प्रश्नः
आम्हास रक्षक देवदूत आहेत का?
उत्तरः
मत्तय 18:10 मध्ये असे म्हटले आहे: “सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात.” या संदर्भात, “या लहानातील एक” एकतर त्याच्यावर विश्वास ठेवणार्याना (व. 6) लागू होऊ शकते किंवा लहान मुलांचा उल्लेख करू शकते (व. 3-5). हा संरक्षक देवदूतांबद्दल महत्त्वाचा परिच्छेद आहे. यात काही शंका नाही की चांगले देवदूत संरक्षण करण्यास मदत करतात (दानीएल 6:20-23; 2 राजे 6:13-17), माहिती प्रगट करतात (प्रेषितांची कृत्ये 7:52-53; लूक 1:11-20), मार्गदर्शन करतात (मत्तय 1:20-21; प्रेषितांची कृत्ये 8:26), तरतूद करतात (उत्पत्ति 21:17-20; 1 राजे 19:5-7), आणि सर्वसाधारणपणे विश्वासू लोकांची सेवा करतात (इब्री 1:14).
प्रश्न हा आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी किंवा प्रत्येक विश्वासणार्यासाठी एक देवदूत नियुक्त केलेला आहे किंवा नाही. जुन्या करारामध्ये, इस्राएल राष्ट्रासाठी आद्यदिव्यदूत (मीखाएल) नेमण्यात आला होता (दानीएल 10:21; 12:1), परंतु पवित्र शास्त्रात कोठेही असे म्हटलेले नाही की एखाद्या देवदूताला एखाद्या व्यक्तीसाठी “नियुक्त” केले जाते (देवदूतांस कधीकधी व्यक्तींकडे पाठविले जात असे, परंतु कायम नेमण्याचा उल्लेख नाही). जुन्या आणि नवीन कराराच्या दरम्यान यहूदी लोकांनी रक्षक देवदूतांवर विश्वास ठेवू लागले. मंडळीच्या काही प्रणेत्यांचा असा विश्वास होता की प्रत्येक व्यक्तीसाठी एक चांगला देवदूतच नेमलेला नसतो, तर दुरात्मा देखील आहे. संरक्षक देवदूतांवरील विश्वास बर्याच काळापासून आहे, परंतु त्यासाठी कोणताही स्पष्ट पवित्र शास्त्रीय आधार नाही.
मत्तय 18:10 कडे परत जाऊ या, ग्रीक भाषेत “त्यांचे” हा शब्द सामुहिक सर्वनाम आहे आणि या वस्तुस्थितीचा उल्लेख करतो की देवदूत सामान्यतः विश्वासणार्याची सेवा करतात. या देवदूतांचे वर्णन “नेहमी” असे चित्रित केले आहे जे देवाचे मुख पाहतात जेणेकरून जेव्हा एखाद्या विश्वासणार्याला मदत करणे आवश्यक असेल तेव्हा त्यांना देण्यात आलेली त्याची आज्ञा ऐकावी. या परिच्छेदातील देवदूत स्वर्गातील पित्याकडे लक्ष देण्याइतके एखाद्या व्यक्तीचे रक्षण करीत असल्याचे दिसत नाही. तर सक्रिय कर्तव्य किंवा देखरेख हे देवदूतांपेक्षा देवाकडून अधिक आलेले दिसते, जे अर्थपूर्ण वाटते कारण केवळ देव सर्वज्ञानी आहे. तो प्रत्येक क्षणी प्रत्येक विश्वासणार्याला पाहतो, आणि आपल्यातील एखाद्याला देवदूताच्या हस्तक्षेपाची केव्हा आवश्यकता आहे हे केवळ तोच जाणतो. कारण ते सातत्याने त्याचा चेहरा पहात असतात, कारण देवदूत त्याच्या एका “लहानाला” मदत करण्यासाठी त्याच्याजवळ राहतात.
प्रत्येक विश्वासणार्याकडे संरक्षक देवदूत नियुक्त केलेला आहे की नाही याचे पवित्र शास्त्रातून ठामपणे उत्तर दिले जाऊ शकत नाही. परंतु, आधी सांगितल्याप्रमाणे देव आमची सेवा करण्यासाठी देवदूतांचा उपयोग करतो. असे पवित्र शास्त्रानुसार आहे की जसा तो आमचा उपयोग करतो तसा तो त्यांचा उपयोग करतो; म्हणजेच, त्याचा हेतू साध्य करण्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारे आमची किंवा त्यांची गरज नाही, परंतु तरीही त्याने आमचा आणि त्यांचा उपयोग करण्याची निवड केली आहे (ईयोब 4:18; 15:15).
शेवटी, आमचे रक्षण करण्यासाठी आपल्याकडे देवदूत नियुक्त केलेला असो वा नसो, याविषयी आपणास देवाकडून आणखी मोठे आश्वासन लाभले आहे: जर आपण ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे त्याची मुले आहोत तर तो सर्व गोष्टी कल्याणकारक करतो (रोम 8:28-30), आणि येशू ख्रिस्त आम्हाला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाही (इब्री 13:5-6). जर आपल्याजवळ सर्वज्ञानी, सर्वशक्तिमान, सर्व प्रेमळ देव असल्यास आपल्यासाठी एक संरक्षक देवदूत संरक्षण करण्यासाठी नेमलेला आहे की नाही याने खरोखर काही फरक पडतो काय?
English
आम्हास रक्षक देवदूत आहेत का?