settings icon
share icon
प्रश्नः

करूब कोण आहेत?

उत्तरः


करूबिम/करूब हे देवाची उपासना आणि त्याची स्तुती करणारे देवदूत आहेत. करुबांचा प्रथम उल्लेख बायबलमध्ये उत्पत्ति 3:24मध्ये आला आहे, “देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली.” त्याच्या विद्रोहाच्या पूर्वी सैतान एक करूब होता (यहेजकेल 28:12-15) निवासमंडप आणि मंदिर आणि त्यातील वस्तूंमध्ये करूबांचे बरेच चित्रे इत्यादी होते (निर्गम 25:17-22; 26:1,31; 36:8; 1 राजे 6:23-35; 7:29-36; 8:6-7; 1 इतिहास 28:18; 2 इतिहास 3:7-14; 2 इतिहास 3:10-13; 5:7-8; इब्री 9:5).

यहेज्केलच्या पुस्तकातील अध्याय 1 आणि 10 मध्ये “चार जिवंत प्राण्यांचे” (यहेजकेल 1:5) आले आहे जे करूबासारखेच प्राणी आहेत (यहेजकेल 10). प्रत्येकाची चार मुखे होती - एक मनुष्याचे, एक सिंहाचे, एक बैलाचे आणि एक गरूडाचे (यहेज्केल 1:10; 10:14) - आणि प्रत्येकाला चार पंख होते. दिसायला हे करूब “मनुष्याकृतीे” होते (यहेज्केल 1:5). या करूबांनी त्यांचे दोन पंख उडण्यासाठी आणि दुसरे दोन त्यांचे शरीर झाकण्यासाठी वापरले (यहेज्केल 1:6, 11, 23). त्यांच्या पंखांखाली करूबांचे स्वरूप किंवा साम्य मनुष्याच्या हातासारखे होते (यहेज्केल 1:8; 10:7-8, 21).

प्रकटीकरण 4:6-9 मधील प्रतिमासृष्टी देखील करूबांचे वर्णन करीत असल्याचे दिसते. करूब देवाच्या पवित्रतेचे आणि सामर्थ्याचे वर्णन करतात. संपूर्ण बायबलमध्ये ही त्यांची एक मुख्य जबाबदारी आहे. देवाची स्तुती गाण्याव्यतिरिक्त, ते देवाचा प्रताप आणि त्याचे गौरव आणि त्याच्या लोकांसोबत त्याच्या अस्तित्वाच्या उपस्थितीचे दृश्य स्मारक आहेत.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

करूब कोण आहेत?
© Copyright Got Questions Ministries