प्रश्नः
स्वर्गीय राज्यासाठी येशुच एकमेव मार्ग आहे का?
उत्तरः
होय, फक्त येशुच स्वर्गीय राज्यासाठी मार्ग आहे.पुष्कळवेळा आम्ही ऐकतो की, चागले कर्म करुन चागल्या गोष्टी करुन आम्ही स्वर्गात जाऊ शकतो. परंतु ते सत्य नाही. पवित्र शास्त्र आम्हला शिकविते की, येशु शिवाय दुसरा कोणताही मार्ग तारणासाठी नाही. त्याच प्रमाणे येशुने स्वत:म्हणटले, “मार्ग,सत्य, व जीवन मीच आहे, माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याजवळ कोणीही जात नाही” (यहोन 14:6)येशु द्वारे स्वर्गीय राज्य आहे. दुसरा मार्ग नाही. जरी आम्ही चांगले व्यक्ती असून, चागले कर्म करीत असून, सर्वात उत्तम ज्ञान असेल,आमची वैयक्तीक पवित्रता असेल परंतु देवाकडे जाण्यासाठी येशु द्वारेच आम्ही जाऊ शकतो.
येशुच एकमेव मार्ग आहे. याचे पुष्कळ कारणे आहेत.त्यापैकी “देवाने येशुला “तारणासाठी निवडले” होते. (I पेत्र 2:4) येशुच स्वर्गातून पृथ्वीवर येवून परत स्वर्गात जाणार होता (योहान-3:13) येशुच एकमेन मनुष्य पृथ्वीवर निष्पाप राहिला (इब्री 4:15 आणि तोच पापी लोकानसाठी निषकलंक असे बलीदान होता. (I योहान 2:2 इब्री 10:26) नियमशास्त्र व संदेष्टेशास्त्र पूर्ण करण्यासाठी येशुच योग्य होता. (मत्तय 5:17) तोच एकमेव मनुष्य होता सर्व दुखा मध्ये मरणामध्ये दृढ व स्थिर राहुशकत होता. ( इब्री -2:14-15) मनुष्या मध्ये व देवामध्ये येशुच एकमेव मध्यस्थ होता. ( I तिमथी 2:5) तोच एक मेव मनुष्य होता की, “देवाने त्याला फार उंच केले” ( फिलिपै 2:9)
येशु स्व:ता ही म्हणाला की, स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी तोच एकमेव मार्ग् आहे. (योहान 14:6) त्यांने स्व:ता विषयी म्हटले जो कोणी मंजूर विश्वास ठेवील तर तो स्वर्गात जाईल ( मत्तय 7:21 ते 27) म्हणाला त्याचे वचन जीवन आहे. (योहान 6:63) त्याने अभिवचन दिले जो कोणी त्याजवर विश्वास ठेवील त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त होईल. (योहान 3:14-15 ) तो मेंढराचे दार आहे. (योहान 10:7) तो जीवनाची भाकर आहे. (योहान 6:35) तो पून:रुत्थान आहे.(योहान 11:25) या सर्व नावासाठी कोणीच मनुष्य योग्य नव्हाता म्हणून येशुच एकमेव मार्ग आहे.
प्रेषीत लोक येशुच्या मरणाविषयी व पुन:रुत्थाना विषयी संदेश देत होते. पेत्र धर्म सभेपुढे सांगत होता की,” तारण दुसऱ्याकोणाकडून नाही, जेणे करुन आपले तारण व्हावयाचे असे दुसरे नाव आकाशाखाली मनुष्या मध्ये दिलेले नाही.” (प्रेषीत 4:12) पौल अंत्युखियामध्ये सभेमध्ये सांगत होता की,”यास्तव बंधु जनहो तुम्हास ठाऊक असो की, याच्याद्वारे पापाची क्षमा तुम्हास गाजवून सांगितली आहे आणि त्यांविषयी मोशाचा नियम शास्त्राने तुम्ही न्यायी ठरत नाही.त्यासर्वान विषयी याच कडून प्रत्येक विश्वास ठेवणारा न्यायी ठरतो. (प्रेषीत 13:38-39) योहान मंडळयाना लिहीत “कारण त्याच्या नामामुळे पूर्ण तुमच्या पापाचे तुम्हास क्षमा झाली आहे” (I योहान 2:12) येशुच्या द्वारेच फक्त पापाची क्षमा होऊ शकते,दुसऱ्या कोणाकडून हे होत नाही.
येशुद्वारेच सर्वकालीक जीवन मिळणे शक्य आहे. येशु प्रार्थना करतोकी, “ सर्वकानी जीवन हेच आहे की, त्यांनी जो तू एकच सत्य देव त्या तुला,ज्याला तू पाठविले, त्या येशू ख्रिस्ताला ओळखाल” (योहान 17:3) आम्ही येशु ख्रिस्ताचा स्विकार करुन व देवाने दिलेल्या तारणाच्या देण्गीचा स्विकार करु आम्हाला येशु ख्रिस्ताचे वधस्तभवरील मरण जे आमच्या पापासठी त्याने सोशिले व तिसऱ्या दिवशी मरणातून उठविले गेला असा विश्वास ठेवावा, “ हे देवाचे नितीत्मव येशु ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे सर्व विश्वास ठेवणाऱ्यासाठी आहे. यात भेद नाही.” ( रोम 3:22 ) एकेवेळी येशुच्या सेवा कार्याच्या दिवसाध्ये पुष्कळ लोक दुसरा तारणारा शोधण्याठी येशुपासून मागे फिरले. येशुने बारा शिष्याना म्हणटले “तुम्हालाही निघुन जाण्याची इच्छा आहे काय ?” ( योहान 6:67) परंतु पेत्राने योग्य उत्तर दिले, “ प्रभुजी आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालीक वचने आपणाजवळच आहेत. आणि आपण देवाचे पवित्र पुत्रा आहा असा आम्ही विश्वास धरिला आहे. व ओळखले आहे” (योहान 6:68-69) इथे सर्वाकालीक जीवन फक्त येशु ख्रिस्ता द्वारेच आहे असे पेत्राच्या विश्वासावरुन समजते.
जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.
English
स्वर्गीय राज्यासाठी येशुच एकमेव मार्ग आहे का?