प्रश्नः
घेण्याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?
उत्तरः
जे पालक कोणत्याही कारणास्तव मुलांची देकभाल करू शकत नाहीत अशांना मुले दत्तक देणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. हे असे अनेक जोडप्यांच्या प्रार्थनेचे उत्तर असू शकते ज्यांना स्वतःची मुले होऊ शकली नाहीत. काहींना मुले दत्तक घेणे म्हणजे जैविकदृष्ट्या स्वत:च्या नसलेल्या मुलांबरोबर त्यांचे कुटुंब वाढवून पालक म्हणून त्यांचा प्रभाव वाढविणे सुधीचे होते. धर्मशास्त्रामध्ये दत्तक घेणे याविषयी अनुकूलतेने सांगितले गेले आहे.
निर्गम पुस्तकात योखबेद नावाच्या एका इब्री स्त्रीची गोष्ट आहे जिला फारोने नगरातील सर्व इब्री बालकांना ठार मारण्याचा आदेश दिला होता त्या काळात मुलगा झाला (निर्गम 1:15-22). योखबेदने एक टोपली घेतली, त्यामध्ये पाणी जाऊ नये असे केले आणि बाळाला टोपलीमध्ये ठेऊन नदीच्या पाण्यावर सोडून दिले. फारोच्या एका मुलीने ती टोपली पाहिली आणि त्या बाळाला परत आणले. शेवटी तिने त्याला राजघराण्यात दत्तक घेतले आणि त्याचे नाव मोशे ठेवले. तो देवाचा विश्वासू आणि धन्य सेवक बनला (निर्गम 2:1-10).
एस्तेरच्या पुस्तकात एस्तेर नावाची एक सुंदर मुलगी असून तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या चुलतभावाने तिला दत्तक घेतले आणि ती राणी बनली. देवाने तिला यहुदी लोकांच्या सुटकेसाठी वापरात आणले. नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म मनुष्याच्या संततीतून न होता पवित्र आत्म्याद्वारे झाला (मत्तय 1:18). त्याच्या आईचा पती जो योसेफ होता त्याने त्याला दत्तक घेऊन त्याचा स्वतःच्या मुलाप्रमाणे स्वीकार केला.
एकदा आपण ख्रिस्ताला आपले हृदय देतो आणि त्याला एकमेव तारणारा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवतो तेंव्हा, देव स्वतः म्हणतो की आपण त्याच्या कुटुंबाचा एक हिस्सा होतो – हे मानवी संकल्पनेच्या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे नव्हे तर दत्तक घेऊन होते. “कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे” (रोमकरांस पत्र 8:15). त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला दत्तक घेऊन कुटुंबामध्ये आणणे हे निवडीने आणि प्रेमाद्वारे केले जाते. “त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते” (इफिसकरांस पत्र 1:5). ज्याप्रमाणे देव येशू ख्रिस्ताला तारणहारा म्हणून स्वीकारल्यास आपल्याला त्याच्या अध्यात्मिक कुटुंबात दत्तक म्हणून स्वीकारतो, त्याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्या स्वतःच्या शारीरिक कुटूंबामध्ये मुले दत्तक घेण्याचा प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे.
स्पष्टपणे, दत्तक घेणे याविषयी भौतिक अर्थाने आणि अध्यात्मिक दृष्टीने देखील शास्त्रात अनुकूल प्रकाश दर्शविला गेला आहे. दत्तक घेतलेले आणि दत्तक घेण्यात येणारे अशा दोघांनाही मोठा आशीर्वाद मिळतो आणि देवाच्या कौटुंबिक दत्तकानुसार आमच्यासाठी एक विशेषाधिकार आहे.
English
घेण्याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?