प्रश्नः
येशू जर देव होता, तर तो पित्याजवळ कशी प्रार्थना करू शकला? येशू स्वतःशी प्रार्थना करीत होता का?
उत्तरः
पृथ्वीवर असतांना येशू त्याच्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करीत असतांना त्याला परमेश्वर म्हणून समजून घेण्यासाठी, आपण हे समजले पाहिजे की येशू स्वतः मनुष्याच्या रूपात येण्यापूर्वी सनातन पिता आणि सनातन पुत्र म्हणून त्याचे सनातन नाते होते. कृपया योहान 5:19-27 वाचा, विशेषतः वचन 23 जेथे येशू शिकवतो की पित्याने पुत्राला पाठविले (योहान 15:10 देखील पहा). जेव्हा तो बेथलेहेमात जन्मला तेव्हा येशू देवाचा पुत्र झाला नाही. तो अनंत काळापासून देवाचा पुत्र आहे, अजूनही देवाचा पुत्र आहे आणि सदैव राहील.
यशया 9:6 आम्हाला सांगते की पुत्र देण्यात आला आणि मुलाचा जन्म झाला. येशू पवित्र आत्म्यासह नेहमीच त्रिएकत्वाचा भाग होता. हे त्रिएकत्व नहमीच होते, परमेश्वर पिता, परमेश्वर पुत्र, परमेश्वर आत्मा, तीन देव नव्हेत, तर तीन व्यक्ति म्हणून अस्तित्वात असलेला एकच देव आहे. येशूने शिकवले की तो आणि त्याचा पिता एक आहे (योहान 10:30), म्हणजे तो आणि त्याचा पिता समान तत्व आणि समान सार असे आहेत. पिता, पुत्र आणि आत्मा देव म्हणून विद्यमान तीन समान व्यक्ती आहेत. या तिघांचा सनातन नातेसंबंध होता आणि तो चालूच आहे.
जेव्हा देवाचा सार्वकालिक पुत्र, येशूने स्वतः पापरहित मानवता धारण केली तेव्हा त्याने स्वर्गीय वैभवाचा त्याग करून एका सेवकाचे रूप धारण केले (फिलिप्पै. 2:5-11). देव-मानव या नात्याने, त्याला त्याच्या पित्याच्या आज्ञेचे पालन करावयास शिकावे लागले (इब्री 5:8), सैतानाने त्याची परीक्षा घेतली, लोकांद्वारे खोटे आरोप लावले गेले, त्याच्या लोकांकडून त्याला नाकारले गेले आणि शेवटी त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले. त्याने स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना सामथ्र्य (योहान 11:41-42) आणि बुद्धी मिळावी म्हणून होती (मार्क 1:35; 6:46).
योहान 1 मधील ख्रिस्ताच्या मुख्य याजकीय प्रार्थनेद्वारे हे सिद्ध झाले की त्याने त्याच्या पित्याची तारणाची योजना पार पाडण्यासाठी आपल्या मानवदेहात त्याच्या पित्यावर त्याचे अवलंबून राहणे दर्शविले. त्याच्या प्रार्थनेने हे दर्शविले की तो शेवटी आपल्या पित्याच्या इच्छेच्या अधीन झाला, जे वधस्तंभावर जाणे होते. आणि देवाच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड (मृत्यू) स्वीकारणे होते (मत्तय 26:31-46). अर्थात, तो कबरेतून सदेह उठला, जे पापाबद्दल पश्चात्ताप करतात आणि तारणहार म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी त्याने क्षमा आणि सार्वकालिक जीवन प्राप्त केले.
पुत्र परमेश्वर देवपित्याकडे प्रार्थना करतो किंवा त्यांच्याशी बोलतो यात कोणतीही समस्या नाही. उल्लेख केल्याप्रमाणे, ख्रिस्त मनुष्य होण्यापूर्वी त्यांचे सनातन नाते होते. हे नाते शुभवर्तमानात चित्रित केले आहे जेणेकरून आपण पाहू शकतो की देवाचा पुत्र त्याच्या मानवस्वभावात आपल्या पित्याच्या इच्छेनुसार कसे कार्य करतो आणि असे करून त्याने आपल्या मुलांसाठी मुक्ती विकत घेतली (योहान 6:38). ख्रिस्ताचे त्याच्या स्वर्गीय पित्याप्रत सतत अधीन राहणे त्याच्या प्रार्थना जीवनाद्वारे समर्थ ठरले व केंद्रित राहिले. ख्रिस्ताच्या प्रार्थनेचे उदाहरण आपण अनुसरण केले पाहिजे.
त्याच्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करतानाही येशू ख्रिस्त पृथ्वीवर देवापेक्षा कमी नव्हता. पित्याच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी आपल्या पापरहित मानवस्वभावातही प्रार्थनाशील जीवन कसे जगले पाहिजे हे तो चित्रित करीत होता. येशूने पित्याला प्रार्थना करणे हे त्रिएकत्वांतील त्याच्या नात्याचे प्रदर्शन होते आणि आपल्याकरता हे उदाहरण आहे की आपल्याला आवश्यक सामथ्र्य व बुद्धीसाठी प्रार्थनाद्वारे आपण देवावर विसंबून राहिले पाहिजे. देव-मानव म्हणून, ख्रिस्ताला मजबूत प्रार्थना जीवन जगण्याची आवश्यकता असल्यामुळे ख्रिस्ताचा अनुयायीही आज तसाच असावा.
English
येशू जर देव होता, तर तो पित्याजवळ कशी प्रार्थना करू शकला? येशू स्वतःशी प्रार्थना करीत होता का?