प्रश्नः
मनुष्यांस खरोखर स्वतंत्र इच्छा आहे का?
उत्तरः
जर “स्वतंत्र इच्छेचा” अर्थ असा आहे की देव मानवांना अशी निवड करण्याची संधी देतो, ज्याचा त्यांच्या भविष्यावर खरोखर प्रभाव पडू शकतो, तेव्हा होय, मनुष्यांस स्वतंत्र इच्छा असते. जगाची सध्याची पापी स्थिती आदाम आणि हव्वेने केलेल्या निवडींशी थेट जोडलेली आहे. देवाने मानवजातीला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले आणि त्यात निवडण्याची क्षमता देखील समाविष्ट आहे.
तथापि, स्वतंत्र इच्छेचा अर्थ असा नाही की मानवजातीला पाहिजे ते करता येईल. आमच्या निवडी आपल्या स्वभावाच्या अनुषंगाने मर्यादित आहेत. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य पूल ओलांडून पुढे जाण्याची किंवा न जाण्याची निवड करू शकतो; पण तो पुलावर उडण्याची निवड करू शकत नाही - त्याचा स्वभाव त्याला उडण्यापासून रोखत आहे. त्याच प्रकारे, एखादा मनुष्य स्वतःला नीतिमान बनविण्याची निवड करू शकत नाही - त्याचा (पाप) स्वभाव त्याला त्याचा अपराध रद्द करण्यास प्रतिबंधित करतो (रोम 3:23). म्हणून, स्वतंत्र इच्छा स्वभावाने मर्यादित आहे.
ही मर्यादा आपली जबाबदारी कमी करीत नाही. बायबल स्पष्ट आहे की आपल्याकडे केवळ निवडण्याची क्षमता नाही तर सुज्ञपणे निवडण्याचीही जबाबदारी आपल्यावर आहे. जुन्या करारात, देवाने एका राष्ट्राची निवड केली (इस्त्राएल), परंतु त्या राष्ट्रातील व्यक्तींनी तरीही देवाचे आज्ञापालन करण्याची जबाबदारी स्वीकारली. आणि इस्राएलच्या बाहेरील व्यक्तींनीही देवावर विश्वास ठेवण्याची आणि त्याचे अनुसरण करण्याची निवड केली (उदा. रूथ आणि राहाब).
नवीन करारात पापी लोकांना वारंवार पश्चात्ताप करण्याची व “विश्वास ठेवण्याची” आज्ञा देण्यात आली आहे (मत्तय 3:2; 4:17; प्रेषितांची कृत्ये 3:19; 1 योहान 3:23). पश्चात्ताप करण्याचे प्रत्येक पाचारण निवडण्याचे पाचारण आहे. विश्वास ठेवण्याची आज्ञा असे गृहीत धरते की ऐकून घेणारी व्यक्ती आज्ञा पाळण्याची निवड करू शकते.
“तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हांला इच्छा होत नाही,” (योहान 5:40) असे जेव्हा येशूने काही अविश्वासू लोकांस सांगितले तेव्हा त्याने त्यांची समस्या ओळखली. स्पष्टपणे, त्यांना पाहिजे तेव्हा ते येऊ शकले असते; त्यांची समस्या अशी होती की त्यांनी ते न करण्याची निवड केली. “माणूस जे पेरतो त्याची कापणी करतो” (गलती 6:7) आणि जे तारणाच्या बाहेरचे आहेत त्यांना कसलीही “सबब” नाही (रोम 1:20-21).
परंतु पापस्वभावामुळे मर्यादित मनुष्य जे चांगले आहे त्याची निवड कशी करू शकतो? केवळ देवाच्या कृपेने आणि सामथ्र्यानेच तारणाची निवड करण्याची क्षमता प्राप्त करण्याच्या अर्थाने स्वतंत्र इच्छा खरोखरच “स्वतंत्र” होते (योहान 15:16). पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीच्या इच्छेमध्ये व इच्छेद्वारे त्या व्यक्तीला नवा जन्म देण्यासाठी कार्य करतो (योहान 1:12-13) आणि त्याला/ तिला “आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला” नवीन स्वभाव देतो (इफिस 4:24) ). तारण हे देवाचे कार्य आहे. त्याच वेळी, आमचे हेतू, इच्छा आणि क्रिया स्वैच्छिक आहेत आणि त्यासाठी आपण योग्यच जबाबदार आहोत.
English
मनुष्यांस खरोखर स्वतंत्र इच्छा आहे का?