प्रश्नः
इस्लाम म्हणजे काय आणि मुस्लिम लोक काय मानतात?
उत्तरः
इस्लाम धर्माची सुरुवात ई. स. 7 व्या शतकाच्या सुरुवातीला मुहम्मद नावाच्या व्यक्तीने केली होती. त्याने असा दावा केला की गॅब्रिएल देवदूत त्याला भेटला. या देवदूतांच्या भेटी दरम्यान, ज्या मुहम्मदच्या मृत्यूपर्यंत सुमारे 23 वर्षे चालल्या होत्या, त्या देवदूताने मोहम्मदला ईश्वराचे शब्द (अरबी आणि मुस्लिम लोकांच्या द्वारे "अल्लाह" म्हणून संबोधले) हेतुपूर्वक उघड केले. या निर्धारित खुलासा मध्ये इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण, याचा समावेश केलेला आहे. इस्लाम शिकवते की कुराण हा अंतिम अधिकार व अल्लाहचे शेवटचे प्रकटीकरण आहे.
मुस्लिम लोक, इस्लामचे अनुयायी, कुराणला अल्लाहचा अद्वितीय आणि परिपूर्ण शब्द मानतात. याशिवाय, बरेच लोक कुराणच्या इतर भाषेच्या आवृत्ती नाकारतात. अनुवाद केलेली कुराणची वैध आवृत्ती नाही, जी फक्त अरबीमध्ये अस्तित्वात आहे. जरी कुराण हे मुख्य पवित्र पुस्तक असले तरी सुन्नाहला धार्मिक उपदेशांचे दुसरे स्रोत मानले जाते. मुहम्मदने जे काही बोलले, केले आणि स्वीकृत केले याबद्दल सुन्नत मुहम्मदच्या मित्रांच्याद्वारे लिहिलेले होते.
इस्लामचा मुख्य विश्वास असा आहे की अल्लाह हा एकच खरा देव आहे आणि मुहम्मद अल्लाहचा संदेष्टा होता. केवळ या मान्यतांना सांगून एखादी व्यक्ती इस्लाममध्ये परिवर्तीत होऊ शकते. “मुस्लिम” या शब्दाचा अर्थ “जो अल्लाहच्या अधीन आहे.” इस्लाम हा एक खरा धर्म असण्याचा दावा करतो आहे की ज्यापासून इतर सर्व धर्म उत्पन्न झाले आहेत (ज्यू धर्म आणि ख्रिस्ती यासह ).
मुस्लिम लोक त्यांचे जीवन पाच खांबावर आधारतात:
1. विश्वासाची साक्ष: "देव (अल्लाह) शिवाय खरा देव नाही आणि मुहम्मद हा देवाचा संदेशवाहक (प्रेषित) आहे."
2. प्रार्थना: दररोज पाच प्रार्थना केल्या पाहिजेत.
3. देणे: एखाद्याने गरजूंना देणे आवश्यक आहे, कारण सर्वकाही अल्लाहकडून आले आहे.
4. उपवास: अधूनमधून उपवास व्यतिरिक्त सर्व मुस्लिम लोकांनी रमजान (इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना) साजरा करताना उपवास करणे आवश्यक आहे.
5. हजः मक्काची तीर्थयात्रा आयुष्यात एकदा तरी (इस्लामिक कॅलेंडरच्या बाराव्या महिन्यात) करावी.
मुस्लिम लोकांना आज्ञाधारकतेची चौकट या पाच सिद्धांतांना गंभीरपणे आणि शब्दशः घेतले जाते. मुस्लिम लोकांचा स्वर्गात प्रवेश या पाच खांबाच्या आज्ञापालनावर अवलंबून आहे.
ख्रिस्तीत्व संबंधात, इस्लाममध्ये अनेक समानता आणि महत्त्वपूर्ण फरक आहेत. ख्रिस्तीत्व प्रमाणे इस्लाम देखील एकेश्वरवादी आहे, परंतु ख्रिस्तीत्वच्या विरोधात इस्लाम त्रीएक ची संकल्पना नाकारतो. इस्लाम पवित्र शास्त्राचे काही भाग जसे की कायदा आणि सुसामाचार स्वीकारतो, परंतु त्यातील बहुतेक गोष्टी निंदनीय व निर्विवाद म्हणून नाकारले जातात.
इस्लामचा असा दावा आहे की येशू हा केवळ संदेष्टा होता, देवाचा पुत्र नाही (मुस्लिमांचा विश्वास आहे की फक्त अल्लाहच देव आहे, आणि त्याला एक पुत्र कसा असू शकतो? ). त्याऐवजी, इस्लामचा दावा आहे की येशू जो कुमारीतून जन्मला असला तरी त्याला पृथ्वीच्या मातीपासून आदामप्रमाणेच बनवले गेले होते. मुस्लिम लोक असे मानतात की येशू वधस्तंभावर मेले नव्हते; अशा प्रकारे, ते ख्रिस्तीत्वच्या महत्वाच्या शिक्षणामधील एका गोष्टीला नकार देतात.
शेवटी, इस्लाम शिकवते की चांगल्या गोष्टी केल्यामुळे आणि कुरआनच्या आज्ञा पाळल्यामुळे स्वर्ग प्राप्त होतो. याउलट पवित्र शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की मनुष्य पवित्र देवाला मोजमाप करू शकत नाही. केवळ त्याची दया आणि प्रेमामुळे ख्रिस्तवरील विश्वासाच्या द्वारे पापी लोकांचे तारण होऊ शकते (इफिसकरांस पत्र 2: 8-9).
स्पष्टपणे, इस्लाम आणि ख्रिस्तीत्व दोन्ही पण सत्य असू शकत नाहीत. एकतर येशू महान संदेष्टा होता, किंवा मुहम्मद होता. एकतर पवित्रशास्त्र हे देवाचे वचन आहे किंवा कुराण आहे. एकतर तारणहार म्हणून येशू ख्रिस्तला प्राप्त करून किंवा पाच खांबांना पाहून तारण प्राप्त केले जाते. पुन्हा, दोन्ही पण धर्म खरे असू शकत नाहीत. हे सत्य, महत्त्वपूर्ण क्षेत्रात दोन धर्मांचे विभक्त होण्याचा शाश्वत परिणाम आहे.
English
इस्लाम म्हणजे काय आणि मुस्लिम लोक काय मानतात?