settings icon
share icon
प्रश्नः

ईश्वराने दुष्ट कृत्ये तयार केली का?

उत्तरः


पहिले म्हणजे ईश्वराने जर सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत, तर दुष्ट कृत्ये देखील त्यानेच निर्माण केले असेल असे कदाचित आपल्याला वाटू शकते. तथापि, दुष्ट कृत्ये खडक किंवा वीज सारखी मूर्त "गोष्ट" नाही. दृष्ट आत्माचे एक जार असू शकत नाही. दृष्ट आत्माचे स्वत:चे अस्तित्व नाही आहे; याचा अर्थ चांगुलपणाचा अभाव आहे. उदाहरणार्थ, छिद्र खरे आहेत पण ते केवळ काहीतरी गोष्टी मध्ये उपस्थित असतात. घाणीच्या अभावाला आम्ही छिद्र मानतो, पण त्याला घाणीपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. म्हणून हे खरे आहे की ईश्वराने जे काही निर्माण केले, ते सर्वकाही चांगलेच निर्माण केले. ईश्वराने चांगल्या गोष्टी निर्माण केल्या त्यापैकी एक चांगली गोष्ट म्हणजे चांगुलपण किंवा मार्ग निवडण्यासाठी दिलेले स्वातंत्र्य होय. चांगल्या निवडी शिवाय इतर काहीतरी चांगले करण्याची परवानगी दिली. त्यामुळे, ईश्वराने मुक्त ईश्वर दूत आणि मानवांना चांगुलपनाचा किंवा दुष्ट कृत्यांचा मार्ग निवडण्याची किंवा नकारण्याची परवानगी दिली आहे. जेंव्हा दोन चांगल्या गोष्टीच्या दरम्यान दुष्ट कृत्ये आढळून येतात तेव्हा आम्ही त्यांना दुष्ट कृत्ये म्हणतो, पण ती ईश्वराने तयार केलेली "गोष्ट" होत नाही.

हे समजण्यासाठी कदाचित आणखी एक उदाहरण मदत करू शकेल. जर एखाद्या व्यक्तीला विचारले "थंड अस्तित्वात आहे का?" तर कदाचित त्याचे उत्तर, "होय" असेल. थंड अस्तित्वात नाही. थंड म्हणजे उष्णतेचा अभाव आहे. तसेच, अंधार अस्तित्वात नाही; तर ते म्हणजे प्रकाशाचा अभाव आहे. चांगले किंवा दुष्ट कृत्ये म्हणजे चांगुलपणाचा अभाव आहे, दुष्ट कृत्ये म्हणजे ईश्वराचा अभाव आहे. ईश्वराला दुष्ट कृत्ये तयार करण्याची गरज नव्हती, त्या ऐवजी चांगुलपणाच्या अभावाला परवानगी देणे आहे.

ईश्वराने दुष्ट कृत्ये तयार केली नाही, पण त्याने दुष्ट कृत्यांना परवानगी दिली आहे. जर ईश्वराने दुष्ट कृत्यांना परवानगी दिली नसती तर, मानवजात आणि दूतांनी ईश्वराची कर्तव्यातून सेवा केली असती निवडीतून नव्हे. तो "प्रोग्रामिंग" केलेले रोबोट नको होते की तो जे म्हणेल ते करतील. त्याने आम्हाला मुक्त इच्छा दिली आणि आम्हाला त्याची सेवा करण्याची इच्छा किंवा निवड आहे की नाही ही ठरविण्याचे स्वातंत्र दिले .

मर्यादित मनुष्यप्राणी म्हणून, आम्ही असीम ईश्वराला समजू शकत नाही (रोमन्स 11: 33-34). कधी कधी आम्हाला वाटते की ईश्वर काय करतो आहे ते आम्हाला कळते पण नंतर आमच्या लक्षात येते की आम्ही ज्याचा विचार केला होता त्यापेक्षा मूलतः भिन्न उद्देशासाठी ते सर्व घडत होते. ईश्वर पवित्र, अनंतकाळच्या दृष्टीकोनातून पाहत असतो. आम्ही एका पापी, ऐहिक, आणि सांसारिक दृष्टीकोनातून गोष्टी पाहतो. ज्या अर्थी ईश्वराला माहित होते की आदाम आणि हव्वा पाप, वाईट गोष्टी आणि मृत्यू आणतील असे जाणून, आणि सर्व मानवजातीवर दु: ख ओढवतील तर मग त्याने त्यांना पृथ्वीवर का आणले? त्याने आमची निर्मिती करून स्वर्गात का ठेवले नाही जेणेकरून आम्ही परिपूर्ण आणि सुखमय जीवन जगू शकलो असतो? या प्रश्नांची पुरेसे उत्तर दिले जाऊ शकत नाही. आम्हाला हे माहीत आहे की ईश्वर जे काही करतो ते पवित्र आणि परिपूर्ण असते आणि शेवटी त्याचा गौरव होणार असतो . ईश्वराची आम्ही पूजा करतो की नाही याची निवड करण्यासाठी त्याने दुष्ट कृत्ये यांच्या संभाव्यतेला परवानगी दिली. ईश्वराने दुष्ट कृत्ये तयार केले नाही, तर त्याची परवानगी दिली. जर त्याने दुष्ट कृत्यांना परवानगी दिली नसती, तर आम्ही त्याला बंधना मुळे पूजा केली असती स्वत: च्या इच्छेने नाही.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ईश्वराने दुष्ट कृत्ये तयार केली का?
© Copyright Got Questions Ministries