प्रश्नः
प्रार्थना करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?
उत्तरः
उभे राहून, खाली बसून, गुडघे टेकून किंवा खाली वाकून प्रार्थना करणे उत्तम आहे काय? आपले हात खुले, बंद किंवा देवाकडे वर असले पाहिजेत काय? चर्च इमारतीमध्ये किंवा बाहेर निसर्गामध्ये प्रार्थना करणे अधिक चांगले आहे काय? आपण सकाळी उठल्यानंतर प्रार्थना करावी कि रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना करावी? असे कोणते शब्द आहेत जे आपण प्रार्थनेमध्ये उच्चारले पाहिजेत? आपण आपल्या प्रार्थना कशा सुरू करतो? प्रार्थना समाप्त करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? हे आणि इतर प्रश्न सामान्यपणे प्रार्थनेविषयी विचारले जातात. प्रार्थना करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? वरीलपैकी कोणतीही गोष्ट महत्त्वाची आहे का?
पुष्कळ वेळा, प्रार्थनेला "जादूचे सूत्र" म्हणून पाहिले जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे कि, प्रार्थनेत जर आपण योग्य गोष्टी बोललो नाही, किंवा योग्य पद्धतीने प्रार्थना केली नाही तर देव आपली प्रार्थना ऐकणार नाही व त्याचे उत्तर देणार नाही. हे पूर्णपणे अपवित्र शास्त्रीय आहे. आपण प्रार्थना केंव्हा करतो, कुठे करतो, आपल्या शरीराची स्थिती कशी आहे, किंवा प्रार्थनेतील आपला शब्द क्रम कसा आहे याआधारित देव आपल्या प्रार्थनांचे उत्तर देत नाही. 1 योहान 5: 14-15 मध्ये आपणास सांगण्यात आले आहे कि, त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. त्याचप्रमाणे योहान 14:13-14 असे घोषित करते कि, “पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन”. या आणि इतर अनेक वचनांवरून, देव आपल्या प्रार्थना विनंत्याचे उत्तर हे त्या विनंत्या त्याच्या इच्छेनुसार आहेत काय व त्या येशूच्या नावाने केलेल्या आहेत काय (येशूला गौरव देण्यासाठी) यावर आधारित आहेत काय हे पाहून उत्तर देतो.
तर, प्रार्थना करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? फिलिप्पैकरांस पत्र 4:6-7 आपणाला चिंता न करता प्रार्थना करण्यास, प्रत्येक गोष्टीबद्दल प्रार्थना करण्यास आणि आभार प्रदर्शनाची प्रार्थना करण्यास सांगते. देव अशा सर्व प्रार्थनेचे उत्तर आपल्या अंत:करणात त्याच्या शांतीने देतो. प्रार्थनेचा योग्य मार्ग म्हणजे आपली अंतःकरणे देवाकडे ओतणे म्हणजे देवाबरोबर ईमानदार व मोकळे होणे कारण आपण स्वतःला जाणतो त्याहून अधिक तो आपल्याला जाणतो आहे. आपल्यासाठी काय उत्तम आहे हे देव जाणतो आणि त्याच्या इच्छेबाहेरील कोणतीही प्रार्थना विनंती तो स्वीकार करणार नाही या गोष्टी लक्षात ठेऊन आपण आमच्या विनंत्या देवाला सादर केल्या पाहिजेत. योग्य शब्दांची काळजी न करता आपण प्रार्थनेमध्ये आपले प्रेम, आभार आणि देवाची आराधना व्यक्त केली पाहिजे. देवाला शब्द मांडणीपेक्षा आपल्या अंत:करणातील मजकुरात अधिक रस आहे.
पवित्र शास्त्रातील सर्वात जवळचा प्रार्थनेचा “नमुना” म्हणजे मत्तय 6:9-13 मधील प्रभूंनी शिकवलेली प्रर्थना होय. कृपया समजून घ्या की प्रभूंनी शिकवलेली प्रर्थना ही आम्ही पाठ करून म्हणून दाखविण्याची प्रार्थना नाही. प्रार्थनेमध्ये आराधना, देवावरील विश्वास, विनंत्या, अंगीकार, आणि समर्पण इत्यादी बाबी समाविष्ट करण्याचे हे एक उदाहरण आहे. प्रभूची प्रार्थना ज्या गोष्टींबद्दल बोलत आहे त्यांच्यासाठी आपण आपले स्वतःचे शब्द वापरुन आणि देवासोबतच्या आपला प्रवास "सानुकूलित" करून प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना करण्याचा योग्य मार्ग म्हणजे आपली अंतःकरणे देवाकडे व्यक्त करणे होय. बसून, उभाराहून किंवा गुडघे टेकून; हात मोकले ठेऊन किंवा बांधलेले, डोळे उघडले किंवा बंद; चर्चमध्ये, घरामध्ये किंवा बाहेर; सकाळी किंवा रात्री- या सर्व इतर बाजू आहेत ज्या वैयक्तिक पसंती, विश्वास, आणि उचिततेशी आधारित आहेत. प्रार्थना हि वास्तविक असून त्याच्या आणि आपल्या वैयक्तिक संबंधातून असावी हि देवाची प्रार्थने विषयी इच्छा आहे.
English
प्रार्थना करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?