प्रश्नः
येशू हा मनुष्याचा पुत्र होता याचा काय अर्थ आहे?
उत्तरः
नव्या करारात येशूचा उल्लेख “मनुष्याचा पुत्र” म्हणून 88 वेळा करण्यात आला आहे. “मनुष्याचा पुत्र” या वाक्प्रचाराचा पहिला अर्थ दानीएल 7:13-14 मधील भविष्यवाणीचा उल्लेख म्हणून आहे, “तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आलाय तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, ह्यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिलीय त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहेय त्याचे राज्य अविनाशी आहे.” ”मनुष्याचा पुत्र” हे वर्णन मशीहाचे नाव आहे. येशूला प्रभुत्व आणि वैभव आणि राज्य देण्यात आले होते. जेव्हा येशूने या वाक्प्रचाराचा उपयोग केला, तेव्हा तो मनुष्याच्या पुत्राविषयीची भविष्यवाणी स्वतःस लागू करीत होता. त्या युगातील यहूदी लोक या वाक्प्रचाराशी अगदी परिचित असतील आणि हे जाणत असतील की तो कोणाचा उल्लेख करतो. येशू स्वतःला मशीहा किंवा ख्रिस्त म्हणून घोषित करीत होता.
“मनुष्याचा पुत्र” या वाक्प्रचाराचा दुसरा अर्थ हा आहे की येशू हा खरोखर मनुष्य होता. परमेश्वराने संदेष्टा यहेजकेल याला 93 वेळा “मनुष्याचा पुत्र” म्हटले. परमेश्वर यहेजकेलला मनुष्य प्राणी म्हणत होता. मनुष्याचा पुत्र हा मनुष्य आहे. येशू हा पूर्ण देव होता (योहान 1:1), पण तो मनुष्यही होता (योहान 1:14). 1 योहान 4:2 आम्हाला सांगते, “देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा: देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो तो देवापासून आहे.“ होय, येशू देवाचा पुत्र होता - तो तत्वरूपात देव होता. होय, येशू हा मनुष्याचा पुत्र देखील होता - तो त्याच्या तत्वरूपात मनुष्य होता. सारांश म्हणजे, “मनुष्याचा पुत्र” हा वाक्प्रचार दर्शवितो की येशू हा मशीहा आहे आणि हे की तो खरोखर मनुष्य आहे.
English
येशू हा मनुष्याचा पुत्र होता याचा काय अर्थ आहे?