प्रश्नः
एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने तारणा-अगोदरच्या अथवा तारणा-नंतरच्या पापाबद्दलच्या दोषी भावनांचा सामना कसा करावा?
उत्तरः
प्रत्येकाने पाप केले आहे आणि पापाच्या परिणामांपैकी दोषी हा एक परिणाम आहे. दोषी भावनांबद्दल आपणाला अभारयुक्त असणे गरजेचे आहे कारण या भावना आपल्याला क्षमा मिळविण्यासाठी उद्युक्त करतात. एखादा व्यक्ती जेंव्हा पापापासून विश्वासाने येशू ख्रीस्तांकडे वळतो त्याच क्षणी त्याचे पाप क्षमा केले जाते. पश्चात्ताप हा विश्वासाचा एक भाग आहे जो तारणाकडे अगुवाई करतो (मत्तय 3:2; 4:17; प्रेषितांची कृत्ये 3:19).
ख्रिस्तामध्ये, अगदी भयंकर पापेदेखील पुसून टाकली जातात (क्षमा केली जाऊ शकतील अशा अधार्मिक कृत्यांच्या यादीसाठी 1 करिंथकरांस पत्र 6:9-11 पहा). तारण कृपेने आहे, आणि कृपा क्षमा करते. एखाद्या व्यक्तीचे तारण झाले असले, तरी तो पाप करण्याची शक्यता आहे, आणि तेव्हाही देव त्याला क्षमा करण्याचे वचन देतो. “जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे” (1 योहान 2:1).
पापापासून मुक्ती म्हणजे नेहमीच दोषी भावनांपासून मुक्ती असे नाही. जरी आपल्या पापांची क्षमा झालेली आहे, तरीही आपणास त्याचे स्मरण राहते. तसेच, “आमच्या बंधूंना दोष देणारा” (प्रकटीकरण 12:10) असा आपला आत्मिक शत्रू आहे जो आपले अपयश, दोष व पाप याची आपणास सतत आठवण करून देतो. जेव्हा एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला आपण दोषी असल्याची भावना निर्माण होते तेव्हा त्याने किंवा तिने पुढील गोष्टी केल्या पाहिजेत:
1) पूर्वी कबूल न केलेल्या पापाची सर्व ज्ञात कबुली द्या. काही प्रकरणांमध्ये, कबुली आवश्यक असल्यामुळे दोषी भावना रास्त आहे. पुष्कळदा, आपल्याला दोषी असल्याचे वाटते कारण आपण दोषी असतो! (दाविदाचे दोषीपणाचे वर्णन आणि त्याचे समाधान स्तोत्रसंहिता 32:3-5 मध्ये पहा.)
2) आणखीन कोणत्या पापाबद्दल कबुली द्यायची राहिली असल्यास देवाने ते दाखवून द्यावे अशी प्रार्थना करा. परमेश्वरासमोर संपूर्णपणे मुक्त व प्रामाणिक राहण्याचे धैर्य बाळगा. “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव" (स्तोत्रसंहिता 139:23-24).
3) देव ख्रिस्ताने सांडलेल्या रक्तामुळे पाप क्षमा करील आणि दोष दूर करील या देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवा (1 योहान 1:9; स्तोत्रसंहिता 85:2; 86:5; रोमकरांस पत्र 8:1).
4) जेव्हा कबूल केलेल्या आणि सोडून दिलेल्या पापांबद्दल दोषी भावना उद्भवतात तेव्हा अशा भावनांना खोट्या किंवा चुकीच्या दोषी भावना म्हणून नाकारून द्या. परमेश्वर क्षमा करण्याच्या आपल्या अभिवचनास खरा आहे. स्तोत्रसंहिता 103:8-12 वाचा आणि त्यावर मनन करा.
5) परमेश्वराजवळ तुमचे दोष दाखवणाऱ्या सैतानाला दटावण्याची आणि दोषापासून मुक्त झालेल्या आनंदाची परतफेड करण्याची प्रार्थना करा (स्तोत्रसंहिता 51:12).
स्तोत्रसंहिता 32 एक अतिशय फायदेशीर अभ्यास आहे. दाविदाने भयानक पाप केले असले तरीसुद्धा त्याला पाप आणि दोषी भावनांपासून मुक्ती प्राप्त झाली. त्याने दोषाचे कारण आणि क्षमेच्या वास्तविकतेचा सामना केला. स्तोत्रसंहिता 51 हा तपासणीसाठीचा आणखी एक चांगला उतारा आहे. येथे पापाची कबुली देत असताना दाविदाने दोषाने आणि दु:खाने भरलेल्या अंत:करणातून देवाकडे विनवणी केली यावर जोर देण्यात आला आहे.
शेवटी, जर पाप कबूल करण्यात आले असेल, त्याबाबत पश्चात्ताप केलेला असेल आणि त्याची क्षमा केली गेली असेल तर, हि पुढे निघून जाण्याची वेळ आहे. “म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे” (2 करिंथकरांस पत्र 5:17). भूतकाळातील गेलेल्या “जुन्या” भागाचा एक भाग म्हणजे मागील पापांची आठवण आणि त्यांनी निर्माण केलेल्या दोषाची स्मरण होय. दुर्दैवाने, ज्या पापाच्या आठवणी फार पूर्वी मरण पावलेल्या आणि पुरल्या गेल्या पाहिजे होत्या अशा पूर्वीच्या पापी जीवनाच्या आठवणींमध्ये काही ख्रिस्ती लोक आजही खूप खचले गेलेले आहेत. हे निरर्थक असून ख्रिस्ताने आपल्यासाठी इच्छिलेल्या ख्रिस्ती जीवनाच्या उटल आहे. एक सुज्ञ विधान आहे की “जर देवाने तुम्हाला घाणीतून वाचवले असेल तर, त्यामध्ये पुन्हा उडी मारून पोहू नका.”
English
एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने तारणा-अगोदरच्या अथवा तारणा-नंतरच्या पापाबद्दलच्या दोषी भावनांचा सामना कसा करावा?