प्रश्नः
स्वर्ग कशासारखे आहे?
उत्तरः
पवित्र शास्त्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वर्ग एक खरी जागा आहे. एकट्या नवीन करारामध्ये “स्वर्ग” हा शब्द 276 वेळा सापडतो. तीन स्वर्ग असल्याचा शास्त्र संदर्भ देते. प्रेषित पौल “तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलला गेला होता,” परंतु त्याने तेथे काय अनुभवले हे प्रकट करण्याची त्याला मनाई करण्यात आली होती (2 करिंथ 12:1-9).
जर तिसरे स्वर्ग अस्तित्वात आहे, तर मग बाकीचे दोन स्वर्ग सुद्धा असले पाहिजेत. पहिल्याचा संदर्भ जुन्या करारामध्ये बऱ्याचदा “आकाश” किंवा “संपूर्ण आकाश” म्हणून देण्यात आला आहे. हे ते स्वर्ग आहे जिथे ढग असतात आणि ज्यामधून पक्षी उडतात. दुसरे स्वर्ग हे दोन किंवा अधिक ताऱ्यांदरम्यान/बाहेरील अंतराळामध्ये आहे, जे ताऱ्यांचे, ग्रहांचे, आणि इतर आकाशाच्या वस्तूंचे निवासस्थान आहे (उत्पत्ती 1:14-18).
तीसरे स्वर्ग, ज्याचे स्थान प्रकट केलेले नाही, जे देवाचे राहण्याचे स्थान आहे. येशूने खऱ्या ख्रिस्ती लोकांसाठी स्वर्गामध्ये जागा तयार करण्याचे अभिवचन दिले आहे (योहान 14:2). स्वर्ग हे जुन्या करारातील संत लोकांचे सुद्धा इष्ट स्थान आहे, जे, देव तारणारा पाठवील या वचनावर विश्वास ठेवत मेले (इफिस 4:8). जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल (योहान 3:16).
स्वर्गीय शहर बघण्याचे आणि त्याचा वृतांत देण्याचे सौभाग्य प्रेषित योहानाला मिळाले (प्रकटीकरण 21:10-27). योहान त्या स्वर्गाचा (नवीन पृथ्वीचा) जी “देवाच्या तेजाने” (प्रकटीकरण 21:11), देवाच्या अतिशय उपस्थितीने भरलेली होती त्याचा साक्षीदार होता. कारण स्वर्गामध्ये रात्र नाही आणि देव स्वतः प्रकाश आहे, आणि त्यांस दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही (प्रकटीकरण 22:5).
शहर अति मौल्यवान रत्नांनी आणि स्फटीकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्फे खड्यासारख्या खड्यांनी भरलेले होते. स्वर्गाला बारा वेशी (प्रकटीकरण 21:12) आणि बारा पाये (प्रकटीकरण 21:14) होते. एदेन बागेच्या नंदनवनाची पुनर्स्थापना झाली: जीवनाच्या पाण्याची नदी मुक्तपणे वाहत होती आणि जीवनाचे झाड पुन्हा उपलब्ध होते, जे दर महिन्याला फळे उपजविते आणि त्याची पाने “राष्ट्रांच्या आरोग्यासाठी” उपयोगी पडतात (प्रकटीकरण 22:1-2). तथापि, स्वर्गाचे वर्णन करताना योहान कितीही प्रभावी असला, तरी स्वर्गाची वस्तुस्थिती ही मर्यादित मनुष्याच्या वर्णन करण्याच्या क्षमतेच्या पलीकडली आहे (1 करिंथ 2:9).
स्वर्ग हे “यापुढे नाही” अशा गोष्टींची जागा आहे. तेथे यापुढे अश्रू नाहीत, दुःख नाही, आणि शोक नाही (प्रकटीकरण 21:4). तेथे यापुढे वेगळे होणे नाही, कारण मृत्यूला जिंकण्यात येईल (प्रकटीकरण 20:6). स्वर्गाबद्दलची चांगली गोष्ट म्हणजे आपला प्रभू आणि तारणारा यांची उपस्थिती होय (1 योहान 3:2). आपण ज्याने आपल्यावर प्रेम केले आणि स्वतःला आपल्यासाठी बलिदान म्हणून दिले त्या देवाच्या कोकऱ्याच्या समोरासमोर असू, जेणेकरून आपण स्वर्गामध्ये सार्वकालासाठी त्याच्या उपस्थितीचा आनंद घेऊ शकू.
English
स्वर्ग कशासारखे आहे?