प्रश्नः
येशू त्यांचे मरण आणि पुनरुत्थाना दरम्यान नरकात गेले होते का?
उत्तरः
या प्रश्ना संबंधात खूप गोंधळ आहे. येशू क्रूसावर त्याच्या मृत्युनंतर नरकात गेला की संकल्पना प्रेषितांच्या पंथा पासून प्रामुख्याने येते, जे विषद करते "तो नरकात खाली उतरला." काही पवित्र शास्त्र देखील आहेत, ते अनुवादित कसे आहेत त्यावर येशू “नरकात” गेले होते का त्याचे वर्णन केले आहे या समस्येचा अभ्यास करता, बायबल आपणास मृत क्षेत्र याबद्दल काय शिकवते ते प्रथम समजून घेणे महत्वाचे आहे.
हिब्रू धर्मशास्त्रात मृत क्षेत्राचे वर्णन करण्यासाठी शेओल हा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ "मृतांची जागा" किंवा "गेलेल्या जीवांचे /आत्म्यांचे स्थान." नवीन करारामध्ये ग्रीक समतुल्य शब्द म्हणजे अधोलोक जे "मृतांच्या स्थाना" च्या संदर्भात आहे. नवीन करारातील पवित्र शास्त्रात तीचे वर्णन असे केले आहे की ती एक तात्पुरती जागा आहे जेथे आत्मे पुनुरुत्थान आणि निवाड्याच्या दरम्यान वाट बघत असतात. प्रकटीकरण 20: 11-15 अधोलोक आणि अग्नीचे तळे यांच्या दरम्यान फरक स्पष्ट करते. अग्नीच्या तळ्यात गमावलेले आत्मे यांचे कायम व अंतिम ठिकाण आहे. अधोलोक, मग, एक तात्पुरती जागा आहे. अनेक लोक अधोलोक आणि अग्नीच्या तळ्याला “नरक” म्हणतात आणि यामुळे गोंधळ उडतो. येशू त्याच्या मृत्यूनंतर यातनाच्या ठिकाणी गेले नाही, तर ते अधोलोकाला गेले.
शेओल/ अधोलोक दोन भागात विभागल्या गेलेले आहे- त्यापैकी एक पवित्र स्थान आणि दुसरे न्यायाचे ठिकाण होते (मत्तय 11:23; 16:18, लूक 10:15; 16:23 कृत्ये 2: 27-31). जतन झालेले आणि हरवलेल्या आत्म्यांना बायबल मध्ये "अधोलोक" म्हटले आहेत. जतन झालेल्यांना "अब्राहामाचे हृदय " (केआयवी) किंवा "अब्राहामाची बाजू" (एनआयवी) लूक 16:22 आणि त्याला लूक 23:43 मध्ये "स्वर्ग" म्हणतात. जतन न केलेल्या लोकांना लूक 16:23 मध्ये "नरक" (केआयवी) किंवा "अधोलोक" (एनआयवी) म्हटले जाते. जतन झालेल्या आणि हरवलेल्या लोकांचे विभाजन "मोठ्या दरी" ने झाले आहे (लूक 16:26). येशूचा मृत्यू झाला तेव्हा तो पवित्र बाजूला गेला आणि तेथून त्याने विश्वासणारे लोक सोबत घेतले व त्यांना घेवून स्वर्गात गेला (इफिस 4: 8-10). शेओल/ अधोलोकची न्याय बाजू कायम आहे. सर्व विश्वास न ठेवणाऱ्या मृत व्यक्ती तिथे जातात आणि तेथे भविष्यात त्यांचा शेवटच्या न्यायाची वाट पाहतात. येशू शेओल/ अधोलोकात गेले होते का? होय, इफिस नुसार 4 : 8-10 आणि 1 पेत्र 3: 18-20.
या पैकी काही गोंधळ10-11 राजा जेम्स आवृत्ती मध्ये अनुवादित स्तोत्र 16 च्या परिच्छेदा पासून निर्माण झाले आहे:: "तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात सोडणार नाहीस; असेही तू कबरेत कुजण्याचा अनुभव ईश्वराला देणार नाहीस. . . . तू मला जीवनाचा योग्य मार्ग दाखवणार आहे. "" नरक "या वचनात एक योग्य अनुवाद नाही. एक योग्य अनुवाद "थडगे" किंवा सेओल होईल येशूने त्याच्या बाजूच्या चोराला म्हटले, "आज, तू मजबरोबर सुखलोकात असशील" (लूक 23:43) त्याने असे म्हटले नाही, "मी तुला नरकात भेटेल." येशूचे शरीर थडग्यात होते; त्याचा जीव/ आत्मा नरकात / अधोलोक मध्ये पवित्र जागी गेला. दुर्दैवाने, बायबलच्या अनेक आवृत्तीचे अनुवादक सुसंगत किंवा बरोबर नाही त्यांनी हिब्रू आणि ग्रीक शब्द "शेओल," "अधोलोक," आणि "नरक” यांचे अनुवाद भिन्न प्रकारे केले आहेत."
काही लोकांचे असे मानने आहे की येशू "नरक" किंवा शेओल/अधोलोकच्या यातना भागात आमच्या पापां शिक्षा भोगण्यास गेला. ही कल्पना पूर्णपणे बायबलशी असंगत आहे. वधस्तंभावर येशूचे मरण यामुळेच आपले पाप धुवून निघाले. त्याच्या सांडलेल्या रक्तापासून आमच्या स्वत:चे पापापासून शुद्धीकरण झाले(1 योहान 1: 7-9). वधस्तंभावर लटकलेला असतांना, त्याने स्वत:वर संपूर्ण मानवजातीच्या पापाचे ओझे घेतले. तो आमच्यासाठी पाप झाला होता, " परमेश्वराने, पापहीन येशूला पाप बनविले ते देखील आमच्या साठीच जेणेकरून आम्हाला ईश्वरीय नीतिमत्व प्राप्त होईल” (2 करिंथकर 5:21). पापाचा ठपका आम्हाला वधस्तंभावर त्यावर ओतण्यात येणाऱ्या पापाच्या कपाबद्दल गेथशेमाने बागेत ख्रिस्ताचा लढा समजन्यास मदत होते.
जसा येशूच्या जवळ मृत्यू आला, तसा तो म्हणाला, "हे पूर्ण झाले आहे" (योहान 19:30). आमच्या जागीचे दु: ख पूर्ण झाले आहे. त्याचा जीव / आत्मा अधोलोकात (मृत जागेत) गेला. येशू, "नरक" किंवा अधोलोकच्या यातनेच्या बाजूकडे गेला नाही; तो "अब्राहामाचा बाजूला" गेला किंवा अधोलोक च्या सुखी बाजूकडे गेला. येशू ज्या क्षणी मरण पावला तेंव्हाच त्याच्या यातना संपल्या. पापाची भरपाई झाली होती. मग त्याने त्याच्या शरीराच्या पुनरुत्थानाची आणि त्याच्या ईश्वरीय परत प्रवासाची वाट पाहिली. येशू नरकात गेला होता का? नाही येशू शेओल/ अधोलोकात गेला होता का? होय.
English
येशू त्यांचे मरण आणि पुनरुत्थाना दरम्यान नरकात गेले होते का?