प्रश्नः
देवदूत पुरुष आहेत की स्त्री?
उत्तरः
पवित्र शास्त्रात देवदूतांचा प्रत्येक संदर्भ पुल्लिंगी आहे यात काही शंका नाही. नवीन करारात “देवदूतासाठी” दिलेला ग्रीक शब्द आहे एंजेलॉस, जो पुल्लिंगी आहे. खरे तर, एंजेलॉसचे स्त्रीलिंगी स्वरूप अस्तित्त्वातच नाही. व्याकरणात तीन लिंग आहेत - पुल्लिंग (तो, त्याला, त्याचे), स्त्रीलिंग (ती, तिला, तिचे) आणि नपुसकलिंग (ते). देवदूतांचा उल्लेख कधीही पुल्लिंगीशिवाय अन्य कोणत्याही लिंगात झालेला नाही. बायबलमध्ये देवदूतांच्या अनेक दर्शनांत, देवदूताचा उल्लेख कधीही “ती” किंवा “ते” म्हणून करण्यात आलेला नाही. शिवाय, जेव्हा देवदूत प्रकट झाले, तेव्हा त्यांनी नेहमीच पुरुषांसारखे वस्त्र परिधान केलेले असे (उत्पत्ति 18:2, 16, यहेज्केल 9:2). शास्त्रवचनांमध्ये कोणताही देवदूत कधीही स्त्रीप्रमाणे वस्त्र घातलेला दिसला नाही.
बायबलमध्ये फक्त या देवदूतांचे नाव दिलेले आहे - मीखाएल, गब्रिएल, लूसिफर - ही पुरुषांची नावे आहे आणि सर्वांचा उल्लेख पुल्लिंगात केला गेला आहे. “मीखाएल व त्याचे दूत” (प्रकटीकरण 12:7); “हîा बोलण्याने मरीयेच्या मनात खडबळ उडाली” (लूक 1:29); “हे दैदीप्यमान तार्या, प्रभात पुत्रा” (यशया 14:12). देवदूतांशी संबंधित इतर संदर्भ नेहमीच पुल्लिंगी असतात. शास्ते 6:21 मध्ये, देवदूत “त्याच्या” हातात एक काठी धरतोे. जखर्या एका देवदूताला प्रश्न विचारतो आणि लिहितो की “त्याने” मला उत्तर दिले (जखर्या 1:19). प्रकटीकरणातील सर्व देवदूतांचा उल्लेख “तो” आणि त्यांच्याजवळील वस्तूंचा उल्लेख “त्याची” म्हणून करण्यात आला आहे (प्रकटीकरण 10:1,5; 14:19; 16:2,4,17; 19:17; 20:1).
काही लोक जखर्या 5:9 कडे स्त्रीलिंगी देवदूतांचे उदाहरण म्हणून दाखवतात. हे वचन म्हणते, “मग मी डोळे वर करून पाहिले तेव्हा पाहा, दोन स्त्रिया निघाल्या, त्यांच्या पंखांत वारा भरला होता; त्यांचे पंख करकोच्याच्या पंखांसारखे होते; त्यांनी ती एफा उचलून आकाश व पृथ्वी ह्यांच्या मधल्या मार्गाने नेली.” समस्या अशी आहे की या भविष्यसूचक दृष्टांतात आलेल्या “स्त्रियांना” देवदूत म्हटलेले नाही. त्यांना नाशीयम (“स्त्रिया”) असे म्हटलेले आहे, जसे वचन 7 आणि 8 मध्ये टोपलीत बसलेली स्त्री दुष्टपणाचे प्रतिनिधित्व करते, त्याउलट, जखर्या ज्या देवदूताशी बोलत होता त्याला मलक म्हटलेले आहे, जो “देवदूत” किंवा “संदेश देणार्यापेक्षा” वेगळा शब्द आहे. जखर्याच्या दृष्टांतात स्त्रियांना पंख आहेत हे आमच्या मनात देवदूतांस सूचित करू शकते, परंतु वचन खरोखर काय म्हणते या पलीकडे जाण्याविषयी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. दृष्टांतात वास्तविक प्राणी किंवा वस्तूंचे वर्णन करणे आवश्यक नाही - जखर्या याच अध्यायात यापूर्वी जो उडता पट पाहतो त्याचे वर्णन करा (जखर्या 5:1-2).
लिंगविरहित देवदूतांविषयी गोंधळ मत्तय 22:30 च्या चुकीच्या वाचनामुळे उद्भवतो, ज्यामध्ये असे म्हटले आहे की स्वर्गात लग्न होणार नाही कारण आपण “स्वर्गातील देवदूतांप्रमाणे” असू. विवाह होणार नाही या सत्यतेमुळे काही जणांना असा विश्वास झाला आहे की देवदूत “लिंगरहित” आहेत कारण (अशी विचारसरणी आहेे) लिंगाचे उद्दीष्ट म्हणजे जन्म देणे आहे, आणि लग्न करणे आणि जन्म देणे नसेल, तर लिंगाची गरज नाही. पण एक झेप आहे जी वचनावरून सिद्ध करता येत नाही. लग्न नाही या वस्तुस्थितीचा असा अर्थ नाही की लिंग नाही. पुरुष म्हणून देवदूतांचे बरेच संदर्भ लिंगहीन देवदूतांच्या कल्पनेचा विरोध करतात. देवदूत लग्न करत नाहीत, परंतु आम्ही “लग्न नाही” यावरून “लिंग नाही” अशी झेप घेऊ शकत नाही.
तर भाषेत लिंगास लैंगिकतेच्या बाबतीत समजले जाऊ नये. त्याऐवजी, पवित्र शास्त्रात आत्मिक प्राण्यांना लागू केलेले पुल्लिंगी सर्वनाम लैंगिकतेपेक्षा अधिकाराचा संदर्भ आहेत. देव नेहमीच स्वतःचा उल्लेख पुल्लिंगी म्हणून करतो. पवित्र आत्म्याचे वर्णन “ते” म्हणून कधीच केलेले नाही. देव वैयक्तिक आणि अधिकार बाळगणारा आहे - अशाप्रकारे, पुल्लिंगी व्यक्तीवाचक सर्वनाम. परमेश्वराने आपले सामथ्र्य गाजविण्यासाठी (2 राजे 19:35) स्वर्गीय प्राण्यांना दिलेल्या अधिकारामुळे त्यांना पुल्लिंगी व्यतिरिक्त दुसरे काहीही म्हणणे अयोग्य ठरेल, ते त्याचा संदेश वाहून नेतात (लूक 2:10), पृथ्वीवर त्याचे प्रतिनिधित्व करतात.
English
देवदूत पुरुष आहेत की स्त्री?