settings icon
share icon
प्रश्नः

बायबल डेटिंग अथवा संकेतभेट/प्रेमयाचनेविषयी काय म्हणते?

उत्तरः


जरी "प्रेमयाचना" आणि "संकेतभेट" हे शब्द बायबलमध्ये आढळत नाहीत, तरीही आम्हास काही सिद्धांत देण्यात आले आहेत ज्यांचे विवाहापूर्वीच्या काळात ख्रिस्ती विश्वासणार्‍या स पालन करावयाचे आहे. पहिले हे आहे की आम्ही डेटिंगविषयी जगाच्या दृष्टिकोनापासून स्वतःला वेगळे केले पाहिजे कारण देवाची पद्धत जगाच्या पद्धतीविरुद्ध आहे (पेत्राचे 2 रे पत्र 2:20). जगाचा दृष्टिकोण असा असू शकतो की जितके भेटण्याची आमची इच्छा असेल तितके भेट घेत फिरणे, पण महत्वाची गोष्ट आहे व्यक्तीप्रत कुठलेही समर्पण करण्यापूर्वी त्याच्या किंवा तिच्या चारित्र्याविषयी जाणून घेणे. आम्ही हे जाणून घेतले पाहिजे की त्या व्यक्तीचा ख्रिस्ताच्या आत्म्यात नवा जन्म झाला आहे किंवा नाही (योहान 3:3-8) आणि त्याला किंवा तिला ख्रिस्तासमान बनण्याची सारखीच इच्छा आहे किंवा नाही (फिलिप्पैकरांस पत्र 2:5). डेटिंग अथवा प्रेमयाचनेचे अंतिम ध्येय जोडीदार शोधणे आहे (करिंथकरांस 2 रे पत्र 6:14-15) कारण यामुळे ख्रिस्ताबरोबर आमचे नाते कमकूवत होईल आणि आमचे सदाचार व मापदंड याबाबत तडजोड होईल.

जेव्हा व्यक्ती समर्पित नाते स्थापित करतो, मग ते डेटिंग असो वा प्रेमयाचना असो, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की त्याला इतर सर्व गोष्टींपेक्षा प्रभूवर अधिक प्रीती करावयाची आहे (मत्तय 10:37). दुसरा व्यक्ती "सर्वकाही" आहे अथवा त्याच्या जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे असे म्हणणे अथवा विश्वास धरणे ही मूर्तिपूजा आहे, जे पाप आहे (गलतीकरांस पत्र 5:20; कलस्सैकरांस पत्र 3:5). तसेच लग्नापूर्वी लैंगिकसंबंध स्थापित करून आम्ही आपल्या शरीरांस अशुद्ध करता कामा नये (करिंथकरांस 1 ले पत्र 6:9, 13; तीमथ्याला 2 रे पत्र 2:22). यौन अनैतिकता हे केवळ देवाविरुद्ध पाप नाही तर ते आमच्या शरीरांविरुद्धही पाप आहे (करिंथकरांस 1 ले पत्र 6:18). जशी आम्ही स्वतःवर प्रीती करतो तशीच इतरांवर प्रीती करणे आणि त्यांचा मान राखणे महत्वाचे आहे (रोमकरांस पत्र 12:9-10), आणि प्रेमयाचनेसाठी अथवा डेटिंगच्या नात्याबाबत हे निश्चितच खरे आहे. डेटिंग करणे असो वा प्रेमयाचना असो, बायबलच्या ह्या सिद्धांतांचे अनुसरण करणे ही विवाहसाठी मजबूत पाया घालण्याची उत्तम पद्धत आहे. आम्ही घेत असलेल्या सर्वात महत्वपूर्ण निर्णयांपैकी हा एक असेल, कारण जेव्हा दोन व्यक्तींचा विवाह होतो, तेव्हा ते एकमेकास जडून राहतील आणि परस्पर संबंधांत एक देह होतील ज्याची देवाने कायमचे व अटूट नाते म्हणून योजना केली आहे (उत्पत्ती 2:24; मत्तय 19:5).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बायबल डेटिंग अथवा संकेतभेट/प्रेमयाचनेविषयी काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries