प्रश्नः
मोठे पांढरे राजासन काय आहे?
उत्तरः
मोठ्या पांढर्या राजासनासमोरील न्यायाचे वर्णन प्रकटीकरण 20:11-15 मध्ये करण्यात आले आहे आणि हरविलेल्यांस अग्नीसरोवरात टाकण्यापूर्वीचा हा शेवटचा न्याय आहे. प्रकटीकरण 20:7-15 वरून आम्ही हे जाणतो की हा न्याय हजार वर्षांच्या राज्यानंतर आणि सैतान, पशु, आणि खोटे संदेष्ट्यांस अग्नीसरोवरात टाकल्यानंतर हा न्याय घडून येईल (प्रकटीकरण 20:7-10). जी पुस्तके उघडली जातील (प्रकटीकरण 20:12) त्यात प्रत्येकाच्या कामांचा लेख आहे, मग ती कामे चांगली असोत वा वाईट, कारण जे काही बोलले गेले आहे, करण्यात आले आहे, ती प्रत्येक गोष्ट अथवा विचारसुद्धा देव जाणतो, आणि त्यानुसार तो प्रत्येकास प्रतिफळ अथवा दंड देईल (स्तोत्र 28:4; 62:12; रोमकरांस पत्र 2:6; प्रकटीकरण 2:23; 18:6; 22:12).
तसेच या वेळी, दुसरे पुस्तक उघडले जाईल, ज्यास "जीवनाचे पुस्तक" म्हटले गेले आहे (प्रकटीकरण 20:12). हेच पुस्तक ठरविणार आहे की व्यक्ती परमेश्वर देवासोबत सार्वकालिक जीवनाचा वारस ठरणार आहे अथवा त्याला अग्नीसरोवरात सार्वकालिक दंड प्राप्त होईल. जरी ख्रिस्ती विश्वासणार्यास त्यांच्या कृत्यांकरिता जबाबदार मानले गेले आहे, तरी त्यांस ख्रिस्ताठायी क्षमा प्राप्त झाली आहे आणि "जगाच्या स्थापनेपासून त्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात" लिहिण्यात आलेली होती (प्रकटीकरण 17:8). पवित्र शास्त्रावरून आम्हास हे देखील माहीत आहे की न्यायाच्या वेळी मृतकांचा न्याय "ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे" ठरविण्यात येईल (प्रकटीकरण 20:12) आणि "ज्या कोणाचे नाव" त्या "जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडणार" नाही त्यांस "अग्नीच्या सरोवरात टाकले जाईल" (प्रकटीकरण 20:15).
ही वस्तुस्थिती की सर्व मनुष्यांसाठी, विश्वासणारे आणि अविश्वासणारे, शेवटचा न्याय होणार आहे, याची पवित्र शास्त्राच्या अनेक परिच्छेदांत स्पष्टपणे पुष्टी करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्ती एक दिवस ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे उभा राहील आणि त्याच्या किंवा तिच्या कृत्यांचा न्याय केला जाईल. हे अत्यंत स्पष्ट आहे की मोठ्या पांढर्या राजासनासमोरील न्याय शेवटचा न्याय आहे, तरीही ख्रिस्ती लोक याविषयी सहमत नाहीत की त्याचा संबंध बायबलमध्ये उल्लेखिलेल्या इतर न्यायांशी कसा आहे, विशेषेकरून, मोठ्या पांढर्या राजासनासमोरील न्यायाच्या वेळी कोणाचा न्याय केला जाईल.
काही ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की पवित्र शास्त्र येणारे तीन वेगवेगळे न्याय दाखविते. पहिला आहे मेंढरांचा आणि शेरड्यांचा अथवा राष्ट्रांचा न्याय (मत्तय 25:31-36). हे मोठ्या संकटकाळानंतर पण हजार वर्षांच्या राज्यापूर्वी होईल; त्याचा हेतू हे ठरविणे आहे की हजार वर्षांच्या राज्यात कोणाचा प्रवेश होईल. दुसरा न्याय म्हणजे विश्वासणार्याच्या कामांचा न्याय, बहुधा याचा उल्लेख "ख्रिस्ताचे न्यायासन (बेमा)" असा केला जातो (करिंथकरांस 2 रे पत्र 5:10). ह्या न्यायाच्या वेळी ख्रिस्ती विश्वासणार्यास त्यांच्या कार्यासाठी अथवा देवाच्या सेवेसाठी वेगवेगळ्या प्रमाणात पुरस्कार दिले जातील. तिसरा आहे हजार वर्षांच्या राज्याच्या शेवटी मोठ्या पांढर्या सिंहासनासमोरील न्याय (प्रकटीकरण 20:11-15). हा अविश्वासणार्याचा न्याय असेल ज्यात त्यांच्या कामांनुसार त्याचा न्याय केला जाईल आणि त्यांस अग्नीच्या सरोवरात सार्वकालिक दंड दिला जाईल.
इतर ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की हे तिन्ही न्याय एकाच शेवटच्या न्यायाविषयी सांगतात, तीन वेगवेगळ्या न्यायांविषयी नाही. दुसर्या शब्दांत, प्रकटीकरण 20:11-15 यातील पांढर्या मोठ्या राजासनासमोरील न्याय ती वेळ असेल जेव्हा विश्वासणारे आणि अविश्वासू ह्या दोघांचा सारखाच न्याय केला जाईल. ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आढळून येतील त्यांचा न्याय त्यांच्या कृत्यांसाठी केला जाईल यासाठी की जे पुरस्कार ते प्रापत करणार आहेत अथवा गमाविणार आहेत ते ठरविले जावे. ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात नाहीत त्यांचा न्याय हे ठरविण्यासाठी त्यांच्या कृत्यांनुसार केला जाईल की अग्नीच्या सरोवरात त्यांस किती प्रमाणात दंड दिला जाईल. ह्या मताचे पालन करणारे असा विश्वास धरता की मत्तय 25:31-46 ही वचने मोठ्या पांढर्या राजासनासमोरील न्यायाच्या वेळी काय घडणार आहे याचे दुसरे वर्णन आहेत. ते या गोष्टीकडे अंगुलीनिर्देश करतात की ह्या न्यायाचा परिणाम अगदी तसाच होईल जसे प्रकटीकरण 20:11-15 यातील मोठ्या पांढर्या राजासनासमोरील न्यायानंतर होईल. मेढरे (विश्वासणारे) सार्वकालिक जीवनात प्रवेश करतात, तर शेरडे (अविश्वासू) "सार्वकालिक शिक्षेसाठी" टाकले जातील (मत्तय 25:46).
मोठ्या पांढर्या राजासनासमोरील न्यायासंबंधाने व्यक्तीचे मत काहीही का असे ना, येणार्या न्यायाशी संबंधित गोष्टींकडे कधीही डोळेझाक करता कामा नये. पहिले म्हणजे, येशू ख्रिस्त न्यायाधीश असेल, सर्व विश्वास न धरणार्याचा ख्रिस्त न्याय करील, आणि त्यांनी केलेल्या कृत्यांनुसार त्यांस दंड दिला जाईल. बायबल अत्यंत स्पष्टपणे सांगते की अविश्वासणारे स्वतःविरुद्ध देवाचा क्रोध साठवीत आहेत (रोमकरांस पत्र 2:5) आणि देव "प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल" (रोमकरांस पत्र 2:6). विश्वासणार्याच्या देखील ख्रिस्ताद्वारे न्याय केला जाईल, पण ख्रिस्ताचे नीतिमत्व आमच्या लेखी लिहिण्यात आले आहे आणि आमची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, म्हणून आम्हास, आमच्या कृत्यांनुसार पुरस्कार लाभेल, पण शिक्षा मिळणार नाही. रोमकरांस पत्र 14:10-12 म्हणते की आम्ही सर्व जण ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहू आणि आमच्यापैकी प्रत्येकाला देवास हिशोब द्यावा लागेल.
English
मोठे पांढरे राजासन काय आहे?