प्रश्नः
खोट्या संप्रदायाचे अथवा खोट्या धर्माचे पालन करणार्यास सुवार्ता सांगण्याची उत्तम पद्धत कोणती आहे?
उत्तरः
खोट्या संप्रदायांत अथवा खोट्या धर्मात शामिल झालेल्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण करू शकतो ती म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करणे. आम्हास प्रार्थना करण्याची गरज आहे की देव त्यांची अंतःकरणे बदलून टाकील आणि त्यांचे डोळे सत्याप्रत उघडील (करिंथकरांस 2 रे पत्र 4:4). आम्हास ही प्रार्थना करण्याची गरज आहे की देव प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे तारणासाठी त्यांच्या गरजेविषयी त्यांस विश्वास पटवून देईल (योहान 3:16). देवाच्या सामर्थ्यावाचून आणि पवित्र आत्म्याच्या खात्रीवाचून, आम्ही कधीही कोणास सत्य पटवून देण्याच्या बाबत यशस्वी होणार नाही (योहान 16:7-11).
आम्हास नीतिमान ख्रिस्ती जीवन जगण्याची देखील गरज आहे, यासाठी की पंथ आणि धर्मांच्या पाशात सापडलेल्यांनी आमच्यात तो बदल पाहावा जो देवाने आमच्या जीवनात घडवून आणला आहे (पेत्राचे 1 ले पत्र 3:1-2). आम्हास बुद्धीसाठी प्रार्थना करावयाची आहे की आम्ही सामर्थ्यपूर्ण पद्धतीने कशी त्यांची सेवा करू शकतो (याकोबाचे पत्र 1:5). ह्या सर्व गोष्टींनंतर, आम्ही सुवार्ता हिम्मतीने सुवार्ता सांगावी. आम्ही येशू ख्रिस्ताद्वारे तारणाचा संदेश घोषित करावा (रोमकरांस पत्र 10:9-10). आम्ही नेहमीच आपल्या विश्वासाचा बचाव करण्यासाठी तयार असावे (पेत्राचे 1 ले पत्र 3:5), पण असे आपण सौम्यपणे आणि आदरभावनेने करावे. आपण योग्यप्रकारे सिद्धांताची घोषणा करू शकतो, शब्दांचे युद्ध जिंकू शकतो, आणि तरीही सत्पत्त श्रेष्ठतेच्या भावनेने त्या कामात अडखळण आणू शकतो.
शेवटी, ज्या लोकांस आपण साक्ष देतो त्यांस आपण देवाच्या हाती सोडले पाहिजे. लोकांस तारण देणारे देवाचे सामथ्र्य व कृपा होय, आमचे आपले प्रयत्न नव्हेत. जोमाने आपल्या मतांचा बचाव करण्याची तयारी करणे आणि खोट्या श्रद्धांचे ज्ञान प्राप्त करणे उत्तम आणि शहाणपणाचे असले तरीही, त्या गोष्टींपैकी कोणत्याही गोष्टीमुळे संप्रदायांच्या आणि खोट्या धर्मांच्या खोटेपणात गुंतून पडलेल्यांचे परिवर्तन होणार नाही. सर्वात उत्तम म्हणजे आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो, त्यांस साक्ष देऊ शकतो, आणि त्यांच्यासमोर ख्रिस्ती जीवन जगू शकतो, आणि हा विश्वास करू शकतो की पवित्र आत्मा त्यांस स्वतःकडे ओढण्याचे, विश्वास घडवून देण्याचे आणि परिवर्तीत करण्याचे कार्य करील.
English
खोट्या संप्रदायाचे अथवा खोट्या धर्माचे पालन करणार्यास सुवार्ता सांगण्याची उत्तम पद्धत कोणती आहे?