प्रश्नः
हर्मगिद्दोनचे युद्ध काय आहे?
उत्तरः
“हर्मगिदोन“ हा शब्द ग्रीक भाषेतील हरमॅगेडाॅन या शब्दावरून येतो ज्याचा अर्थ आहे “मगिद्दो पर्वत“ आणि हा शब्द भविष्यातील लढाईचा समानार्थी ठरला आहे ज्यात परमेश्वर बायबलच्या भविष्यवाणीत भाकित केल्याप्रमाणे हस्तक्षेप करील आणि ख्रिस्तविरोधकाच्या सैन्याचा नाश करील (प्रकटी 16:16; 20:1-3). हर्मगिदोनच्या लढाईत असंख्य लोक युद्ध लढत असतील, कारण सर्व राष्ट्रे ख्रिस्ताविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येतील.
हर्मगिदोनच्या खोर्याचे निश्चित स्थान अस्पष्ट आहे कारण मगिद्दो नावाचा कोणताही पर्वत तेथे नाही. तथापि, “हर” या शब्दाचा अर्थ टेकडीसुद्धा असू शकतो, म्हणून शक्य तो त्याचे स्थळ यरूशलेमाच्या उत्तरेस साठ मैलावर असलेल्या मगिद्दोच्या मैदानास घेरलेला टेकडाळ देश असावा. त्या क्षेत्रात दोनशेपेक्षा अधिक लढाया लढल्या गेल्या आहेत. मगिद्दोचे मैदान आणि जवळचे एज्रालोनचे मैदान हर्मगिदोनच्या लढाईचा केंद्र बिंदु असेल, जो संपूर्ण इस्राएलापासून बसरा नावाच्या अदोमी नगरापर्यंत दक्षिणेपर्यंत पसरलेला असेल (यशया 63:1). हर्मगिदोनचे खोरे इस्राएलाच्या इतिहासातील दोन मोठ्या विजयांसाठी प्रसिद्ध आहे: 1) कनानी लोकांवर बाराकाचा विजय (शास्ते 4:15) आणि 2) मिद्यानी लोकांवर गिदोनचा विजय (शास्ते 7). तसेच हर्मगिदोन दोन भयानक दुखान्तिकेचे स्थान देखील आहे: 1) शौल आणि त्याच्या पुत्रांचा मृत्यू (1 शमूएल 31:8) आणि 2) राजा योआश याचा मृत्यू (2 राजे 23:29-30; 2 इतिहास 35:22).
या इतिहासामुळे, हर्मगिदोनचे खोरे परमेश्वर आणि दुष्ट सैन्यामधील शेवटच्या लढ्याचे प्रतीक आहे. “हर्मगिदोन” हा शब्द प्रकटीकरण 16:16 या वचनात फक्त एकदा येतो, “त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.” हा त्या राजांचे वर्णन करतो जे ख्रिस्तविरोधकाप्रत निष्ठावान आहेत आणि ते इस्राएलावर शेवटचे आक्रमण करण्यासाठी एकत्र होतात. हर्मगिदोन येथे देवाच्या “तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला“ (प्रकटी 16:19) दिला जाईल, आणि ख्रिस्तविरोधक व त्याच्या अनुयायांचा पाडाव केला जाईल व त्यांस पराभूत केले जाईल. ”हर्मगिदोन“ हा सामान्य शब्द बनला आहे जो जगाच्या शेवटाचा उल्लेख करतो, केवळ त्या लढाईचा नाही जी मगिद्दोच्या खोर्यात होते.
English
हर्मगिद्दोनचे युद्ध काय आहे?