प्रश्नः
द्वैतवाद म्हणजे काय?
उत्तरः
देव परीज्ञानशास्त्रात द्वैतवादाची संकल्पना असे मानते कि चांगले आणि वाईट - दोन स्वतंत्र घटक आहेत जे तितकेच शक्तिशाली आहेत. “ख्रिस्ती” द्वैतवादात, देव चांगल्या अस्तित्वाचे प्रतिनिधित्व करतो आणि सैतान वाईट अस्तित्वाचे प्रतिनिधित्व करतो.
तथापि, सत्य हे आहे की जरी सैतानाकडे काही शक्ती असली तरी तो सर्वशक्तिमान देवासमान नाही, कारण त्याने बंड करण्यापूर्वी त्याला एका देवदूताच्या रुपात देवाकडून निर्माण केले होते (यशया 14:12-15; यहेज्केल 28:13-17). पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, “मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे; कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे.” (1 योहान 4:4). शास्त्रानुसार, कोणताही द्वैतवाद नाही, समान शक्तीच्या कोणत्याही दोन विरोधी शक्ती नाहीत ज्याला चांगेल आणि वाईट म्हंटले जाते. सर्वशक्तिमान देवाने सादर केलेले चांगले, आक्षेप न करता विश्वातील सर्वात शक्तिशाली शक्ती आहे. वाईट ज्याचे प्रतिनिधित्व सैतान करतो ती एक कमी शक्ती आहे जिचा चांगल्यासाठी कोणताच सामना नाही. प्रत्येक वेळी चांगल्यासोबत कोणत्याही समोरासमोरील सामन्यात वाईटाचा पराभव करण्यात येईल, कारण सर्वशक्तिमान देव, चांगल्याचे मूलतत्व, सर्वशक्तिमान आहे, तर सैतान ज्या वाईट गोष्टीचे प्रतिनिधित्व करतो ते नाही.
जेव्हा कोणताही सिद्धांत चांगला आणि वाईट दोन समान विरोधी शक्ती म्हणून चित्रित करतो, तेव्हा ती शिकवण शास्त्रीय स्थितीच्या विरूद्ध आहे कि सर्वशक्तिमान देवाने प्रतिनिधित्व केलेले चांगले, विश्वातील प्रमुख शक्ती आहे. सैतान देवाच्या बरोबरीचा नव्हता आणि कधीही होणार नाही, कोणताही सिद्धांत जो तो आहे म्हणतो तो खोटा सिद्धांत म्हणून चिन्हांकित केला जाऊ शकतो. वस्तुस्थिती अशी आहे कि सैतानाला देवापेक्षा वर येण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्वर्गातून बाहेर फेकण्यात आले याचा अर्थ असा नाही की सैतानाने देवाच्या बरोबरीचा किंवा श्रेष्ठ होण्याचा प्रयत्न सोडला आहे, जसे की “द्वैतवादाच्या" मूलभूत सिद्धांतांवरून हे सिद्ध झाले आहे की मुख्यत्वे मानवी शहाणपणाच्या तत्त्वज्ञानात्मक मूळशब्दाद्वारे खाली आले आहे.
आपल्या विश्वाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणताही द्वैतवाद अस्तित्वात असू शकत नाही. फक्त एकच शक्ती आहे जी बलिष्ठ आहे, आणि ती शक्ती सर्वशक्तिमान देव आहे जसे कि पवित्र शास्त्राध्ये आपल्याला प्रकट केले आहे. शास्त्रीय पुराव्यांनुसार, दोन नाही, तर एकच शक्ती आहे जी सर्वशक्तिमान आहे. अशा प्रकारे, द्वैतवादाचा कोणताही सिद्धांत जो असा युक्तिवाद करतो की दोन समान शक्ती (चांगले आणि वाईट) एकमेकांना विरोध करतात तो एक खोटा सिद्धांत आहे.
English
द्वैतवाद म्हणजे काय?