प्रश्नः
स्वर्गातील लोक खाली पाहू शकतात काय आणि आम्हापैकी जे अद्याप पृथ्वीवर आहेत त्यांस पाहू शकतात काय?
उत्तरः
काही लोक इब्री लोकांस पत्र 12:1 या वचनात ही कल्पना पाहतात की स्वर्गातील लोक खाली पाहू शकत असतील आणि आम्हास पाहण्याची क्षमता त्यांत असेलः "तर मग, आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो..." "साक्षी" विश्वासाचे नायक आहेत ज्यांची यादी इब्री लोकांस पत्र 11 या अध्यायात देण्यात आली आहे, आणि आम्ही त्यांनी "वेढलेले" आहोत या गोष्टींमुळे काही टीकाकार हे समजण्यास प्रवृत्त झाले की ते नायक अथवा वीर (आणि शक्यतः इतर लोक) स्वर्गातून आमच्याकडे पाहत आहेत.
आम्ही काय करीत आहो हे पाहाण्यासाठी लोक स्वर्गातून खाली पाहतात ही कल्पना लोकप्रिय संस्कृतीत सर्वसाधारण आहे. पण, आमचे प्रभूकडे गेलेले प्रियजन आम्हास पाहत आहेत ही कल्पना आम्हाला कितीही आवडत असली, तरीही इब्री लोकांस पत्र 12:1 हे शिकवीत नाही. इब्री लोकांस पत्र 11 च्या आधारे, लेखक काही व्यवहारिक धडे शिकवीत आहे (म्हणूनच 12व्या अध्यायाची सुरूवात "तर मग" ने झालेली आहे). "साक्षी" ते लोक आहेत ज्यांची देव 11व्या अध्यायात त्यांच्या विश्वासासाठी स्तुती करतो, आणि स्वर्गात त्यांची मोठी गर्दी आहे. प्रश्न हा आहे की, ते कशाप्रकारे "साक्षी" आहेत?
इब्री लोकांस पत्र 12:1 चा योग्य अर्थ हा आहे की "साक्षीचा मेघ" तयार करणारे स्त्री आणि पुरुष विश्वासाद्वारे जीवन जगण्याच्या मोलाचे साक्षीदार आहे. त्यांच्या जुन्या कराराच्या गोष्टी भीतीऐवजी विश्वासाची निवड करण्याच्या आशीर्वादांची साक्ष देतात. इब्री लोकांस पत्र 12:1 च्या सुरूवातीचा भावानुवाद असा करता येईल, "आमच्याजवळ सिद्ध केलेल्या विश्वासाचे इतकी पारखलेली-आणि-खरी उदाहरणे असतांना..." म्हणून, असे नाही की स्वर्गातील लोक आम्हास पाहत आहेत (जणूकाही पृथ्वीवरील आमची जीवने इतकी मनोरंजक आहेत अथवा त्यांच्याजवळ यापेक्षा उत्तम असे दुसरे कुठलेच काम नाही!), पण जे आमच्यापूर्वी निघून गेले आहेत त्यांनी आमच्यासाठी एक कायमचे उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या जीवनाचा लेख विश्वास आणि देव आणि सत्य यांची साक्ष देतो.
इब्री लोकांस पत्र 12:1 पुढे म्हणते, "म्हणून आपला सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे." आमच्यापुढे गेलेल्या विश्वासणार्याच्या विश्वासामुळे आणि धीरामुळे, आमच्या स्वतःच्या विश्वासाच्या धावेत आपल्या धावपट्टीवर टिकून राहण्याची प्रेरणा आम्हास प्राप्त होते. आपण अब्राहाम आणि मोशे आणि राहाब आणि गिदोन इत्यादींची उदाहरणे अनुसरण करतो.
काही लोक लूक 16:28 मध्ये श्रीमंत माणसाने त्याच्या भावांच्या केलेल्या उल्लेखाकडे ह्या गोष्टीचा पुरावा म्हणून संकेत करतात की मेलेले आत्मे (कमीत कमी, नरकातील) पृथ्वीवरील घटना पाहू शकतात. तथापि, हा उतारा कधीही असे म्हणत नाही की श्रीमंत माणूस त्याच्या भावांस पाहू शकत होता; त्याला माहीत होते की त्याला भाऊ आहेत, आणि त्याला माहीत होते की ते अविश्वासणारे आहेत. तसेच, काही लोक प्रकटीकरण 6:10चा पुरावा म्हणून उपयोग करतातः संकटकाळातील ख्रिस्तसाक्षी अथवा हुतात्मे देवास त्यांच्या मृत्यूंचा सूड उगविण्यासाठी हाक मारतात. पुन्हा, हा परिच्छेद ख्रिस्तसाक्षी पृथ्वीवरील लोकांस पाहू शकतात याविषयी काहीही म्हणत नाही; हा उतारा फक्त असे म्हणतो की त्यांस माहीत होते की ते न्यायास पात्र होते आणि प्रभूने कार्यवाही करावी अशी त्यांची इच्छा होती.
बायबल निश्चितपणे असे म्हणत नाही की स्वर्गातील लोक आमच्याकडे पाहू शकत नाहीत, म्हणून आपण कट्टर मत मांडू शकत नाही. तथापि, त्यांस असे करता येते हे अशक्य आहे. स्वर्गातील लोक शक्यतः इतर गोष्टींत व्यस्त असतील जसे देवाची उपासना करणे आणि स्वर्गातील गौरवमय गोष्टींचा आनंद उपभोगणे.
स्वर्गातील लोकांस खाली पाहता येते किंवा नाही आणि ते आम्हास पाहू शकतात किंवा नाही, आम्ही त्यांच्यासाठी आमची धाव धावत नाही. आम्ही त्यांच्या मान्यतेची अथवा त्यांचे कौतुक ऐकण्याची आशा धरीत नाही इब्री लोकांस पत्र 12:2 आमचे लक्ष योग्य ठिकाणी लावते : "आपल्या विश्वासाचा उत्पादक, व पूर्ण करणारा येशू ख्रिस्त ह्याच्याकडे पाहत राहावे." येशू आमची धन्य आशा आहे, आणखी कोणी नाही (तीताला पत्र 2:13). ड
English
स्वर्गातील लोक खाली पाहू शकतात काय आणि आम्हापैकी जे अद्याप पृथ्वीवर आहेत त्यांस पाहू शकतात काय?