settings icon
share icon
प्रश्नः

अपोकॅलिप्स म्हणजे काय?

उत्तरः


“अपोकॅलिप्स” हा शब्द ग्रीक भाषेतील अपोकॅल्यूप्सीस या शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ आहे “प्रकट करणे, उघडकीस आणणे, झाकण काढणे” असा आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा उल्लेख कधी कधी “अपोकॅलिप्स आॅफ जाॅन” म्हणजे योहानाचे प्रकटीकरण असा केला जातो कारण यात परमेश्वर प्रेषित योहानास शेवटच्या काळाविषयी प्रगट करीत आहे. याशिवाय, ग्रीक शब्द “अपोकॅलिप्स” प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या ग्रीक मूळ ग्रंथात पहिला शब्द आहे. “अपोकॅलिप्टिक लिट्रेचर” किंवा गूढ साहित्य हा वाक्प्रचार भविष्यातील घटनांचे वर्णन करण्यासाठी प्रतीके, प्रतिमा, आणि संख्या यांचा उपयोग करण्याचे वर्णन करण्यासाठी केला जातो. प्रकटीकरणाबाहेर, अशा गूढ साहित्याची बायबलमधील उदाहरणे आहेत दानीएल अध्याय 7-12, यशया अध्याय 24-27, यहेजकेल अध्याय 37-41, आणि जखर्‍या अध्याय 9-12.

हे गूढ साहित्य प्रतीकरूपात आणि कल्पनाचित्राच्या रूपात का लिहिण्यात आले होते? गूढ किंवा रहस्यमय पुस्तके अशा वेळी लिहिण्यात आली होती जेव्हा त्यांचा संदेश स्पष्ट भाषेत देण्याऐवजी, कल्पनाचित्रांच्या आणि प्रतीकांच्या रूपात लपवून ठेवणे बुद्धिमत्तेचे कार्य होते. याशिवाय, प्रतीकात्मकता काळ आणि स्थळ याविषयीचे रहस्यमय तत्व निर्माण करीत असे, तथापि, अशा प्रतीकात्मकतेचा उपयोग गोंधळ निर्माण करण्यासाठी नव्हता, तर कठीण समयी देवाच्या अनुयायांस शिकविण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी होता.

त्याच्या विशिष्टतः बायबल आधारित अर्थापलीकडे, “अपोकॅलिप्स” या संज्ञेचा उपयोग बरेचदा शेवटच्या काळाचा उल्लेख करण्यासाठी, किंवा विशिष्टरित्या शेवटच्या काळातील अंतिम घटनांचा उल्लेख करण्यासाठी केला जातो. ख्रिस्ताच्या दुसर्‍या आगमनासारख्या शेवटच्या काळातील घटना आणि हर्मगिद्दोनची लढाई यांचा उल्लेख कधी कधी अपोकॅलिप्स म्हणून केला जातो. अपोकॅलिप्स परमेश्वराचे, त्याचे क्रोधाचे, त्याच्या न्यायाचे अंतिम प्रगट होणे असेल, आणि शेवटी त्याच्या प्रेमाचे. येशू ख्रिस्त हा परमेश्वराचे परमश्रेष्ठ “अपोकॅलिप्स” म्हणजे प्रगटीकरण होय जे परमेश्वराने आम्हावर प्रगट केले आहे (योहान 14:9; इब्री 1:2).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

अपोकॅलिप्स म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries