प्रश्नः
बायबल गर्भपाताविषयी काय म्हणते?
उत्तरः
बायबल कधीही गर्भपाताच्या विषयास विशिष्टरित्या संबोधित करीत नाही. परंतु, पवित्र शास्त्रात असंख्य शिकवणी आहेत ज्या गर्भपाताविषयी देवाचे मत काय आहे हे उत्तमप्रकारे स्पष्ट करतात. यिर्मया 1:5 आम्हाला सांगते की गर्भाशयात येण्यापूर्वीपासून देव आम्हास जाणतो. स्तोत्र 139:13-16 ही वचने गर्भाशयात आमची उत्पत्ती आणि निर्मिती यात देवाच्या सक्रिय भूमिकेविषयी बोलतात. निर्गम 21:22-25 ही वचने गर्भाशयात शिशुच्या मृत्यूस कारण ठरणार्या व्यक्तीसाठी तोच दंड — मृत्यू — ठरविते जो खून करणार्यासाठी दिला जातो. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की देव गर्भाशयातील शिशुला मानव समजतो जसे पूर्ण वयात आलेल्या प्रौढास. ख्रिस्ती व्यक्तीसाठी, गर्भपात ही स्त्रीच्या निवडीच्या हक्काची बाब नाही. ती देवाच्या स्वरूपात घडविण्यात आलेल्या एका मानवप्राण्याच्या जीवन अथवा मृत्यूची बाब आहे (उत्पत्ती 1:26-27; 9:6).
गर्भपातावरील ख्रिस्ती दृष्टिकोनाविरुद्ध नेहमी उठणारा पहिला वाद आहे "बलात्कार आणि/अथवा कौटुंबिक व्यभिचाराचे काय?" बलात्कारामुळे आणि/अथवा कौटुंबिक व्यभिचारामुळे गरोदर होणे कितीही भयंकर असले तरीही, शिशूचा खून त्याचे उत्तर आहे काय? दोन चुका सर्वकाही सुरळीत करीत नाहीत. बलात्कारामुळे आणि/अथवा कौटुंबिक व्यभिचारामुळे जन्मास आलेल्या बाळकास अशा प्रेमळ कुटूंबास दत्तक देता येते ज्यांस त्यांची स्वतःची मुले होऊ शकत नाहीत, अथवा त्या मुलाचे संगोपन आईने करावे. पुन्हा, बाळ हे पूर्णपणे निर्दोष असते आणि त्याच्या वडिलाच्या दुष्ट कृत्याची शिक्षा त्याला देता कामा नये.
गर्भपातावरील ख्रिस्ती दृष्टिकोनाविरुद्ध सामान्यतः उठणारा दुसरा वाद आहे, "आईचे जीवन धोक्यात असल्यास काय?" प्रामाणिकपणे, गर्भपातावरील समस्येचे उत्तर देण्यास हा सर्वाधिक कठीण प्रश्न आहे. पहिले म्हणजे, आपण हे लक्षात ठेवू या की ही परिस्थिती आज जगात घडणार्या एक टक्के गर्भपातांच्या एक दशमांशापेक्षा कमी गर्भपातामागील कारण आहे. आपले जीवन वाचविण्यासाठी गर्भपात करवून घेणार्या स्त्रियांपेक्षा आपल्या सोयीसाठी गर्भपात करवून घेणार्या स्त्रियांची संख्या फार अधिक आहे. दुसरे म्हणजे, आपण लक्षात ठेवू या की देव हा चमत्कारांचा देव आहे. सर्व प्रकारच्या वैद्यकीय विषमता त्यांच्याविरुद्ध असतांनाही तो आईचे व मुलाचे जीवन वाचवू शकतो. तरीही, शेवटी, ह्या प्रश्नाचा निर्णय पती, पत्नी, आणि देव हेच ठरवू शकतात. अत्यंत कठीण परिस्थितीस तोंड देत असलेल्या दांपत्याने प्रभुजवळ बुद्धीसाठी प्रार्थना करावी (याकोब 1:5) की त्यांनी काय करावे अशी त्याची इ्रच्छा आहे.
आज करण्यात येणार्या 95 टक्क्यांपेक्षा अधिक गर्भपातात अशा स्त्रियांचा सहभाग आहे ज्यांस मूल नको असते. 5 टक्क्यांपेक्षा अधिक गर्भपात बलात्कार, घरगुती व्यभिचार, अथवा आईचे आरोग्य धोक्यात असल्या कारणास्तव केले जातात. आणखी कठीण 5 टक्के उदाहरणांतही, गर्भपात हा कधीही पहिला पर्याय असता कामा नये. गर्भाशयातील मानवप्राण्याचे जीवन इतके मूल्यवान आहे की त्या मुलास जन्मास येण्यासाठी सर्व प्रकारचा प्रयत्न केला जावा.
ज्यांनी गर्भपात करवून घेतला आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे की गर्भपाताचे पाप इतर कुठल्याही पापापेक्षा कमी क्षम्य नाही. ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, सर्व पापांची क्षमा मिळू शकते (योहान 3:16; रोमकरांस पत्र 8:1; कल्लसैकरांस पत्र 1:14). ज्या स्त्रीने गर्भपात करवून घेतला आहे, ज्या पुरुषाने गर्भपातास प्रोत्साहन दिले आहे, अथवा ज्या डाॅक्टरने गर्भपात केला आहे — ते सर्व येशू ख्रिस्ताठायी विश्वासाद्वारे क्षमा प्राप्त करू शकता.
English
बायबल गर्भपाताविषयी काय म्हणते?