settings icon
share icon
प्रश्नः

देवदूतांविषयी पवित्र शास्त्र (बायबल) काय म्हणते?

उत्तरः


देवदूत हे वैयक्तिक आध्यात्मिक प्राणी आहेत ज्यांना बुद्धिमत्ता, भावना आणि इच्छा आहेत, ही गोष्ट चांगल्या आणि वाईट(भुते) दोन्ही प्रकारच्या दूतांविषयी सारखीच सत्य आहे. (लूक 8: 28; 2 करिंथकरास पत्र 11: 3; 1 पेत्र 1:12), देवदूत भावना प्रकट करतात (लूक 2:13; याकोब 2:19; प्रकटीकरण 12:17) आणि त्यांच्या इच्छेचा वापर करतात (लूक 8: 28- 31; 2 तीमथ्य 2:26; यहूदा 6). खरे भौतिक शरीर नसूनही देवदूत हे आत्मिक प्राणी आहेत (इब्री लोकांस 1:14). जरी त्यांच्याजवळ भौतिक शरीर नसले तरीही ते व्यक्तिमत्वे आहेत.

कारण त्यांना निर्माण करण्यात आले, त्यामुळे त्यांचे ज्ञान मर्यादित आहे. याचा अर्थ देव ज्या गोष्टी करतो त्या सर्व गोष्टी त्यांना समजत नाहीत (मत्तय 24:36). मनुष्यापेक्षा त्यांना अधिक ज्ञान असल्यासारखे वाटते, त्याची तीन कारणे असू शकतात प्रथम, देवदूतांना मानवांपेक्षा उच्च प्राण्यांच्या क्रमाने निर्माण केले गेले. म्हणून, ते सहजपणे अधिक ज्ञान प्राप्त करतात. दुसरे , देवदूतांनी पवित्र शास्त्र आणि जगाचा अभ्यास मनुष्यांपेक्षा अधिक पूर्णपणे केला आहे आणि ज्ञान प्राप्त करून घेतले आहे (याकोब 2:19; प्रकटीकरण 12:12). तिसरे म्हणजे, मानवी बांधवांच्या केलेल्या दीर्घ निरीक्षणातून देवदूतांना ज्ञान प्राप्त होते. मानवांप्रमाणे, देवदूतांना भूतकाळाचा अभ्यास करण्याची गरज नाही; कारण त्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच, इतरांनी परिस्थिती कशी हाताळली आहे आणि प्रतिक्रिया दिली आहे हे त्यांना माहिती आहे आणि आम्ही भविष्यात कदाचित अशाच परिस्थितींना कसे तोंड देवू शकतो हे अचूकपणे सांगण्याची शक्यता अधिक आहे.

जरी देवदूतांना इच्छाशक्ती आहे तरी हे देवदूत इतर निर्मिती प्रमाणे देवाच्या इच्छेला अंकित आहेत. चांगल्या देवदूतांना विश्वासनाऱ्याची मदत करण्यासाठी देवाने पाठवले आहे (इब्री 1:14). पवित्र शास्त्रात देवदूत करीत असलेल्या कार्याची माहिती खालीलप्रमाणे नमूद केलेली आहे.

ते देवाची स्तुती करतात (स्तोत्र 148: 1-2; यशया 6: 3). ते देवाची उपासना करतात (इब्री 1: 6; प्रकटीकरण 5: 8-13). देव करत असलेल्या गोष्टी त्यांना आनंदित करतात (ईयोब 38: 6-7). ते देवाची सेवा करतात (स्तोत्र 103: 20; प्रकटीकरण 22: 9). ते देवासमोर हजर होतात (ईयोब 1: 6; 2: 1). ते देवाच्या न्यायाची साधने आहेत (प्रकटीकरण 7: 1; 8: 2). ते प्रार्थनेचे उत्तर देतात (प्रेषितांची कृत्ये 12: 5-10). ते लोकांना ख्रिस्तामध्ये जिंकण्यास मदत करतात (प्रेषितांची कृत्ये 8:26; 10: 3). ते ख्रिस्ती आदेश, कार्य आणि दुःख ह्यांचे निरीक्षण करतात. (1 करिंथ 4: 9; 11:10; इफिसकरास पत्र 3:10; 1 पेत्र 1:12). ते धोक्याच्या वेळी उत्तेजन देतात (प्रेषित 27: 23-24) आणि मृत्यूच्या वेळी नीतिमानांची काळजी घेतात (लूक 16:22).

देवदूतांच्या निर्मितीचा मानवांपेक्षा फार वेगळा क्रम आहे. मृत्यूनंतर माणसं देवदूत बनत नाहीत. देवदूत कधीही मनुष्य बनणार नाहीत, कधीच बनू शकणार नाही, आणि देवदूत कधीच मनुष्य नव्हते, देवाने जसे मानवजातीला निर्माण केले त्याचप्रमाणे देवदूतांची निर्मिती केली. पवित्र शास्त्रामध्ये कोठेही म्हटलेले नाही की देवाने देवदूतांना त्याच्या प्रतीरुपाचा किवा त्याच्या सदृश्य बनविले. (उत्पत्ति 1:26). देवदूत हे आत्मिक प्राणी आहेत, जे काही प्रमाणात शाररीक रूप घेतात. पण प्रत्यक्ष स्वरूपात गृहीत धरल्यास मानव प्रामुख्याने भौतिक प्राणी आहेत, पण आध्यात्मिक दृष्टीने पवित्र देवदूताकडून आपण जी सर्वोच्च गोष्ट शिकू शकतो, ती म्हणजे त्यांचे झटपट कोणताही विलंब न करता, आणि बिनशर्त देवाच्या आज्ञांचे पालन करणे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देवदूतांविषयी पवित्र शास्त्र (बायबल) काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries