प्रश्नः
चिंतनशील प्रार्थना म्हणजे काय?
उत्तरः
प्रथम “चिंतनशील प्रार्थना” परिभाषित करणे महत्वाचे आहे. चिंतनशील प्रार्थना म्हणजे “प्रार्थना करताना चिंतन करणे”. पवित्र शास्त्र आपल्याला आपल्या बुद्धीने प्रार्थना करण्याची सूचना देते (1 करिंथ 14:15), म्हणून स्पष्टपणे, प्रार्थनेमध्ये चिंतन समाविष्ट आहे. तथापि, आपल्या बुद्धीने प्रार्थना करणे म्हणजे “चिंतनशील प्रार्थना” याचा अर्थ नाही. उदयोन्मुख चर्च चळवळीच्या उदयासह चिंतनशील प्रार्थना हळूहळू सराव आणि लोकप्रियतेत वाढली आहे, हि एक अशी चळवळ जी अनेक अशास्त्रीय कल्पना आणि पद्धती स्वीकारते. चिंतनशील प्रार्थना ही अशीच एक प्रथा आहे.
चिंतनशील प्रार्थना, ज्याला “मध्यवर्ती प्रार्थना” असेही म्हणतात जी एक ध्यानधारणा आहे जिथे अभ्यासक एका शब्दावर लक्ष केंद्रित करतो आणि सरावाच्या कालावधीसाठी त्या शब्दाची पुनरावृत्ती करतो. चिंतनशील प्रार्थना विविध सराव करणाऱ्या गटांमध्ये वेगळ्या पद्धतीने केली जात असली तरी त्यांमध्ये समानता आहेत. चिंतनशील प्रार्थनेत देवाच्या उपस्थितीला आणि आतल्या कृतीला संमती देण्याच्या आपल्या हेतूचे प्रतीक म्हणून पवित्र शब्द निवडणे समाविष्ट आहे. चिंतनशील प्रार्थनेमध्ये सामान्यतः आरामात बसून डोळे मिटून, थोडक्यात आणि शांतपणे स्थिरावणे, पवित्र शब्दाची ओळख करून देणे यांचा समावेश होतो. जेव्हा चिंतनशील प्रार्थना करणार्यांना विचारांची जाणीव होते, तेव्हा तो/ती पवित्र शब्दाची पुनरावृत्ती करत असते.
जरी हे निष्पाप सरावासारखे वाटत असले तरी या प्रकारच्या प्रार्थनेला शास्त्रीय आधार नाही. खरं तर, पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थनेची व्याख्या कशी केली जाते हि याच्या अगदी उलट आहे. “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” (फिलिप्पै 4:6). “त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाहीत. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हांला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.” (योहान 16:23-24). हि आणि इतर वचने प्रार्थना स्पष्टपणे देवाशी समजण्याजोगा संवाद म्हणून चित्रित करत असून गूढ ध्यान असे चित्रित करत नाही.
चिंतनशील प्रार्थना, रचनेद्वारे, देवाबरोबर गूढ अनुभव घेण्यावर केंद्रित आहे. गूढवाद मात्र पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ असून सत्य किंवा वस्तुस्थितीवर अवलंबून नाही. तरीही देवाची वचने आपल्याला आपला विश्वास आणि आपले जीवन सत्यावर आधारित करण्याच्या हेतूने दिले गेले आहे (2 तीमथ्य 3:16-17). देवाबद्दल आपल्याला जे माहित आहे ते वस्तुस्थितीवर आधारित आहे; पवित्र शास्त्रबंधी नोंदीवर अनुभवात्मक ज्ञानावर विश्वास ठेवणे एखाद्या व्यक्तीला पवित्र शास्त्राच्या मानकाच्या बाहेर घेते.
चिंतनशील प्रार्थना पूर्व धर्मांमध्ये आणि नवीन युगाच्या पंथांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ध्यान सरावांपेक्षा भिन्न नाही. त्याचे सर्वात मुखर समर्थक सर्व धर्मांतील अनुयायांमध्ये खुले अध्यात्म स्वीकारतात आणि जरी ख्रिस्ताने स्वतः सांगितले की तारण त्याच्या द्वारेच प्राप्त होते (योहान 14:6) तरी ते अनेक मार्गांनी तारण प्राप्ती या संकल्पनेला प्रोत्साहन देतात. चिंतनशील प्रार्थना, आधुनिक प्रार्थना चळवळीप्रमाणे, पवित्र शास्त्रीय संबंधी ख्रिस्ती धर्माच्या विरोधात आहे आणि निश्चितपणे हि टाळली पाहिजे.
English
चिंतनशील प्रार्थना म्हणजे काय?