settings icon
share icon
प्रश्नः

पूर्ण भरपाई अर्थात अटोनमेन्ट चे विविध सिद्धांत कोणते आहे?

उत्तरः


पूर्ण भरपाई अर्थात अटोनमेन्ट चे विविध सिद्धांत कोणते आहे?

उत्तर: सभेच्या संपूर्ण इतिहासामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती किंवा संप्रदायाने काही खरी तर काही खोटी अशी अटोनमेन्टची अनेक मते मांडली आहेत. विविध मतांमागील एक कारण म्हणजे जुना आणि नवीन असे दोन्ही करार ख्रिस्ताच्या भरपाईविषयी अनेक सत्य प्रकट करतात, आणि त्यामुळे भरपाईची समृद्धी किंवा भरपाई समजावून सांगणारा कोणताच “सिद्धांत” अशक्य नसला तरी अवघड आहे. शास्त्रवचनांचा अभ्यास करतांना आपण पूर्ण भरपाईचे एक समृद्ध आणि बहुआयामी चित्र शोधतो कारण ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या पूर्ततेविषयी पवित्र शास्त्रामध्ये बरीच परस्परसंबंधित सत्ये दिली गेली आहेत. पूर्ण भरपाई वेगवेगळ्या सिद्धांतांमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे देवाच्या लोकांच्या अनुभवावरून आणि दृष्टिकोनातून जुन्या करारातील त्यागाच्या किंवा यज्ञाच्या प्रणालीला समजून घेणे आवश्यक आहे.

ख्रिस्ताची पूर्ण भरपाई, त्याचा हेतू आणि प्राप्ती, हा एक असा समृद्ध विषय आहे ज्यावर भरपूर काही लिहिले गेले आहे. एक किंवा अनेक वेळा लिहिण्यात आलेल्या पुष्कळशा सिद्धांतांचा हा लेख थोडक्यात आढावा घेईल. पूर्ण भरपाई च्या भिन्न दृश्यांकडे पाहताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की मनुष्याच्या पापीपणाबद्दल किंवा भरपाई प्रतिस्थापनेची प्रकृती ओळखत नाही असे कोणतेही मत सर्वात कमी व सर्वात वाईट सैद्धांतिक आहे.

सैतानाला खंडणी अर्थात रॅन्सम टू सेटन: हा दृष्टीकोन ख्रिस्ताने केलेली पूर्ण भरपाई हि सैतानाला खंडणी म्हणून दिली जी मानवाचे स्वातंत्र्य विकत घेण्यासाठी आणि सैतानाच्या गुलामगिरीतून सोडण्यासाठी देण्यात आलेली आहे असे दिसते. हे मनुष्याची आत्मिक स्थिती सैतानाचे गुलाम आहे या विश्वासावर आधारित आहे आणि ख्रिस्ताच्या मृत्यूचा उद्देश देवाचा सैतानावर विजय मिळविणे हा होता. या सिद्धांताला शास्त्रीय पाठबळ फारच कमी आहे आणि मंडळीच्या संपूर्ण इतिहासामध्ये याचे समर्थक फारच कमी आहेत. देवा ऐवजी सैतानाकडून पापासाठी ची किंमत मागितली जाते हे पाहणे अपवित्र शास्त्रीय आहे. अशाप्रकारे, पवित्र शास्त्रात जसे दिसते त्याप्रमाणे देवाच्या न्यायाच्या मागण्यांकडे ती पूर्णपणे दुर्लक्ष करते. सैतानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन जितका असायला हवा प्यापेक्षा जास्त इथे दिसून येतो आणि जितके समर्थ सैतानाकडे आहे त्याहून जास्त इथे पहिले जाते. पापी लोक सैतानाचे काही देणे लागतात या कल्पनेला कोणतेही शास्त्रीय समर्थन नाही, परंतु शास्त्रवचनांमधून आपल्याला पापाच्या भरपाईच्या मोबदल्याची मागणी करणारा केवळ देवच आहे हे दिसून येते.

पुनःप्राप्ती सिद्धांत अर्थात रिकॅपिट्यूलेशन थिअरी: या सिद्धांतात असे म्हटले आहे की ख्रिस्ताच्या पूर्ण भरपाईने मानवजातीच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यापासून उलट आज्ञापालन केले. असा विश्वास आहे की ख्रिस्ताच्या जीवनाने मानवी जीवनाच्या सर्व स्तरांची पुनःप्राप्ती केली आणि असे केल्याने आदामाने सुरू केलेल्या आज्ञाभंगाचा मार्ग उलट मार्गी झाला. या सिद्धांताला शास्त्रीयदृष्ट्या समर्थन दिले जाऊ शकत नाही.

नाट्यमय सिद्धांत अर्थात ड्रामॅटिक थेअरी: हा दृष्टीकोन ख्रिस्ताची पूर्ण भरपाई हे बऱ्या आणि वाईटाच्या दरम्यान असलेल्या दैवी संघर्षावर आणि मनुष्याच्या सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यावर विजय सुरक्षित करतो. ख्रिस्ताचा मृत्यू म्हणजे सैतानावर देवाचा विजय सुनिश्चित करणे आणि जगाला दुष्टाईच्या गुलामगिरीतून सोडविण्याचा मार्ग उपलब्ध करुन देणे असा आहे.

गूढ सिद्धांत अर्थात मिस्टिकल थेअरी: गूढ सिद्धांत हा ख्रिस्ताच्या पूर्ण भरपाईला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याच्या स्वतःच्या पापी स्वभावावर विजय असे पाहतो. अशा दृष्टिकोनाचे अनुसरण करणारे असे मानतात की हे ज्ञान मनुष्यावर रहस्यमयरित्या प्रभाव पाडेल आणि त्याच्या “दैवी-चेतना” जागृत करेल. त्यांचे असेही मानणे आहे की मनुष्याची आध्यात्मिक स्थिती पापाचा परिणाम नसून ती तर फक्त “दैवी-चेतनेचा” अभाव आहे. हे स्पष्टपणे अपवित्र शास्त्रीय आहे. यावर विश्वास ठेवण्यासाठी असे मानावे लागेल कि ख्रिस्ताचा स्वभाव पापमय होता, परंतु पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते कि येशू हा दैवीय मनुष्य होता जो प्रत्येक बाबतीत निष्पाप आहे (इब्री करांस पत्र 4:15).

नैतिक प्रभाव सिद्धांत अर्थात मोरल इनफ्लूअन्स थेअरी: हे असे मानते कि, ख्रिस्ताची पूर्ण भरपाई ही देवाच्या प्रेमाचे प्रदर्शन आहे ज्यामुळे मनुष्याचे अंतःकरण मऊ होते आणि पश्चात्ताप करते. हा दृष्टिकोन बाळगणाऱ्यांचा असा विश्वास आहे की मनुष्य आध्यात्मिकरित्या कमकुवत असून त्याला मदतीची आवश्यकता आहे आणि तो मनुष्य देवाचे प्रेम पाहून तो देवाची क्षमा स्वीकारण्यास प्रवृत्त होतो. मनुष्यावर असलेले देवाचे प्रेम प्रकट करणे हा ख्रिस्ताच्या मुत्युचा उद्देश आणि अर्थ आहे. ख्रिस्ताची पूर्ण भरपाई ही देवावरील प्रेमाचे उदाहरण आहे हे जरी खरे असले तरी हा दृष्टीकोन अपवित्र शास्त्रीय आहे कारण हा मनुष्याची वास्तविक परिस्थिती जी पापामधील मरण (इफिसकरांस पत्र 2:1) ते नाकारतो आहे, याच बरोबर देव खरोखर पापाच्या भरपाईची मागणी करतो हेही हा दृष्टीकोन नाकारतो आहे. ख्रिस्ताच्या भरपाईचा हा सिद्धांत मानवजातीला खऱ्या बलिदानाशिवाय किंवा पापाची भरपाई न करता सोडत आहे.

उदाहरण सिद्धांत अर्थात एक्झाम्पल थेअरी: हा दृष्टीकोन ख्रिस्ताच्या पूर्ण भरपाईला केवळ मानवाला देवाला आज्ञाधारक राहण्याची प्रेरणा देण्यासाठी विश्वास आणि आज्ञाधारकपणाचे उदाहरण असे पाहत आहे. या मताचे अनुसरण करणारे असे मानतात कि मनुष्य आत्मिकरित्या जिवंत आहे आणि ख्रिस्ताचे जीवन आणि भरपाई केवळ विश्वास आणि आज्ञापालनाचे एक उदाहरण होते आणि हे मनुष्याला त्या प्रमाणे विश्वासाचे आणि आज्ञापालनाचे जीवन जगण्यास मदत करील. हे आणि नैतिक प्रभाव सिद्धांत सारखे आहेत कारण हे दोन्ही हे नाकारतात की देवाचे न्याय्यत्व पापासाठी भरपाईची मागणी करते आणि ख्रिस्ताचा वधस्तंभावरील मृत्यू हि ती भरपाई आहे. नैतिक प्रभाव सिद्धांत आणि उदाहरण सिद्धांत यांच्यातील मुख्य फरक असा आहे की, नैतिक प्रभाव सिद्धांत देव आपणावर किती प्रेम करतो हे शिकवितो तर उदाहरण सिद्धांत म्हणतो कि ख्रिस्ताचा मृत्यू आपणाला कसे जगावे हे शिकवितो. अर्थात, हे खरे आहे की ख्रिस्त आमच्यासाठी त्याचे अनुसरण करण्याचे उदाहरण आहे, अगदी त्याच्या मृत्यूमध्येही, परंतु उदाहरण सिद्धांत माणसाची खरी आत्मिक स्थिती ओळखण्यात आणि देवाचे न्याय्यपण पापाच्या भरपाईच्या किमतीची मागणी करते जी भरण्यास मनुष्य सक्षम नाही हे समजण्यास अपयशी ठरतो.

व्यावसायिक सिद्धांत अर्थात कमर्शीअल थेअरी: ख्रिस्ताच्या पूर्ण भरपाईमुळे देवाला अनंत आदर मिळतो असे व्यावसायिक सिद्धांत मानतो. याचा परिणाम असा झाला की, देवाने ख्रिस्ताला बक्षीस दिले ज्याची त्याला गरज नव्हती आणि ख्रिस्ताने ते बक्षीस मानवाला दिले. हे मत धारण करणारे मानतात की देवाचा अपमान करणे हि मनुष्याची आत्मिक परिस्थिती आहे म्हणून ख्रिस्ताच्या मृत्यूने देवाला अनंत सन्मान दिला यामुळे ख्रिस्ताचा मृत्यू पापी लोकांच्या तारणासाठी लागू होऊ शकते. इतरांप्रमाणेच हा सिद्धांतही नवीन जन्म न झालेल्या पापी लोकांची आत्मिक स्थिती आणि फक्त ख्रिस्तामध्ये उपलब्ध असलेल्या पूर्णपणे नवीन स्वरूपाची त्यांची गरज (2 करिंथकरांस पत्र 5:17) यांचा अस्वीकार करतो आहे.

शासकीय सिद्धांत अर्थात गवर्नमेन्टल थेअरी: या सिद्धांतानुसार, ख्रिस्ताची पूर्ण भरपाई ही देवाचा त्याच्या नियमशास्त्राबद्दल असलेला उच्च आदर आणि पापाबद्दलची त्याची वृत्ती यांचे प्रदर्शन करते. ख्रिस्ताच्या मृत्यूमुळेच देवाला पश्चात्ताप करणाऱ्या आणि त्याच्या बदल्यात ख्रिस्ताने दिलेला प्राण याचा स्वीकार करणाऱ्या पाप्याला क्षमा करण्याचे कारण आहे. या मताचे अनुसरण करणारे लोक असे मानतात की माणसाची आत्मिक स्थिती ही आहे ज्याने देवाच्या नैतिक कायद्याचे उल्लंघन केले आहे आणि ख्रिस्ताच्या मृत्यूचा अर्थ पापाच्या शिक्षेला पर्याय बनला पाहिजे. ख्रिस्ताने पापाची भरपाई केली आहे म्हणून, ख्रिस्ताला त्यांचा पर्याय म्हणून स्वीकारणाऱ्या लोकांना कायदेशीररीत्या क्षमा करणे हे देवाला शक्य आहे. हा दृष्टीकोन थोडक्यात कमी पडतो, कारण ख्रिस्ताने प्रत्यक्षात प्रत्येक मनुष्याचा वास्तविक पापांचा दंड भरला असल्याचे हा शिकवत नाही परंतु त्याऐवजी त्याने दु:ख सोसल्यामुळे मानवजातीला देवाचे नियम मोडले आहेत आणि काही दंड भरण्यात आला आहे असे दिसून आले.

दंडात्मक प्रतिस्थापना सिद्धांत अर्थात पेनल सबस्टीट्युशन थेअरी: हा सिद्धांत ख्रिस्ताची पूर्ण भरपाई एक बदलीचे बलिदान ज्याने पापाविषयी देवाच्या न्यायाची मागणी पूर्ण केली असे पाहतो. त्याच्या बलिदानामुळे ख्रिस्ताने मनुष्याच्या पापाचा दंड भरला, क्षमा केली, नितीमत्त्व दिले आणि मनुष्याचा देवाशी समेट केला. हे मत धारण करणारे मानतात की मनुष्याचे प्रत्येक पैलू - मनातील विचार, इच्छा, भावना- पापामुळे भ्रष्ट झाले आहेत आणि मनुष्य पूर्णपणे विकृत झाला असून आत्मिकरित्या मृत आहे. हा दृष्टीकोन ख्रिस्ताच्या मृत्यूने पापाचा दंड भरला आहे आणि विश्वासाच्या द्वारे मनुष्य ख्रिस्ताने त्याच्या जागी स्वतःला पापाचा दंड म्हणून दिले हे स्वीकारू शकतो असे पाहतो. हा पूर्ण भरपाईचा सिद्धांत पाप, मनुष्याचे स्वरूप आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूच्या परिणामाशी पवित्र शास्त्राच्या दृष्टीने अगदी अचूकपणे संरेखित होतो.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पूर्ण भरपाई अर्थात अटोनमेन्ट चे विविध सिद्धांत कोणते आहे?
© Copyright Got Questions Ministries