प्रश्नः
देवाने जेव्हा येशूला पाठविले तेव्हा त्याने का पाठविले? आधी का नाही? नंतर का नाही?
उत्तरः
”परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता“ (गलती 4:4). हे वचन घोषणा करते की देवपित्याने ”काळाची पूर्णता झाली, तेव्हा आपल्या पुत्राला पाठवले.“ पहिल्या शतकात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या किमान मानवी युक्तिवादानुसार ख्रिस्ताच्या त्यावेळी येण्यासाठी अनुकूल वाटत होत्या.
1) मशीहा येईल अशी त्या काळाच्या यहूद्यांमध्ये मोठी अपेक्षा होती. इस्त्राएलवर रोमन शासनाने यहूद्यांना मशीहाच्या येण्यासाठी भूकेले केले होते.
2) रोमने आपल्या शासनांतर्गत जगाचे बरेच भाग एकत्र केले होते आणि विविध देशांना ऐक्याचा बोध दिला होता. तसेच, साम्राज्य तुलनात्मकृष्ट्या शांत असल्याने प्रवास शक्य होता, ज्यामुळे सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांना सुवार्तेचा प्रसार करता आला. प्रवास करण्याचे असे स्वातंत्र्य इतर कालखंडात अशक्य झाले असते.
3) रोम सैन्यदृष्टीने विजय मिळविला होता, तर ग्रीसने सांस्कृतिकदृष्ट्या विजय मिळविला होता. ग्रीक भाषेचा एक “सामान्य” प्रकार (अभिजात ग्रीकपेक्षा वेगळा) एक व्यापार भाषा होती आणि संपूर्ण साम्राज्यात ती बोलली जात असे, ज्यामुळे एकाच सामान्य भाषेद्वारे अनेक वेगवेगळ्या गटांपर्यंत सुवार्ता पोहोचविणे शक्य झाले होते.
4) हे तथ्य की अनेक खोट्या मूर्ती त्यांना रोमन विजेत्यांवर विजय देण्यात अपयशी ठरल्यामुळे अनेकांनी त्या मूर्तींची उपासना सोडून दिली. त्याचवेळी, अधिक “सुसंस्कृत” शहरांमध्ये, त्या काळाच्या ग्रीक तत्त्वज्ञान आणि विज्ञानाने इतरांना आध्यात्मिकरित्या रिक्त सोडले ज्या प्रकारे कम्युनिस्ट सरकारच्या नास्तिकतेने आज आध्यात्मिक पोकळी सोडली आहे.
5) त्या काळातील रहस्यमय धर्मांनी एका तारणकत्र्या-देवावर जोर दिला आणि उपासकांना रक्ताचे बलिदान करण्याची आवश्यकता होती, ज्यामुळे ख्रिस्ताची सुवार्ता त्यांच्यामध्ये शेवटच्या बलिदानात सामील झाली. ग्रीक लोकही आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास ठेवतात (परंतु शरीराच्या नव्हे).
6) रोमन सैन्याने प्रांतातील सैनिकांची नेमणूक केली आणि या माणसांना रोमन संस्कृतीशी आणि अशा कल्पनांशी (जसे की सुवार्ता) परिचित केले जी अद्याप त्या बाह्य प्रांतांमध्ये पोहोचलेली नव्हते. ब्रिटनची सुवार्तेशी अगदी पहिली ओळख म्हणजे तिथे असलेल्या ख्रिस्ती सैनिकांच्या प्रयत्नांचा परिणाम.
उपरोक्त विधाने त्या लोकांवर आधारित आहेत जे त्या समयाकडे पाहून हा तर्क लावतात की इतिहासातील तो विशिष्ट क्षण ख्रिस्ताच्या आगमनासाठी उत्तम होता. परंतु आम्हाला हे समजते की देवाचे मार्ग आपले मार्ग नाहीत (यशया 55:8), आणि आपल्या पुत्राला पाठवण्यासाठी त्याने विशिष्ट वेळेची निवड का केली यामागील ही काही कारणे असू शकतात किंवा नसतीलही. गलतीकर 3 आणि 4 च्या संदर्भावरून हे स्पष्ट आहे, की देव यहूदी नियमशास्त्राद्वारे पाया घालण्याचा प्रयत्न करीत होता जो मशीहाच्या येण्याची तयारी करेल. नियमशास्त्र लोकांना त्यांच्या पापाची खोली समजून घेण्यास मदत करण्यासाठी होता (कारण ते नियम पाळण्यास असमर्थ होते) जेणेकरून येशू ख्रिस्ताद्वारे त्यांनी त्या पापाचा इलाज सहजपणे स्वीकारावा (गलती 3:22-23; रोम 3:9-20). मशीहा म्हणून लोकांना येशूकडे नेण्यासाठी नियमशास्त्र देखील “बालरक्षक” (गलती 3:24) होते. हे त्याने मशीहाविषयीच्या त्याच्या अनेक भविष्यवाण्यांच्या माध्यमातून केले ज्यांची पूर्तता येशूने केली. यामध्ये यज्ञपद्धती जोडा जी पापांसाठी तसेच त्याच्या स्वतःच्या अपूरेपणासाठी आवश्यक असलेल्या बलिदानाची आवश्यकता दर्शविते (प्रत्येक बलिदानात नेहमीच नंतर अतिरिक्त गोष्टींची आवश्यकता असे). जुन्या कराराच्या इतिहासामध्ये अनेक कार्यक्रम आणि धार्मिक सणांद्वारे ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाचे आणि त्याच्या कार्याचे चित्र देखील रेखाटले गेले होते (जसे की इसहाकाला अर्पण करण्याची अब्राहमाची तयारी किंवा मिसरमधून निघताना वल्हांडण सणाच्या तपशिलाची माहिती इ.).
शेवटी, जेव्हा विशिष्ट भविष्यवाणीची परिपूर्ती झाली तेव्हा ख्रिस्त आला. दानीएल 9:24-27 “सत्तर आठवड्यांविषयी” किंवा सत्तर “सप्तकां” बद्दल बोलतो. संदर्भानुसार, हे “आठवडे” किंवा “सप्तके” सात दिवसांचे नव्हे तर सात वर्षांचे समूह आहेत. आम्ही इतिहासाचे परीक्षण करू शकतो आणि पहिल्या एकोण सत्तर आठवड्यांच्या तपशीलांची माहिती देऊ शकतो (सत्तरवा आठवडा भविष्यातील टप्प्यावर घडून येईल) सत्तर सप्तकांची गणना “यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून” सुरू होतो (वचन 25). ही आज्ञा अर्तक्षयर्ष लॉन्गीमॅनसने ई.पू. 445 मध्ये दिली होती. (नहेम्या 2:5 पहा) सात “सप्तकांनतंर” आणि बासष्ठ “आठवडे,” किंवा 69 गुना 7 वर्षानंतर, भविष्यवाणी सांगते, “बासष्ट सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल, व त्याला काही उरणार नाही. आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्रस्थान उद्ध्वस्त करतील” आणि “त्याचा अंत पुराने होईल“ (अर्थात मोठा नाश) (व. 26). येथे आमच्याकडे वधस्तंभावर तारणार््याच्या मृत्यूचा एक स्पष्ट उल्लेख नाही. शतकांपूर्वी सर रॉबर्ट अँडरसन यांनी ‘द कॉमिंग प्रिन्स’ या पुस्तकात ‘भविष्यसूचक वर्षांचा’ वापर करून लीप वर्षं, दिनदर्शिकेतील त्रुटी, ई.पू. ते सन यांच्यातील बदल यांचा उपयोग करून एकोणतीस आठवड्यांची तपशीलवार गणना केली, आणि असा अंदाज लावला की येशूच्या मृत्यूच्या पाच दिवस आधी यरुशलेमामध्ये विजयाच्या प्रवेशाच्या दिवशी एकोणतीस आठवडे पूर्ण झाले. या समयसारणीचा वापर कोणी करो किंवा न करो, हा मुद्दा असा आहे की ख्रिस्ताच्या देहधारणाची वेळ यापूर्वी दानीएलने पाचशे वर्षांपूर्वी नोंदविलेल्या या तपशीलवार भविष्यवाणीशी जुळते.
ख्रिस्ताच्या देहधारणाची वेळ अशी होती की त्या काळातले लोक त्याच्या येण्याच्या तयारीत होते. तेव्हापासून प्रत्येक शतकातील लोकांकडे अनेक पुरावे आहेत आणि पवित्र शास्त्रातील त्याच्या पूर्णतेद्वारे येशू खरोखरच अभिवचन दिलेला मशीहा होता ज्याने त्याच्या येण्याविषयी तपशीलवारपणे संदेश दिले व भविष्यवाणी केली.
English
देवाने जेव्हा येशूला पाठविले तेव्हा त्याने का पाठविले? आधी का नाही? नंतर का नाही?