settings icon
share icon
प्रश्नः

येशूला पाप करणे शक्य होते का? जर त्याला पाप करणे शक्य नव्हते, तर तो खरोखर ”आमच्या दुर्बळतेविषयी सहानुभूति“ ठेवण्यास का समर्थ होता (इब्री 4:15)? जर येशूला पाप करणे शक्य नव्हते, तर परीक्षेचा का अर्थ होता?

उत्तरः


या मनोरंजक प्रश्नाला दोन बाजू आहेत. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की येशूने पाप केले की नाही हा प्रश्न नाही. बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की दोन्ही बाजू सहमत आहेत की येशूने पाप केले नाही (2 करिंथ 5:21; 1 पेत्र २:२२). प्रश्न हा आहे की येशू पाप करू शकत होता की नाही. निर्विकारतेचे समर्थन करणारे असा विश्वास धरतात की येशू पाप करू शकतं होता पण त्याने पाप केले नाही. कोणते मत बरोबर आहे? शास्त्रवचनाची स्पष्ट शिकवण आहे येशू निष्पाप होता - येशू पाप करू शकत नव्हता. जर त्याने पाप केले असते तर आजही तो पाप करण्यास समर्थ आहे कारण पृथ्वीवर जगत असताना त्याचा जो स्वभाव होता तो आजही आहे. तो देव-मानव आहे आणि सर्वदा तसाच राहील, अशाप्रकारे तो संपूर्ण देव आणि संपूर्ण मानव होता जे गुण एका व्यक्तीमध्ये इतके एकत्र होते की त्यांस वेगळे करणे अशक्य आहे. येशू पाप करू शकत होता असा विश्वास ठेवणे म्हणजे देव पाप करू शकतो असा विश्वास ठेवणे होय. “कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी,.” (कलस्सै. 1:19)). कलस्सै 2:9 त्यात भर घालते, “कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते.”

येशु जरी मानव असला तरीही, त्याचा जन्म पातकी स्वभावानीशी झाला नव्हता जसा आमचा झाला आहे. निश्चितच त्याची अशी परीक्षा झाली जशी आमची होते, सैतानाने त्याची परीक्षा घेतली, तरीही तो निष्पाप राहिला कारण परमेश्वर पाप करावयास असमर्थ आहे. हे त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे (मत्तय 4:1; इब्री 2:18;4:15; याकोब 1:13). पापाची व्याख्या आहे परमेश्वराविरुद्ध अपराध. परमेश्वराने नियमशास्त्र घालून दिले आणि हे नियमशास्त्र स्वभावतः तेच करील जे परमेश्वर करेल किंवा जे तो करणार नाही, म्हणून परमेश्वर देव आपल्या स्वभावाने जे करणार नाही ती कोणती गोष्ट म्हणजे पाप. (मत्तय 4:1; इब्री. 2:18; 4:15; याकोब 1:13).

मोहात किंवा परीक्षेत पडणे हे स्वतःमध्ये पापमय नाही. जे कार्य करावयाची आपणास इच्छा नाही ते करण्यासाठी एखादा व्यक्ती आपणास मोहात पाडू शकतो, या कार्यात भाग घेण्याची आपली इच्छा नसेल, तरीही आपणास मोह होतो कारण कोणीतरी ही शक्यता आपल्यासमोर ठेवली. मोहात पडणे किंवा परीक्षेत पडणे या शब्दाच्या कमीत कमी दोन व्याख्या आहेत:

1) कोणीतरी आपणापुढे पाप करण्याचा प्रस्ताव मांडतो अथवा आपल्या बाहेरील काहीतरी किंवा आपला स्वतःचा पापमय स्वभाव आपणा पुढे पाप करण्याचा प्रस्ताव मांडतो.

2) एखाद्या पापमय कृत्यात खरोखर भाग घेण्याचा विचार करणे आणि अशा कृतीमुळे शक्य त्या सुखांचा आणि परिणामांचा इतक्या प्रमाणात विचार करने की ते कृत्य आपल्या मनात आधीच घडून आले आहे.

प्रथम व्याख्या पापी कृत्याच्या विचारांचे वर्णन करीत नाही; दुसरी करतो. जेव्हा आपण एखाद्या पापी कृत्यावर लक्ष केंद्रित करता आणि आपण ते कसे घडवून आणता येईल यावर विचार करता तेव्हा आपण पापाची रेखाा ओलांडली आहे.

येशूची परीक्षा पहिल्या व्याख्येनुसार घडून आली, फक्त एवढेच की तो पापमय स्वभावाद्वारे मोहात पडला नाही कारण तो त्याच्याठायी अस्तित्वात नव्हता. सैतानाने येशूपुढे काही पापमय कृत्यांचा प्रस्ताव मांडला, पण त्याच्याठायी त्या पापामध्ये सहभागी होण्याची आंतरिक इच्छा नव्हती. म्हणून, आमच्या समान त्याची परीक्षा झाली तरीही तो निष्पाप राहिला.

जे लोक येशूच्या निष्पाप होण्याचे समर्थन करतात, त्याचा असा विश्वास आहे की जर येशूला पाप करणे शक्य नसते, तर त्याने खरोखर परीक्षेचा अनुभव घेतला नसता, आणि म्हणून तो पापाविरूद्ध आमच्या संघर्षात आणि परीक्षांत आमच्यासोबत खरोखर सहानुभूति बाळगू शकला नसता. आम्हाला हे लक्षात ठेविले पाहिजे की एखादी गोष्ट समजण्यासाठी आम्हाला तिचा अनुभव घेण्याची गरज नाही. देव प्रत्येक गोष्टीविषयी प्रत्येक गोष्ठ जाणतो. देवाला कधीही पाप करण्याची इच्छा झाली नसली आणि त्याने निश्चितच कधीही पाप केले नाही, तरीही पाप काय आहे ते देव जाणतो आणि समजतो. परीक्षेत किंवा मोहात पडणे म्हणजे काय हे देव जाणतो आणि समजतो. येशू आमच्या परीक्षांत किंवा मोहांत आमच्यासोबत सहानुभूति ठेवू शकतो कारण त्याला माहीत आहे, आम्ही जी अनुभव केले आहे ते त्याने ”अनुभवले“ आहे म्हणून नव्हे.

येशू जाणतो की परीक्षेत पडणे कशी असते, पण पाप करणे कसे असते ते त्याला माहीत नाही. ही गोष्ट त्याला आमची मदत करण्यापासून रोखू शकत नाही. आम्हाला अशा पापांचा मोह होतो जी मनुष्यासाठी सामान्य आहेत (1 करिंथ. 10:13). या पापांस तीन वेगवेगळîा प्रकारांत विभाजित करता येते: ”देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी“ (1 योहान 2:16 एनकेजेवी). हव्वेची परीक्षा आणि पाप, तसेच येशूची परीक्षा यांचे परीक्षण करा, आणि आपणास आढळून येईल की प्रत्येकासाठी परीक्षा किंवा मोह या तीन वर्गांपैकी एकापासून आला. आमच्या प्रमाणेच प्रत्येक प्रकारे आणि प्रत्येक क्षेत्रात येशूची परीक्षा झाली, पण तो पूर्णपणे पवित्र राहिला. जरी आमच्या पातकी स्वभावला काही पापांत सहभागी होण्याची इच्छा असली तरीही, ख्रिस्ताद्वारे पापावर विजय मिळविण्याचे सामथ्र्य आमच्याठायी आहे कारण आता आपण पापाचे दास नाही तर देवाचे दास आहोत (रोम. 6, विशेषेकरून वचन 2 आणि 16-22).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

येशूला पाप करणे शक्य होते का? जर त्याला पाप करणे शक्य नव्हते, तर तो खरोखर ”आमच्या दुर्बळतेविषयी सहानुभूति“ ठेवण्यास का समर्थ होता (इब्री 4:15)? जर येशूला पाप करणे शक्य नव्हते, तर परीक्षेचा का अर्थ होता?
© Copyright Got Questions Ministries