की त्याने या गोष्टी प्राप्त करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला कारण त्यांनी त्याला समाधान लाभले नाही. शेवटी तो म्हणाला, “आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळय मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे” (उपदेशक12:13).

ज्याप्रमाणे चौरस खुंटी गोल छिद्र भरू शकत नाही, तसेच आपल्यातील प्रत्येकाच्या जीवनात असलेले “देवाच्या आकाराचे छिद्र” देवावाचून इतर कोणीही अथवा कशानेही भरू शकत नाही. येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे केवळ देवाशी वैयक्तिक संबंध ठेवूनच “देवाच्या आकाराचे छिद्र” भरले जाऊ शकते आणि अनंतकाळची इच्छा पूर्ण होऊ शकते.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

प्रत्येकाजवळ ‘देवाच्या आकाराचे छिद्र’ आहे काय?
© Copyright Got Questions Ministries