प्रश्नः
पृथ्वीचे वय किती आहे? पृथ्वी किती जुनी आहे?
उत्तरः
काही विषयांवर, बायबल अत्यंत स्पष्टपणे सांगते. उदाहरणार्थ, देवाप्रत आमच्या नैतिक कर्तव्यांची आणि तारणाच्या पद्धतीची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तथापि, इतर विषयांवर बायबल अधिक माहिती देत नाही. पवित्र शास्त्राचे काळजीपूर्वक वाचन केल्यावर, आम्हाला असे दिसून येते की विषय जितका महत्वाचा आहे, तितके प्रत्यक्षपणे बायबल त्या विषयास उद्देशून बोलते. दुसर्या शब्दांत, "मुख्य गोष्टी स्पष्ट गोष्टी आहेत." पवित्र शास्त्रात ज्या विषयांस स्पष्टपणे संबोधित करण्यात आलेले नाही त्यापैकी एक आहे पृथ्वीचे वय.
पृथ्वीचे वय ठरविण्याचा प्रयत्न करण्याच्या अनेक पद्धती आहेत. प्रत्येक पद्धत काही निश्चित गृहितांवर अवलंबून आहे जे बिनचूक असतील अथवा नसतील. सर्व बायबलमधील शब्दशः भाषा आणि विज्ञानाची शब्दशः भाषा यांच्यातील पंक्तिरेषेत मोडतात.
पृथ्वीचे वय ठरविण्याची एक पद्धत मानते की उत्पत्ती 1 मध्ये मांडण्यात आलेले सहा दिवस अक्षरशः 24 तासांचे दिवस होते आणि उत्पत्तीच्या कालानुक्रमात आणि वंशावळीत कुठलेही अंतर नव्हते. उत्पत्तीच्या वंशावळींत यादीबद्ध करण्यात आलेली वर्षे नंतर जोडून उत्पत्तीपासून जुन्या कराराच्या निश्चित व्यक्तींपर्यंत अंदाजे काळ ठरविला जातो. ह्या पद्धतीचा उपयोग करून, आम्ही पृथ्वीचे वय सुमारे 6000 वर्षांचे ठरवू शकतो. हे समजणे महत्वाचे आहे की बायबल कोठेही पृथ्वीचे वय स्पष्टपणे सांगत नाही — ही गणना करण्यात आलेली संख्या आहे.
पृथ्वीचे वय ठरविण्याची दुसरी पद्धत आहे रेडियोमेट्रिक (कार्बन) डेटिंग, भूशास्त्रीय चक्र इत्यादी साधनांचा उपयोग करणे. वेगवेगळîा पद्धतींची तुलना करण्याद्वारे, व ते जुळतात का हे पाहून वैज्ञानिक हे ठरवितात की ग्रह किती जुना आहे. ह्îा पद्धतीचा उपयोग करून हे ठरविले जाते की पृथ्वीचे वय सुमारे 4 ते 5 अब्ज वर्षांचे आहे. हे समजणे महत्वाचे आहे की पृथ्वीच्या वयाचे प्रत्यक्ष मूल्यमापन करण्याचे कुठलेही साधन नाही — ही गणनागत संख्या आहे.
पृथ्वीचे वय निश्चित करण्यासाठी या दोन्ही पद्धतींमध्ये संभाव्य त्रुटि आहेत. असे धर्मपंडित आहेत जे हा विश्वास करीत नाहीत की बायबलच्या वचनास उत्पत्तीचे दिवस अक्षरशः 24 तासांच्या काळाचे असण्याची गरज आहे. तसेच, हे मानण्याचे देखील कारण नाही की उत्पत्तीच्या वंशावळीत जाणूनबूझून अंत आहे, ज्यात वंशातील केवळ काही लोकांचा उल्लेख आहे. पृथ्वीच्या वयाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन हे समर्थन करीत नाही की पृथ्वी 6000 वर्षांइतकी लहान आहे, अशाप्रकारच्या पुराव्याचा नाकार करण्यासाठी ह्या प्रस्तावचाची गरज आहे की खरोखर देवाने विश्वाचा प्रत्येक पैलू जुना "दिसावा" असा घडविला आहे. याविरुद्ध दावे असतांनाही, अनेक ख्रिस्ती लोक ज्यांचे मत पृथ्वी जुनी आहे असे आहे ते बायबलला अचूक व ईश्वरप्रेरित मानतात, तथापि काही निवडक वचनांच्या योग्य अर्थबोधासंबंधाने त्यांचे भिन्न मत आहे.
दुसरीकडे, काही प्रमाणात रेडिओमेट्रिक डेटिंग हीच काय ती एकमेव उपयुक्त किंवा अचूक पद्धत आहे, ज्यामुळे पृथ्वीचे वय निश्चित करता येते. भूशास्त्रीय कालमापन, जीवाश्म अभिलेख, आणि आणखी काही गोष्टी पुढे गृहितकांच्या आणि मॉडेलिंग त्रुटींवर अवलंबून आहेत. हेच अधिक व्यापक विश्वाच्या निरीक्षणासंबंधाने खरे आहे; आम्ही फक्त अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींचा एक छोटा भाग पाहू शकतो, आणि जे काही आम्ही "जाणतो" त्यापैकी बरेच काही सैद्धांतिक आहे. थोडक्यात, पृथ्वीच्या वयोमानासंबंधीचे अंदाज देखील चुकीचे आहेत, यावर विश्वास ठेवण्यामागची बरीच कारणे आहेत. शास्त्रोक्त प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विज्ञानावर विसंबून असणे ठीक आहे, परंतु विज्ञानाला अचूक म्हणता येणार नाही.
शेवटी, पृथ्वीचे कालानुक्रमिक वय सिद्ध करता येऊ शकत नाही. दुर्दैवाने, समस्येच्या दोन्ही बाजूंविषयी मते आहेत ज्यांचा असा दावा आहे की त्यांचा अर्थ खरा असण्याची अधिक शक्यता आहे — धर्मशास्त्राच्या दृष्टीने किंवा वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा. खरेतर, ख्रिस्ती धर्म आणि जुनी पृथ्वी यांच्यात परस्परविरोधी मतभेद नाहीत. तरुण पृथ्वीच्या संबंधानेही खरा वैज्ञानिक विरोधाभास नाही. अन्यथा दावा करणारे लोक मतभेद उत्पन्न करीत आहेत जिथे ते असण्याची कुठलीही गरज नाही. व्यक्तीचे मत काहीही का असेना, महत्वाचे हे आहे की देवाचे वचन खरे आणि अधिकृत आहे का त्याचा विश्वास आहे की नाही.
गाॅट ख्रिश्चन मिनिस्ट्रीज तरुण पृथ्वीच्या दृष्टीकोनाच्या पक्षात आहेत. आम्ही विश्वास करतो की उत्पत्ती 1-2 हे शब्दशः आहे, आणि तरुण पृथ्वीचा सृष्टिवाद म्हणजे त्या अध्यायांत मांडलेली प्रत्येक गोष्ट अक्षरशः अगदी तशीच आहे. आम्ही जुन्या पृथ्वी उत्पत्तीवादास पाखंडी म्हणत नाही. आम्हास आमच्या ख्रिस्ती बंधुभगिनींच्या विश्वासासंबंधाने शंका करण्याची गरज नाही जे पृथ्वीच्या वयाबद्दल आपल्याशी असहमत नाहीत. आमचा असा विश्वास आहे की व्यक्ती जुन्या पृथ्वीच्या सृष्टिवादाच्या मतावर विश्वास ठेवू शकतो आणि तरीही ख्रिस्ती विश्वासाच्या मुख्य तत्त्वांचे पालन करू शकतो.
पृथ्वीचे वय यासारखे विषय असे आहेत ज्याविषयी पौलाने विश्वासणार्यांस आग्रह केला की त्यांनी बायबलमध्ये न सांगितलेल्या गोष्टींसंबंधाने वाद घालता कामा नये (रोमकरांस पत्र 14ः1-10; तीतास पत्र 3ः9). पृथ्वीच्या वयोमानासंबंधाने बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेले नाही. पृथ्वीच्या वयोमानाचा पाप, तारण, सदाचार, स्वर्ग किंवा नरक इत्यादी विषयीच्या व्यक्तीच्या मतांशी कुठलाही ध्वन्यार्थ असणे जरूरी नाही, या दृष्टीने पाहता, हा "महत्वाचा विषय" नाही. पृथ्वी कोणी घडविली, का घडविली, आणि आपण परमेश्वर देवाशी कसा संबंध साधावा याविषयी बरेच काही जाणू शकतो, पण बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगत नाही की त्याने तिची रचना नक्की केव्हा केली.
English
पृथ्वीचे वय किती आहे? पृथ्वी किती जुनी आहे?