प्रश्नः
अमिलेनिसम काय आहे?
उत्तरः
ख्रिस्ताचे 1000 वर्षाच्ये राज्य वास्तविक होणार नाही या विश्वास पद्धतीला अमिलेनिसम असे नाव देण्यात आले आहे. या विश्वास प्रणालीला जे लोक मानतात त्यांना अमिलेनिलिस्ट असे म्हणतात. “अमिलेनिसम” अर्थात “amillennialism” मधील उपसर्ग “अ” अर्थात “a” म्हणजे “ना” किंवा “नाही” असा आहे. हे प्रीमिलॅनिलिझम (ख्रिस्ताचे दुसरे आगमन त्याच्या सहस्त्रावधी वर्षापूर्वी येणार आहे आणि सहस्त्रावधी वर्ष राज्य म्हणजे वास्तविक 1000 वर्षांच्या कारकीर्दीचे दृश्य) नावाच्या जास्त प्रमाणात स्वीकारल्या गेलेल्या दृष्टीकोनापेक्षा आणि पोस्टमिलेनिझम (ख्रिस्ताने स्वतः नव्हे तर ख्रिस्ती लोकांनी या पृथ्वीवर राज्य स्थापित केल्यावर ख्रिस्त परत येईल असा विश्वास) नावाच्या कमी प्रमाणात व्यापकपणे स्वीकारल्या गेलेल्या दृश्यावरून भिन्न आहे.
तथापि, अमिलेनिलिस्टशी प्रामाणिकपणे राहता, त्यांचा असा विश्वास नाही की मिलेनियम अजिबात नाही. ते फक्त ख्रिस्ताच्या शब्दशः मिलेनिसम- एक शाब्दिक 1000 पृथ्वीवर राज्य, यावर विश्वास ठेवत नाहीत. त्याऐवजी, त्यांचा असा विश्वास आहे की ख्रिस्त हा आता दाविदाच्या सिंहासनावर बसला आहे आणि सध्याचा मंडळीच्या काळावर ख्रिस्त राज्य करीत आहे. ख्रिस्त आता सिंहासनावर बसलेला आहे यात काही शंका नाही, पण याचा अर्थ असा नाही कि पवित्र शास्त्रात दाविदाचे सिंहासन याच्या उल्लेखाचा संदर्भ याच्याशी आहे. ख्रिस्त आता शासन करीत आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही, कारण तो देव आहे. तरीही याचा अर्थ असा नाही की तो सहस्त्रावधी वर्षांच्या राज्यावर राज्य करीत आहे.
देवाने इस्राएल लोकांशी केलेल्या कराराची व दावीदाशी केलेल्या कराराची पूर्तता करण्यासाठी (2शमुवेल 7:8-16, 23:5; स्तोत्र 89:3-4) या पृथ्वीवर एक शाब्दिक, भौतिक राज्य येणे आवश्यक आहे. यावर शंका घेणे म्हणजे देवाच्या इच्छेवर आणि/किंवा त्याच्या अभिवचने पाळण्याच्या क्षमतेवर प्रश्न उभा करणे असे आहे, आणि यामुळे देवपरिज्ञान शास्त्र अर्थात थिओलॉजी मध्ये इतर समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, जर देव इस्राएल लोकांशी केलेल्या आश्वासनांना“सार्वकालिक” वचन जाहीर करीत असेल आणि जर तो पुन्हा बदलला तर प्रभु येशूवरील विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी तारण वचनांसहित त्याच्या इतर अभिवचनांवर विश्वास कसा ठेवायचा? एकमेव उपाय म्हणजे त्याच्यावर आणि त्याच्या वाचनांवर विश्वास ठेवणे आणि त्याची अभिवचने वास्तविक आणि अक्षरशः पूर्ण होतील हे समजून घेणे.
हे राज्य शाब्दिक, पृथ्वीवरील राज्य असेल याविषयी पवित्र शास्त्रातील स्पष्ट संकेत:
1) ख्रिस्ताचे पाय त्याच्या राज्याच्या स्थापनेपूर्वी जैतूनाच्या डोंगराला प्रत्यक्ष स्पर्श करतील (जखऱ्या 14:4, 9);
2) राज्यादरम्यान, मसीहा पृथ्वीवर न्याय आणि न्यायाची अंमलबजावणी करेल (यिर्मया 23:5-8);
3) राज्य स्वर्गाच्या खाली असल्याचे वर्णन केले आहे (दनिएल 7:13-14, 27);
4) संदेष्ट्यांनी राज्यादरम्यान पृथ्वीवरील बदलांची भविष्यवाणी केली आहे (प्रेषितांची कृत्ये 3:21; यशया 35:1-2, 11:6-9, 29:18, 65:20-22; यहेज्केल 47:1-12; आमोस 9:11-15); आणि
5) प्रकटीकरणातील घटनांच्या कालक्रमानुसार जागतिक इतिहासाच्या समाप्तीपूर्वी पृथ्वीवरील राज्याचे अस्तित्व सूचित होते (प्रकटीकरण 20).
अजून पूर्ण झाली नाही अशा भविष्यवाणीचा अर्थ लावण्याची एक पद्धत आणि शास्त्रामध्ये जे भविष्यवाणी संदर्भात नाही असे वचन आणि पूर्ण झालेली भविष्यवाणी हि आणखीन एक पद्धत वापरल्याने अमिलेनियल दृष्टीकोन येतो. भविष्यवाणी नसलेले शास्त्र आणि पूर्ण झालेल्या भविष्यवाणीचे शब्दशः किंवा सामान्यपणे अर्थ लावला जातो. परंतु, अमिलेनिलिस्ट नुसार, अपूर्ण भविष्यवाणीचा अर्थ आध्यात्मिक किंवा अ-शब्दशः लावणे आवश्यक आहे. अमिलेनिसम ला पाठपुरावा करणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे कि, अपूर्ण भविष्यवाणीचे "अध्यात्मिक" वाचन म्हणजे शास्त्राचे सामान्य वाचन होय. याला ड्युअल हर्मेनेटिक वापरणे म्हणतात (हर्मेनॉटिक्स म्हणजे अर्थाच्या सिद्धांतांचा अभ्यास होय.). अमिलिनेलिस्ट असे गृहित धरते की बहुतेक किंवा सर्व अपूर्ण भविष्यवाणी प्रतीकात्मक, आलंकारिक, अध्यात्मिक भाषेत लिहिली गेली आहे. म्हणून, अमिलिनेलिस्ट या शब्दाच्या सामान्य, संदर्भित अर्थांऐवजी शास्त्रातील त्या भागासाठी भिन्न अर्थ नियुक्त करतात.
अशाप्रकारे अपूर्ण भविष्यवाणीचा अर्थ लावण्याची समस्या ही आहे की यामुळे अनेक प्रकारचे अर्थ निघू शकतात. जोपर्यंत आपण सामान्य अर्थाने शास्त्राचा अर्थ सांगत नाही तोपर्यंत एक अर्थ निघणार नाही. तरी देव जो सर्व शास्त्रवचनांचा अंतिम लेखक आहे त्याने जेंव्हा मानवी लेखकांना लिहिण्यास प्रेरणा दिली त्यावेळी त्याच्या मनात एक विशिष्ट अर्थ होता. जरी शास्त्रवचनांतील वचनांच्या शिकवणी विविध असू शकतात तरी त्याचा अर्थ मात्र एकच आहे आणि तो अर्थ म्हणजे देवाचा अर्थ आहे. तसेच, पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या वास्तविक पूर्ण झाल्या आहेत म्हणून अपूर्ण भविष्यवाण्यासुद्धा वास्तविक पूर्ण होतील हे एक उत्तम कारण आहे. ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याविषयीच्या भविष्यवाण्या वास्तवात पूर्ण झाल्या आहेत. म्हणून, ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या भविष्यवाण्यासुद्धा तंतोतंत वास्तवात पूर्ण झाल्या पाहिजेत. या कारणास्तव, अपूर्ण भविष्यवाणीचे एक रूपकात्मक अर्थ लावणे नाकारले पाहिजे आणि अपूर्ण भविष्यवाणीचे वास्तविक किंवा सामान्य अर्थ लावणे स्वीकारले पाहिजे. अमिलेनिसम असातत्य अर्थ अर्थात इनकन्सीस्टन्ट हर्मेनुटिक्स वापरते, म्हणजे अद्याप पूर्ण न झालेल्या भविष्यवाण्यांपेक्षा पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांचे वर्णन वेगळे करते.
English
अमिलेनिसम काय आहे?