प्रश्नः
युगवाद अथवा डिस्पेन्सेशनलिजम म्हणजे काय आणि ते बायबल आधारित आहे काय?
उत्तरः
युगवाद किंवा डिस्पेन्सेशन काही गोष्टींची व्यवस्था लावण्याची एक पद्धत आहे — प्रशासन, प्रणाली, अथवा, व्यवस्थापन. धर्मविज्ञानात, युग म्हणजे एखाद्या समयावधीत दैवीय प्रशासन; प्रत्येक युग है देवाने नेमलेले युग आहे. युगवाद ही एक धर्मविज्ञान प्रणाली आहे जी हे मानते की जगाच्या घटनाक्रमाचे व्यवस्थापन करण्यासाठी ही युगे देवाने नेमलेली आहेत. युगवादाची दोन प्राथमिक वैशिष्ट्ये आहेत: 1) पवित्र शास्त्राची सुसंगतपणे शब्दशः व्याख्या, विशेषेकरून बायबलच्या भविष्यकथनाची, आणि 2) देवाच्या योजनेत मंडळीपासून वेगळा असा इस्राएलच्या अद्वितीयतेचा दृष्टिकोन. परंपरागत युगवाद मानवजातीसाठी देवाच्या योजनेत सात युगे मानतो.
युगवादी बायबलची सर्वोत्तम व्याख्या म्हणून शब्दशः व्याख्येचे प्रतिपादन करतात. शब्दशः अथवा अक्षरशः व्याख्या प्रत्येक शब्दास असा अर्थ जो सामान्यतः त्याच्या रोजच्या उपयोगातील अर्थ असेल. अर्थात, प्रतीके, अलंकार, आणि प्रकार यासाठी मुभा दिली जाते. हे समजण्यासारखे आहे की प्रतीके आणि अलंकारिक म्हणी यांचे देखील अक्षरशः अर्थ असतात. म्हणून, उदाहरणार्थ, जेव्हा बायबल प्रकटीकरण 20 मध्ये "हजार वर्षांविषयी" बोलते, तेव्हा युगवादी त्यांचा अर्थ शब्दशः हजार वर्षांचा काळ असा लावतात (राज्याचा काळ), म्हणून त्याचा वेगळा अर्थ लावण्याचे कुठलेच पटणारे कारण नाही.
शब्दशः वचनांचा अर्थ लावणे ही पवित्र शास्त्राकडे पाहण्याची उत्तम पद्धत का आहे याची कमीत कमी दोन कारणे आहेत. सर्वप्रथम, तत्वज्ञानाच्या दृष्टीने, भाषेच्या हेतूसाठी हे गरजेचे आहे की आपण शब्दांचा अक्षरशः अर्थ लावावा. आपले विचार व्यक्त करता यावे ह्या उद्देशाने देवाने आम्हास भाषा दिली होती. शब्द अर्थाची पात्रे आहेत. दुसरे कारण हे बायबलवर आधारित आहे. जुन्या करारातील येशूविषयीचे प्रत्येक भविष्यकथन अक्षरशः पूर्ण झाले होते. येशूचा जन्म, सेवा, मृत्यू, आणि पृनरूत्थान सर्वकाही अगदी तसेच घडले जसे जुन्या करारात भाकित करण्यात आले होते. नव्या करारात ख्रिस्ताविषयीची अशी कोणतीही भविष्यवाणी नव्हती जी अक्षरशः पूर्ण झालेली नव्हती. हा शाब्दिक पद्धतीच्या पक्षाने ठामपणे वाद आहे. जर पवित्र शास्त्राच्या अभ्यासात शब्दशः अर्थबोध अथवा व्याख्येचा उपयोग केला गेला नाही, तर बायबल समजण्यासाठी कोणताही वस्तूनिष्ठ मानदंड नाही. प्रत्येक व्यक्ती तिला वाटेल त्या पद्धतीने बायबलचा अर्थ लावील. बायबलचा अर्थबोध "बायबल म्हणते की" ऐवजी "हा परिच्छेद मला असे म्हणतो की" असा होईल. दुःखाची गोष्ट म्हणजे, आज ज्यास बायबल अभ्यास म्हणतात त्यात आधीच असे घडत आहे.
युगवादी धर्मविज्ञान हे शिकविते की देवाचे दोन वेगळे लोक आहेत: इस्राएल आणि मंडळी. युगवाद्यांचा असा विश्वास आहे की तारण नेहमीच केवळ विश्वासाद्वारे कृपेने लाभते — जुन्या करारात परमेश्वर देवात आणि नवीन करारात विशिष्टरित्या पुत्र जो देव त्याच्याठायी. युगवाद्यांचे असे मत आहे की देवाच्या योजनेत मंडळीने इस्राएलची जागा घेतलेली नाही आणि जुन्या करारातील इस्राएलला देण्यात आलेली अभिवचने मंडळीकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाहीत. युगवादी सिद्धांत हे शिकवितो की देवाने जुन्या करारात इस्राएलला जी अभिवचने दिली (भूमी, अनेक वंशज, आणि आशीर्वाद) ती प्रकटीकरण 20 मध्ये बोललेल्या 1000-वर्षांच्या काळात शेवटी पूर्ण होतील. युगवाद्यांचे असे मानणे आहे की, ज्याप्रमाणे देव ह्या युगात त्याचे लक्ष मंडळीवर केंद्रित करीत आहे, त्याचप्रमाणे तो भविष्यात पुन्हा त्याचे लक्ष इस्राएलवर लावील (पाहा रोम 9-11 आणि दानीएल 9:24).
युगवादी समजतात की बायबल हे सात युगांत संघटित झालेले आहेः निष्पाप अवस्था (उत्पत्ती 1:1-3:7), विवेकबुद्धी (उत्पत्ती 3:8-8:22), मानव शासन (उत्पत्ती 9:1-11:32), अभिवचन (उत्पत्ती 12:1-निर्गम 19:25), नियमशास्त्र (निर्गम 20:1- प्रेषितांचे कृत्ये 2:4), कृपा (प्रेषितांचेीकृत्ये 2:4-प्रकटीकरण 20:3), आणि हजार वर्षांचे राज्य (प्रगटीकरण 20:4-6). पुन्हा, ही युगे तारणाप्रत नेणारे मार्ग नाहीत, परंतु पद्धती आहेत ज्याद्वारे देव मनुष्याशी व्यवहार करतो. प्रत्येक युगात एका ओळखण्याजोग्या नमून्याचा समावेश होतो की देवाने कशाप्रकारे युगात राहणार्या लोकांसोबत कार्य केले. हा नमूना आहे 1) जबाबदारी, 2) अपयश, 3) न्याय, आणि 4) पुढे वाढत जाण्यासाठी कृपा.
एक प्रणाली म्हणून, डिस्पेन्सेशनलिझम किंवा युगवादाची परिणती ख्रिस्ताचे आगमन सहस्त्रवर्षांपूर्वी होईल आणि सामान्यतः मंडळी महासंकटकाळापूर्वी वर उचलली जाईल या व्याख्येत होते. सारांश म्हणजे, युगवाद धर्मविज्ञानाची शाखा आहे जी बायबलच्या भविष्यात्मक संदेशाच्या शब्दशः व्याख्येवर जोर देते, इस्राएल आणि मंडळीतील फरक ओळखते, आणि वेगवेगळ्या युगांत अथवा शासनकाळात बायबलचे संघटन करते.
English
युगवाद अथवा डिस्पेन्सेशनलिजम म्हणजे काय आणि ते बायबल आधारित आहे काय?