प्रश्नः
ख्रिस्ती उपवास — बायबल काय म्हणते?
उत्तरः
पवित्र शास्त्र ख्रिस्ती विश्वासणार्यांस उपवास करण्याची आज्ञा देत नाही. परमेश्वर ख्रिस्ती विश्वासणार्याकडून त्याची मागणी करीत नाही. त्याचवेळी, बायबल उपवासास उत्तम, लाभदायक, आणि उपयुक्त मानते. प्रेषितांच्या कृत्यांत महत्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी विश्वासणार्यांनी उपवास केल्याचे लिहिले आहे (प्रेषितांची कृत्ये 13:2, 14:23). उपवास आणि प्रार्थना बरेचदा परस्पर निगडीत असतात (लूक 2:37; 5:33). बरेचदा, उपवासाचा जोर अन्नाच्या अभावावर असतो. त्याऐवजी, उपवासाचा हेतू हा असला पाहिजे की आम्ही जगीक गोष्टींवरून आपली दृष्टी काढून पूर्णपणे देवाकडे लक्ष द्यावे. उपवास हा देवास, आणि स्वतःस, हे दाखविण्याचा मार्ग आहे की आम्ही त्याच्यासोबतच्या आमच्या नात्याविषयी गंभीर आहोत. उपवास आम्हास एक नवीन दृष्टिकोण प्राप्त करण्यास व देवावर नव्याने अवलंबून राहण्यात मदत करते.
जरी पवित्र शास्त्रात उपवास हा नेहमी अन्नत्याग असतो, तरीही उपवास करण्याचे इतर मार्गही आहेत. आमचे सर्व लक्ष देवावर लावण्यासाठी एखाद्या गोष्टीचा अस्थायीरित्या त्याग करण्यास उपवास मानता येते (करिंथकरास 1ले पत्र 7:1-5). उपवास हा निश्चित समयापुरता मर्यादित असला पाहिजे, विशेषेकरून अन्नापासून उपवास करीत असतांना. न खाता अधिक काळपर्यंत राहणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. उपवासाचा हेतू शरीरास दंड देणे हा नाही, तर परमेश्वराकडे पुन्हा लक्ष लावणे होय. उपवासाला "डाएटिंग करण्याची पद्धत" समजता कामा नये. बायबलनुसार उपवासाचा हेतू वजन कमी करणे हा नाही, पण देवाबरोबर सखोल सहभागित्व प्राप्त करणे हा आहे. कोणीही उपवास करू शकते, पण काही जण अन्नाचा उपवास करू शकत नाहीत (उदाहरणार्थ, मधुमेहाचे रोगी). देवाचे निकट सान्निध्य प्राप्त करण्यासाठी कोणीही अल्पकाळाकरिता एखाद्या गोष्टीचा त्याग करू शकतो.
ह्या जगातील गोष्टींवरून आपले लक्ष दूर करण्याद्वारे, आपण अधिक यशस्वीरित्या ख्रिस्ताकडे आपले लक्ष लावू शकतो. उपवास हा आम्हाला जे हवे आहे ते करण्यासाठी देवास प्रवृत्त करण्याचा मार्ग नाही. उपवास आमच्यात परिवर्तन घडून आणतो, देवामध्ये नाही. उपवास हा इतरांपेक्षा अधिक आध्यात्मिक दिसण्याचा मार्ग नाही. उपवास हा नम्र प्रवृत्तीने आणि आनंदी वृत्तीने केला पाहिजे. मत्तय 6:16-18 घोषित करते, "तुम्ही जेव्हा उपास करिता तेव्हा ढोग्यांसारिखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोड विरूप करितात. मी तुम्हाला खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करितोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोड धू; अशा हेतूने की, तू उपास करीत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल."
English
ख्रिस्ती उपवास — बायबल काय म्हणते?