settings icon
share icon
प्रश्नः

तारणासाठी रोमचा कोणता मार्ग आहे?

उत्तरः


रोम करास पत्रामधुन तारणाच्या मार्गासाठी काही संदर्भ घेतले आहे ज्या द्वदारे साध्या व सोप्या पध्दतीने सुवार्ता सांगितली जाते. आम्हाला तारणाची गरज आहे का? देव आम्हाला कशा प्रकारे तारण देतो व कशा प्रकारे तारण स्विकारु शकतो, तारणाचा काय परिणाम होणार आहे.

तारणसाठी रोमच्या मार्गातील पहिले वचन रोम 3:23 “कारण सर्वानी पाप केले आहे, आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत” या वचनावरुन आम्हला समजते की, कोणीही पवित्र नाही. रोम 3:10-18 ह्या वचानान मध्ये आमच्या जीवनातील पापाचे चित्र स्पष्ट करण्यात आले आहे,तारणासाठी रोमच्या मार्गातील दुसरे वचन रोम 6:23 मध्ये आमच्या पापाच्या परिणामाविषयी शिकविते “पापाचे वेतन मरण आहे परंतु देवाचे कृपा दान आपल्या प्रभु येशु ख्रिस्ता मध्ये सार्वकाल जीवन आहे. “पापाचा परिणाम हा मृत्यु आहे.हा परिणाम शरिरक मृत्यु नाही. तर सार्वकालीक मृत्यु आहे.

तारणासाठी रोमच्या मार्गातील तीसरे वचन येथून सुरुवात होते. जेथे रोम 6:23 समाप्त होते “पण देवाचे कृपा दान आपल्या प्रभु येशु ख्रिस्ता मध्ये सार्वकालीक जीवन आहे” रोम 5:8 सांगते “परंतु देव आपल्यावरल्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला” येशु ख्रिस्त आमच्या पापासाठी मरण पावले! येशुने आमच्या पापाची किंमत चुकविली येशु ख्रिस्ताच्या पुन:रुत्थाना द्वारे असे समजते की, देवाने येशुकडून आमच्या पापाची संपूर्ण किंमत भरुन घेतली देवाने येशुचे बलीदान स्विकारले.

तारणासाठी रोमच्या मार्गातील चौथा थांबा रोम 10:09 हा आहे “जर तू आपल्या मुखाने येशु प्रभु आहे. असे स्विकारशील,आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास दर्शविले तर तुला तारण प्राप्ती होईल्” याच प्रमाणे रोम 10:13 आजून पुन्हा सांगते.” जो कोणी प्रभुचे नाम घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल” येशु आमच्या पापाच्या बदल्यात मरण पावला त्याने पापाची सर्व किंमत चुकविली व सार्वकालीक मरणापासून आमचा बचाव केला. जो कोणी येशु ख्रिस्ताला आपला तारणरा म्हणून स्विकारुन विश्वास करील त्या सर्वानसाठी पापाची क्षमा व तारण आहे.

तारणासाठी रोमच्या मार्गामधील अंतीम स्पष्टीकरण हे आहे. की, तारणाचा परिणाम रोम 5:1 मध्ये उततम उपदेशा द्वारे सांगितले आहे. “ यास्तव आपण विश्वासाने नितीमान ठरविलेले आहो म्हणून आपल्या प्रभु येशु ख्रिस्ता द्वारे आपणास देवा बरोबर असलेल्या शांतीचा लाभ घेडो” येशु ख्रिस्ता द्वारेच देवा बारोबर आमचे शांतीचे नाते होऊ शकते. रोम 8:1 असे शिकविते की, “या वरुन जे ख्रिस्त यशु मध्ये आहेत त्यास आता दंडज्ञा नाही. कारण आमच्या बदल्यात येशु मरण पावले त्यामुळे आम्हाला पापाची शिक्षा होणार नाही. सरतेशेवटी रोम 8:38-39 मध्ये देवाने आम्हाला अभिवचन दिले आहे. “माझी खातरी आहे. कि, मरण ,जीवन, देवदुत, अधिपती, वर्तमान अगर भिविष्य अशा गोष्टी, बले, आकाश ,पाताळ किंवा कोणतीही दुसरी सृष्ट वस्तु , ख्रिस्त येशु आपला प्रभू याच्यामध्ये जी देवाची आपल्यावरील प्रीती आहे. तीच्या पासुन आपल्याला वेगळे करण्यास समर्थ होणार नाही.

काय तुम्ही तारणसाठी रोमच्या मार्गावर चालू इच्छीता का? तर या ठिकाणी सोपी प्रार्थना आहे. ही प्रार्थना तुम्ही देवाला करा.ही प्रर्थना देवाला करणे म्हणजे तारणासाठी येशु ख्रिस्तावर तुम्ही अवलंबून आहे. प्रार्थनेचे शब्द स्वत:हून तूम्हाल वा शकत नाही.फक्त येशुवच्या विश्वासनेच आपले तारण होते! “ देवा मला ठावूक आहे. मी तूज विरुध्द पाप केले आहे. त्या पापा बद्दल मी,शिक्षस पात्र होतो. परंतु येशु ख्रिस्ताने माझ्या पापाची शिक्षा भोगली येशु ख्रिसतावर विश्वासच्य द्वारे माझ्या पापाची क्षमा झाली व तारणासाठी मी, येशुवर विश्वास करितो. तुझ्या सर्व उततम कृपे बद्दल व पाप क्षमे बदृल जे सार्वकालीक जीवनाचे दान आहे.त्याबद्दल उपकार मानतो! “आमेन”

जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

तारणासाठी रोमचा कोणता मार्ग आहे?
© Copyright Got Questions Ministries