प्रश्नः
कॅल्विनवाद विरुद्ध अर्मिनियनवाद — कोणते मत बरोबर आहे?
उत्तरः
कॅल्विनवाद आणि अर्मिनियनवाद ईश्वरशास्त्राच्या दोन पद्धती आहेत ज्या तारणाच्या बाबतीत देवाचे सार्वभौमत्व आणि मानवाची जबाबदारी यातील संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. कॅल्विनवाद हे नाव फ्रेंच धर्मपंडित, जॉन कॅल्विन याच्या नावावरून पडले जो 1508-1564 या काळात होऊन गेला. अर्मिनियनवाद हे नाव डच धर्मपंडित जेकोबस अर्मिनियस याच्या नावावरून पडले जो 1560-1609 या काळात होऊन गेला.
दोन्हीं पद्धतींचा सारांश पाच मुद्द्यांत सांगता येतो. मानव हा पूर्णपणे भ्रष्ट आहे असे कॅल्विनवाद मानतो तर अर्मेनियनवाद तो आंशिकरित्या दुराचारी आहे असे मानतो. पूर्ण भ्रष्टतेचा अथवा दुराचरणाचा कॅल्विनचा सिद्धांत असे मत मांडतो की मानवाचा प्रत्येक पैलू पापाने भ्रष्ट झाला आहे; म्हणून, मानवजात स्वतः देवाजवळ येण्यास असमर्थ आहे. आंशिक भ्रष्टता असे मत मांडते की मानवाचा प्रत्येक पैलू पातकाने कलंकित आहे, पण इतकी नाही की मानव प्राणी देवावर स्वतःहून विश्वास ठेवू शकत नाहीत. लक्ष द्या: परंपरागत अर्मेनियनवाद "आंशिक भ्रष्टतेचा" नाकार करतो आणि कॅल्विनवादास अगदी जवळच्या "पूर्ण भ्रष्टतेचे" मत अनुसरण करतो (जरी त्या भ्रष्टतेचा व्याप आणि अर्थ याविषयी अर्मेनियन मतावलंबी लोकांस वाद सुरू आहे). एकंदर अर्मेनियन हा विश्वास धरतात की पूर्ण भ्रष्टता आणि तारण यांच्यामध्ये एक "मधली" अवस्था आहे, जी त्याच्या निर्णयापूर्वी येणाया कृपेद्वारे शक्य करण्यात आली आहे, पापी व्यक्ती ख्रिस्ताकडे ओढला जात आहे आणि त्याच्याजवळ
कॅल्विनवादात ह्या मताचा समावेश आहे की निवडीमागे कुठलीच अट नाही, तर अर्मेनियनवादाचे असे मत आहे की देवाच्या निवडीमागे अट आहे. विनाअट अथवा बिनशर्त निवड हे असे मत आहे की देव पूर्णपणे स्वतःच्या इच्छेच्या आधारे तारणासाठी व्यक्तींची निवड करतो, व्यक्तीठायी असलेल्या कुठल्याही अन्तर्जात लायकीच्या आधारे नव्हे. सशर्त अट हे सांगते की देव त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे तारणासाठी त्या लोकांची निवड करतो जे तारणासाठी ख्रिस्तावर विश्वास ठेवतील, त्याद्वारे ह्या अटीवर की व्यक्तीने देवाची निवड करावी.
कॅल्विनवाद प्रायश्चितास मर्यादित असे पाहतो, तर अर्मेनियनवाद त्यास अमर्यादित म्हणून पाहतो. पाच मुद्द्यांपैकी हा सर्वात विवादास्पद मुद्दा आहे. मर्यादित प्रायश्चित हा विश्वास आहे की येशूने फक्त निवडलेल्या लोकांसाठी मरण पत्करले. अमर्याद प्रायश्चित हा विश्वास आहे की येशू सर्वांसाठी मेला, पण जोवर व्यक्ती विश्वासाने त्याचा स्वीकार करीत नाही तोवर त्याचा मृत्यू परिणामकारक ठरत नाही.
कॅल्विनवादात या मताचा समावेश आहे की देवाची कृपा ही अप्रतिकार्य आहे, तर अर्मिनियनवाद म्हणतो की व्यक्ती देवाच्या कृपेचा प्रतिकार करू शकतो. अप्रतिकार्य कृपा हा वाद घालते की जेव्हा देव व्यक्तीस तारणाचे पाचारण देतो, तेव्हा ती व्यक्ती अपरिहार्यपणे देवाजवळ येईल. प्रतिकार्य कृपा असे सांगते की देव सर्वांस तारणाचे पाचारण देतो, पण अनेक लोक ह्या पाचारणाचा प्रतिकार आणि अव्हेर करतात.
कॅल्विनवाद संतांच्या स्थिरतेचे मत प्रतिपादन करतो तर अर्मिनियनवाद सशर्त तारणाचे मत प्रतिपादन करतो. संतांचे स्थिर अथवा दृढ राहणे ह्या संकल्पनेचा उल्लेख करते की देवाच्या इच्छेने निवडलेला व्यक्ती विश्वासात स्थिर राहील आणि कायमपणे ख्रिस्ताचा नाकार करणार नाही किंवा त्याजपासून मागे फिरणार नाही. सशर्त तारण असे मत आहे की ख्रिस्ताठायी विश्वास धरणारा, त्याच्या/तिच्या स्वतंत्र इच्छाशक्तीने, ख्रिस्तापासून मागे फिरू शकतो आणि त्याद्वारे आपले तारण गमावू शकतो. टीप — अनेक अर्मिनियनवादी "सशर्त तारणाचा" नाकार करतात आणि त्याऐवजी "सनातन सुरक्षेच्या" मताचे पालन करतात.
म्हणून, कॅल्विनवाद विरुद्ध अर्मिनियनवाद ह्या चर्चेत कोण बरोबर आहे? हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की ख्रिस्ताच्या देहाच्या विविधतेत, कॅल्विनवाद आणि अर्मिनियनवाद यांच्या अनेक प्रकारच्या भेसळी आहेत. पाच-मुद्द्यांचे पालन करणारे कॅल्विनवादी आणि पाच-मुद्द्यांचे पालन करणारे अर्मिनियनवादी, आणि त्याचवेळी तीन-मुद्द्यांचे पालन करणारे कॅल्विनवादी आणि दोन-मुद्द्यांचे पालन करणारे अर्मिनियनवादी. अनेक विश्वासणारे दोन मतांचा कुठल्यातरी मिश्रणाचे पालन करू लागतात. शेवटी, आमचे हे मत आहे की दोन्ही पद्धती स्पष्ट करता न येणार्या बाबींचे स्पष्टीकरण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात चुकतात. मानव प्राणी अशासारख्या संकल्पनांस पूर्णपणे समजून घेण्यास असमर्थ आहेत. होय, देव पूर्णपणे सार्वभौम आहे आणि सर्वकाही जाणतो. होय, मानव प्राण्यांस तारणाप्रीत्यर्थ ख्रिस्ताठायी विश्वास ठेवण्याचा खरा निर्णय घेण्यास पाचारण करण्यात आले आहे. ही दोन तथ्ये आम्हास परस्परविरोधी वाटतात, पण देवाच्या मनात त्या अर्थपूर्ण आहेत.
English
कॅल्विनवाद विरुद्ध अर्मिनियनवाद — कोणते मत बरोबर आहे?