settings icon
share icon
प्रश्नः

तत्वीय एकता म्हणजे काय? येशू एकाच वेळी परमेश्वर आणि मानव कसा असू शकतो?

उत्तरः


हायपोस्टॅटिक यूनियन म्हणजे तत्वीय एकता हा शब्द देव पुत्र, येशू ख्रिस्ताने, मानव स्वभाव कसा धारण केला, परंतु त्याच वेळी तो पूर्णपणे देवच कसा राहिला याचे वर्णन करतो. येशू नेहमी देव होता (योहान8:58, 10:30), पण देहावतारात येशू मनुष्य झाला (योहान 1:14). दैवी स्वभावामध्ये मानवी स्वभावाची जोड म्हणजे येशू, देव-मनुष्य. ही तत्वीय एकता आहे, येशू ख्रिस्त, एक व्यक्ती, पूर्णपणे देव आणि पूर्णपणे मनुष्य आहे.

येशूचे दोन स्वभाव मानवी आणि ईश्वरीय किंवा दिव्य अविभाज्य आहेत. येशू सदैव देव-मानव, पूर्णपणे देव आणि पूर्णपणे मानव, एका व्यक्तींमध्ये दोन स्पष्ट स्वभाव असेल. येशूची मानवता आणि देवत्व एकत्र मिश्रित नाहीत, परंतु वेगळ्या ओळखीस हानि न करता एकजूट आहेत. येशूने कधीकधी मानवाच्या मर्यादेत कार्य केले (योहान 4:6; 19:28) आणि इतर वेळी त्याच्या ईश्वरत्वाच्या सामर्थ्याने कार्य केले (योहान 11:43; मत्तय 14:18-21) दोन्हीमध्ये, येशूच्या कृती त्याच्या एका व्यक्तीकडूनच झाल्या. येशूचे दोन स्वभाव होते, परंतु केवळ एक व्यक्तिमत्व.

हायपोस्टॅटिक युनियन म्हणजे एक तत्व एक सारचा सिद्धांत येशू एकाच वेळी देव आणि मनुष्य दोघे कसा असू शकतो हे स्पष्ट करण्याचा एक प्रयत्न आहे. शेवटी हा एक सिद्धांत आहे जो आपण पूर्णपणे समजण्यास असमर्थ आहोत. देव कसे कार्य करतो हे आपल्याला पूर्णपणे समजणे अशक्य आहे. आपण, सीमित बुद्धीचे मानव म्हणून अनंत देवास पूर्णपणे जाणून घेण्याची अपेक्षा करू नये. येशू हा पवित्र आत्म्याने गर्भात आला या दृष्टीने देवाचा पुत्र आहे (लूक 1:35)). परंतु याचा अर्थ असा नाही की येशू गर्भात येण्यापूर्वी अस्तित्वात नव्हता. येशू नेहमीच अस्तित्वात आहे (योहान 8:58, 10:30). जेव्हा येशू गर्भात आला, तेव्हा तो देव होण्याबरोबरच मनुष्य झाला (योहान 1:1,14).

येशू देव आणि मनुष्य दोन्ही आहे. येशू नेहमीच देव आहे, परंतु मरीयेच्या गर्भात येईपर्यंत तो मनुष्य झाला नाही. आमच्या संघर्षांमध्ये (इब्री 2:17), आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या पापांसाठी दंड भरण्यासाठी तो वधस्तंभावर मरणे शक्य व्हावे यासाठी तो मनुष्य मनुष्य बनला (फिलिप्पै 2:5-11). सारांश रूपात, तत्वीय एकता शिकवते की येशू पूर्णपणे मानव आणि पूर्णपणे परमेश्वर आहे, की कोणत्याही स्वभावाचे कुठल्याही प्रकारचे मिश्रण किंवा त्या स्वभावास सौम्य करून कमी तीव्र केलेले नाही आणि तो सदैव एक संयुक्त व्यक्ती आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

तत्वीय एकता म्हणजे काय? येशू एकाच वेळी परमेश्वर आणि मानव कसा असू शकतो?
© Copyright Got Questions Ministries