settings icon
share icon
प्रश्नः

सार्वकालिक सुरक्षितता पवित्रशास्त्रावर आधारीत आहे का?

उत्तरः


जेंव्हा लोग खिस्ताला आपला तारणकर्ता म्हणून स्विकारतात, तेंव्हा त्यांची देवाबरोबर अगदी जवळीक नातेसंबंध होतात व त्यांना आपल्या सार्वकालिक सुरक्षिततेविषयी निश्वित खात्री होते. यहुदाच्या पत्रातील 24 वचनात, “तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपले आश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासयुक्त उभे करण्यास जो समर्थ आहे.” देवाचे सामार्थ्य विश्वासनाऱ्यांना पतन करण्यापासून वाचविण्यासाठी योग्य आहे. ते त्याच्यावर आहे,आमच्याकडे नाही, तो त्यांच्या गौरवयुक्तपणे उभे करितो. आमची सार्वकालिक सुरक्षितता, तिचा परिणाम देवाबरोबर आम्हाला देवाबरोबर वाचविण्याचा प्रयत्न करते, आम्ही स्वत:हून आपले तारण बनवून ठेऊ शकत नाही.

प्रभु येशु ख्रिस्ताने जाहिर केले, “मी तुम्हास सार्वकालिक जीवन देतो, त्याचा कधीही नाश होणार नाही; आणि कोणीही त्याच माझ्या हातून हिसकून घेणार नाही. आणि पित्याच्या हातून त्यास कोणाच्याने हिसकावून घेवत नाही.” (योहान 10:28-29 ब). येशुने आणि पित्याने दोघांनी आपणाला घट्ट असे पकडून घेतले आहे. त्यामुळे कोणी आम्हाला पित्याच्या व पुत्राच्या घट्ट पकडीतुन वेगळे करु शकत नाही?

इफिस 4:30 मध्ये म्हटले आहे “विश्वासनाऱ्यांना तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रीत झाला आहात.” जर विश्वासनाऱ्यांजवळ सार्वकालिक सुरिक्षितात आहे, तर त्यांची तारणाच्या दिवसापर्यंत मुक्तता खरी होऊ शकत नाही, परंतू पाप करित राहणे, सर्व धर्म त्यागने, कि अविश्वासणाऱ्यांच्या दिवसापर्यंत होते. योहान 3:15-16 मध्ये सांगण्यात आले. जो कोणी येशु ख्रिस्तावर विश्वास करितो “त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल.” जर एखादया व्यक्तीला सार्वकालिक जीवन देण्याचे अभिवचन दिले असेल. व त्यानंतर त्याच्यापासून ते वापस घेतले तर ते “सार्वकालिक” जीवन नव्हते. जर सार्वकालिक सुरक्षितता हे सत्य नाही आहे. तर पवित्र शास्त्रात सार्वकालिक जीवनाचे अभिवचन चुकीचे होऊ शकते.

सार्वकालिक सुरक्षिततेसाठी इतर वादामध्ये सर्वात महत्वाचा पुरावा रोम 8:38-39, “माझी खात्री आहे की, मरण जीवन देवदूत ,अधिपती, वर्तमान, अगर भविष्य अशा गोष्टी बले, आकाश, पाताळ, किंवा कोणती दुसरी सृष्ट वस्तू ,ख्रिस्त येशु आपला प्रभु यांचयामध्ये जी देवाची आपल्यावर प्रिती आहे. तिच्यापासून आपल्याला वेगळे करावयास समर्थ नाही.” आमची सार्वकालिक सुरक्षितता देवाच्या प्रेमावर व तारणावर आधारीत आहे. आमची सार्वकालिक सुरक्षितता येशुने मोलाने विकत घेतले ,पित्याद्वारे अभिवचन देण्यात आले ,आणि पवित्र आत्म्याद्वारे ती मुद्रीत करण्यात आली.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

सार्वकालिक सुरक्षितता पवित्रशास्त्रावर आधारीत आहे का?
© Copyright Got Questions Ministries