प्रश्नः
येशूला भाऊबहीण (लहान भाऊबहीण) होते का?
उत्तरः
बायबलमधील कित्येक अध्यायांमध्ये येशूच्या भावांचा उल्लेख आहे. मत्तय 12:46, लूक 8:19, आणि मार्क 3:31 असे म्हणतात की येशूची आई आणि भाऊ त्याला भेटायला आले. बायबल आपल्याला सांगते की येशूचे चार भाऊ होते: याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदा (मत्तय 13:55). बायबल आपल्याला असेही सांगते की येशूच्या बहिणी होत्या, परंतु त्यांची नावे किंवा संख्या दिलेली नाही (मत्तय 13:56). योहान 7:1-10 मध्ये येशूचे भाऊ सणाला जातात, आणि तो मागे राहतो. प्रेषितांची कृत्ये 1:14 मध्ये, त्याचे भाऊ व आई हे शिष्यांसह प्रार्थना करतात असे वर्णन आहे. गलती 1:19 मध्ये उल्लेख आहे की याकोब हा येशूचा भाऊ होता. या परिच्छेदांचा सर्वात नैसर्गिक निष्कर्ष म्हणजे येशूचे सावत्र भाऊ होते असा याचा अर्थ आहे.
काही रोमन कॅथलिक लोक असा दावा करतात की हे “भाऊ” खरोखर येशूचे चुलत भाऊ होते. तथापि, प्रत्येक प्रसंगी “भाऊ” साठी विशिष्ट ग्रीक शब्द वापरला आहे. हा शब्द इतर नातेवाईकांना सूचित करू शकतो, परंतु त्याचा स्वाभाविक आणि शाब्दिक अर्थ शारीरिक भाऊ आहे. “चुलत भावांसाठी” ग्रीक शब्द होता, आणि त्याचा उपयोग करण्यात आला नव्हता. शिवाय, जर ते येशूचे चुलत भाऊ अथवा बहीण होते, तर येशूची आई मरीयाबरोबर असल्याचे त्यांचे वर्णन का केले जाईल? त्याची आई आणि भाऊ त्याला भेटायला येत असताना त्याच्या संदर्भात असे काहीही नाही की ते असा संकेत करतात की ते त्याच्या शाब्दिक, रक्तसंबंधी, सावत्र-भावाशिवाय इतर कोणीही असावेत.
दुसरा रोमन कॅथोलिक युक्तिवाद असा आहे की येशूचे भाऊ व बहिणी पूर्वीच्या लग्नापासून योसेफाची मुले होती. योसेफचे मरीयेपेक्षा अतिशय मोठे वय, पूर्वी लग्न झालेला, अनेक मुले असलेला आणि त्यानंतर मरीयेशी लग्न करण्यापूर्वी विधवा होण्याचा संपूर्ण सिद्धांत कोणत्याही बायबल आधाराशिवाय मांडला गेला. यामध्ये अडचण अशी आहे की मरीयेशी लग्न करण्यापूर्वी योसेफ विवाहित होता किंवा तिला मुले होती याचा बायबलमध्ये संकेत नाही. जर मरीयेशी लग्न करण्यापूर्वी योसेफाला कमीतकमी सहा मुले असतील तर त्यांचा बेथलहेम (लूक 2:4-7) किंवा मिसरच्या प्रवासात (मत्तय 2:13-15) किंवा नासरेथच्या त्यांच्या परत प्रवासात उल्लेख का नाही? (मत्तय 2:20-23)?
हे भाऊबहीण योसेफ आणि मरियेची खरी मुले नव्हती असा विश्वास करण्यास बायबलमध्ये कुठलेही कारण नाही. जे या कल्पनेचा विरोध करतात की येशूला सावत्र भाऊ आणि सावत्र बहीणी होत्या, ते असे करतात, पवित्र शास्त्र वाचून नव्हे, तर मरियेच्या शाश्वत कुमारित्वाच्या कल्पनेच्या पूर्वधारणेवरून, जे स्पष्टपणे पवित्र शास्त्रविरूद्ध आहे: “तरी तिला (मरिया) पुत्र होईपर्यंत त्याने (योसेफ) तिला जाणले नाही; त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले” (मत्तय 1:25). येशूला सावत्र भाऊबहीण होते, जी योसेफ आणि मरियेची मुले होती. पवित्र शास्त्राची ही स्पष्ट आणि असंदिग्ध शिकवण आहे.
English
येशूला भाऊबहीण (लहान भाऊबहीण) होते का?