प्रश्नः
अति खादाडपणा हे पाप आहे काय? पवित्र शास्त्र जास्त खाण्याबद्दल काय सांगते?
उत्तरः
अति खादाडपणा हे पाप आहे ज्याला ख्रिस्ती लोकांना दुर्लक्षित करायला आवडते. आपण बऱ्याचदा धुम्रपान आणि मद्यपान हे पाप आहे असे सांगण्यात घाई करतो, परंतु काही कारणास्तव अति खादाडपणाचा स्वीकार करतो किंवा कमीतकमी त्याची तक्रार न करता सहन करतो. जसे आरोग्य आणि व्यसन यातील वादविवादापैकी बऱ्याच वादविवादांना धुम्रपान आणि मद्यपान यांच्या विरुद्ध वापरले जाते, तसेच जास्त खाण्याबद्दलही वापरले पाहिजे. अनेक विश्वास ठेवणारे लोक मद्याचा एखादा पेला पिण्याचा किंवा एखादी सिगारेट ओढण्याचा विचार सुद्धा करत नाहीत, परंतु जेवणाच्या मेजावर असताना आघाशीपणे खाताना त्यांना जरासुद्धा बैचेनी वाटत नाही. हे असे नसायला पाहिजे!
नीतिसुत्रे 23:20-21 आपल्याला सावधान करते की, “मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्यास उभा राहू नको; कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंध्या नेसवितो.” नितीसुत्रे 28:7 सांगते, “सुज्ञ पुत्र धर्मशास्त्र पाळितो, पण खादाडांचा सोबती आपल्या बापास खाली पहावयास लावितो.” नितीसुत्रे 23:2 घोषित करते, “तु खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव.”
शारीरिक भूक ही स्वतःवर नियंत्रण ठेवण्याच्या आपल्या क्षमतेच्या समान आहे. जर आपण आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेऊ शकलो नाही तर आपण आपल्या इतर सवयींवर जसे की विचारांमधील (वासना, लोभ, क्रोध) यांवर नियंत्रण ठेऊ शकणार नाही आणि आपल्या मुखाला गप्पा किंवा लावालावी करण्यापासून आवरू शकणार नाही. आपण आपल्या भुकेला आपल्यावर नियंत्रण करू देऊ शकत नाही, परंतु आपले आपल्या भुकेवर नियंत्रण असले पाहिजे. (पहा अनुवाद 21:20. नितीसुत्रे 23:2, 2 पेत्र 1:5-7, 2 तीमथ्या 3:1-9, आणि 2 करिंथ 10:5.) काहीही जास्तीचे करण्याला “नाही” म्हणण्याची क्षमता—आत्मनियंत्रण—हे एक आत्म्याचे फळ आहे जे सर्व विश्वासणाऱ्यांमध्ये सामान्य आहे (गलती 5:22).
देवाने पृथ्वीला स्वादिष्ट, पौष्टिक, आणि आनंददायी अशा अन्नपदार्थांनी परिपूर्ण करून आपल्याला आशीर्वादित केले आहे. आपण देवाच्या निर्मितीचा सन्मान त्या अन्नपदार्थांचा आस्वाद घेऊन आणि त्यांना योग्य प्रमाणत खाऊन केला पाहिजे. भूक आपल्यावर नियंत्रण मिळवण्याऐवजी आपण भुकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी देवाने आपल्याला बोलावले आहे.
English
अति खादाडपणा हे पाप आहे काय? पवित्र शास्त्र जास्त खाण्याबद्दल काय सांगते?