प्रश्नः
ख्रिस्तविरोधक कोण आहे?
उत्तरः
ख्रिस्तविरोधकाच्या ओळखीविषयी बरेच अनुमान आहेत. लादिमीर पुतीन, प्रिन्स विल्यम, महमूद अहमदीनेजाद आणि पोप फ्रान्सिस पहिला हे सर्वात लोकप्रिय लक्ष्य आहेत. अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील लक्ष्यस्थानी होते. तर, ख्रिस्तविरोधक कोण आहे आणि आम्ही त्याला कसे ओळखू?
ख्रिस्तविरोधक कोठून येईल याविषयी बायबल खरोखर काहीच सांगत नाही. अनेक बायबल विद्वानांचा असा अंदाज आहे की तो दहा राष्ट्रांच्या राष्ट्रसंघातून आणि/किंवा पुन्हा जन्मास आलेल्या रोमन साम्राज्यातून येईल (दानीएल 7:24-25; प्रकटीकरण 17:7). इतर त्याला यहूदी म्हणून पाहतात जेणेकरून त्याला मशीहा असल्याचा दावा करता यावा. हे सर्व फक्त अनुमान आहेत कारण बायबलमध्ये ख्रिस्तविरोधी कोठून येईल किंवा कोणत्या वंशाचा असेल हे विशिष्टरित्या सांगत नाही. एक दिवस, ख्रिस्तविरोधक प्रकट होईल. 2 थेस्सल 2:3-4 आम्हास सांगते की आपण ख्रिस्तविरोधकास कसे ओळखावे: “कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रकट होईल. तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.”
अशी शक्यता आहे की ख्रिस्तविरोधक प्रकट झाल्यावर जिवंत असलेले बहुतेक लोक त्याच्या ओळखीवर आश्चर्यचकित होतील. ख्रिस्तविरोधक आज जिवंत असेेल किंवा नसेल. मार्टिन ल्यूथरला खात्री होती की त्याच्या काळातला पोप ख्रिस्तविरोधक होता. 1940 च्या दशकात अॅडॉल्फ हिटलर ख्रिस्तविरोधक होता असे पुष्कळांना वाटत होते. गेल्या काही शंभर वर्षांत जगलेल्या इतरांनाही ख्रिस्तविरोधकाची ओखळ पडल्याची खात्री असेल. आतापर्यंत, ते सर्वच चुकले आहेत. आम्ही अनुमान मागे ठेवले पाहिजेत आणि ख्रिस्तविरोधकाविषयी बायबल काय म्हणते यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रकटीकरण 13:5-8 घोषित करते, “त्याला ‘मोठमोठ्या’ देवनिंदात्मक ‘गोष्टी बोलणारे तोंड’ देण्यात आले, व बेचाळीस महिने त्याला आपले ‘काम चालवण्याची’ मुभा देण्यात आली. त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक ह्यांची निंदा करण्यास तोंड सोडले. ‘पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची’ त्याला मुभा देण्यात आली; आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला. ‘ज्या कोणाची’ नावे जगाच्या स्थापनेपासून ‘वधलेल्या कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील.”
English
ख्रिस्तविरोधक कोण आहे?