प्रश्नः
एलियन और यू एफ ओ सारखे काही आहे काय?
उत्तरः
सर्वप्रथम आपण "नैतिक निवड करावयास समर्थ, बुद्धिमत्ता, भावना, आणि इच्छा असलेले जीव" अशी "एलियन्सची" व्याख्या करू या. पुढे, काही वैज्ञानिक तथ्ये:
1. मनुष्याने आमच्या सौरमंडळातील जवळजवळ प्रत्येक ग्रहावर अवकाशयान पाठविले आहे. ह्या ग्रहांचे निरीक्षण केल्यानंतर, आपण बुध आणि गुरूच्या चंद्रावर जीवनमानास योग्य वातावरण असण्याची शक्यता रद्द केली आहे.
2. 1976 मध्ये, अमेरिकेने दोघा जणांस बुध ग्रहावर पाठविले. प्रत्येकाजवळ अशी हत्यारे होती ज्यामुळे ते बुध ग्रहावरील वाळू खोदू शकले आणि तेथे जीवनाचे चिन्ह दिसते का याचे विश्लेषण करू शकले. त्यांना मुळीच काही आढळून आले नाही. याउलट, जर आपण पृथ्वीवरील बहुतेक शुष्क वाळवंटातील मातीचे अथवा अंटार्टिकातील गोठलेल्या बहुतेक घाणीचे विश्लेषण केल्यास, आपणास त्यात अनेक सूक्ष्म जीवनांचा सुळसुळाट दिसून येईल. 1887 मध्ये, अमेरिकेने बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर मार्गशोधक पाठविला. ह्या पर्यटकाने आणखी नमूने घेतले आणि अनेक प्रयोग केले. त्याला जीवनाचे चिन्ह मुळीच दिसून आले नाही. त्या वेळेपासून, बुध ग्रहावर अनेक अभियान सुरू करण्यात आले. परिणाम नेहमीच सारखे होते.
3. खगोलशास्त्रज्ञ दूरच्या सौरप्रणालीत नवीन ग्रहांचा सतत शोध घेत आहेत. काही लोक असा प्रस्ताव मांडतात की अनेक ग्रहांचे अस्तित्व हे सिद्ध करते की विश्वात आणखी कोठेतरी जीवन असले पाहिजे. सत्य हे आहे की यापैकी कोणीही कधी हे सिद्ध केलेले नाही की जीवनाचे समर्थन करणारे काही आहे. पृथ्वी आणि ह्या ग्रहांतील प्रचंड अंतर जीवनास पोषक सामथ्र्य असल्यासंबंधाने कुठलाही निर्णय घेणे अशक्य ठरविते. आमच्या सौरमंडळात केवळ पृथ्वी जीवनास पोषण वातावरण देते, हे जाणून उत्क्रांतीवादी जीवन उत्क्रांत झाले असावे ह्या कल्पनेचे समर्थन करण्यासाठी दुसर्या सौरमंडळात दुसरा ग्रह शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करू पाहतात. तेथे इतर अनेक ग्रह आहेत, पण त्यांत जीवनास योग्य असे वातावरण आहे हे सिद्ध करता येईल असे आपण निश्चितच फारसे काही जाणत नाही.
म्हणून, बायबल काय म्हणते? पृथ्वी आणि मानवजात देवाच्या सृष्टीत अद्वितीय आहेत. उत्पत्ती 1 शिकविते की देवाने सूर्य, चंद्र व तारे घडविण्यापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती केली. प्रेषितांची कृत्ये 17:24, 26 हे सांगतात की "ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभु असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही... त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत."
मूलतः, मानवजात ही निष्पाप होती, आणि जगातील सर्वकाही "फार चांगले" होते (उत्पत्ति 1:31). जेव्हा प्रथम मानवाने पाप केले (उत्पतित 3), त्याच्या परिणाम सर्वप्रकारच्या समस्यांत झाला, यात रोग आणि मृत्यू यांचा समावेश आहे. जरी प्राणी परमेश्वर देवासमोर व्यक्तिगत पाप करीत नाहीत (ते नैतिक जीव नाहीत), तरी त्यांस दुःख सोसावे लागते आणि मरण येते (रोमकरांस पत्र 8:19-22). आम्ही आमच्या पापामुळे ज्या शिक्षेस पात्र होतो ती शिक्षा दूर करावयास येशू ख्रिस्त मेला. जेव्हा तो परत येईल, तेव्हा तो आदामापासून अस्तित्वात असलेला शाप दूर करील (प्रकटीकरण 21-22). लक्षात घ्या की रोमकरांस पत्र 8:19-22 सांगते की सर्व सृष्टी उत्सुकतेने ह्या घटकेची वाट पाहत आहे. हे देखील लक्षात घेणे महत्वाचे आहे की ख्रिस्त मानवजातीसाठी मरावयास आला आणि तो केवळ एकदा मेला (इब्री लोकांस पत्र 7:27; 9:26-28; 10:10).
जर सर्व सृष्टी सध्या शापाधीन दुःख सोसत आहे, तर पृथ्वीवाचून असलेले कोणतेही जीवनसुद्धा दुःख भोगील. जर, वाद घालायचा असेल तर, नैतिक जीव इतर ग्रहांवर राहत असतील, तर ते सुद्धा त्रास सोशित आहेत, आणि जर आता नाही, तर एके दिवशी, जेव्हा सर्वकाही मोठा नाद करीत नाहीसे होईल आणि सृष्टितत्वे तप्त होऊन लयास जातील, तेव्हा त्यांस अवश्य त्रास सोसावा लागेल (पेत्राचे 2 रे पत्र 3:10). जर त्यांनी कधीही पाप केला नव्हते, तर त्यांस शिक्षा देऊन देव अन्याय करणार. पण जर त्यांनी पाप केले होते, आणि ख्रिस्त केवळ एकदाच मेला (जे त्याने पृथ्वीवर केले), तेव्हा ते त्यांच्या पापात पडलेले आहेत, हे सुद्धा देवाच्या चारित्र्याच्या विपरीत आहे (पेत्राचे 2 रे पत्र 3:9). यामुळे आमच्यापुढे एक न सुटणारा विरोधाभास आहे — अर्थात, जर पृथ्वीबाहेर नैतिक जीव नसतील तर.
इतर ग्रहांवरील गैर-नैतिक आणि गैर-संवेदनाक्षम जीवन स्वरूपांचे काय? शेवाळ अथवा कुत्रे किंवा मांजरी अज्ञात ग्रहावर असू शकतात काय? असा अंदाज लावता येईल, आणि यामुळे बायबलच्या पाठास कुठलीच खरा तोटा होणार नाही. पण अशासारख्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतांना ते सिद्ध करणे निश्चितच समस्यात्मक ठरेल की "सर्व सृष्टी दुःख सोसत आहे, असे असतांना दूसरच्या ग्रहांवर दुःख सोसण्यासाठी गैर-नैतिक आणि गैर-संवेदनाक्षम जीवांस उत्पन्न करण्यात देवाचा हेतू काय असेल?"
सारांश रूपात, बायबल आम्हास हा विश्वास धरण्याचे कुठलेही कारण देत नाही की विश्वात इतरत्र जीवन आहे. खरे म्हणजे, बायबल आम्हास अनेक मुख्य कारणे देते की तेथे जीवन का असू शकत नाही. होय, अनेक विचित्र आणि अविवेचित घटना घडतात. तरीही, ह्या घटनांचा संबंध एलियन्सशी अथवा यू एफ ओशी जोडण्याचे कुठलेही कारण नाही. जर ह्या तथाकथित घटनांचे समजण्यासारखे कारण असेल, तर ते आध्यात्मिक कारण असेल, आणि आणखी स्पष्ट सांगावयाचे झाल्यास, त्यांचे मूळ, सैतानी असणे शक्य आहे,
English
एलियन और यू एफ ओ सारखे काही आहे काय?