प्रश्नः
बुद्धिवान आकृतीबंधाचा सिद्धांत काय आहे?
उत्तरः
बुद्धिवान आकृतीबंधाचा सिद्धांत म्हणतो की जीवशास्त्राची क्लिष्ट, माहीतीसंपन्न रचना समजाविण्यासाठी मतिमान कारणे जरूरी असतात आणि ही कारणे अनुभवजन्य रीतिने लक्षात येण्याजोगी असतात. जीवशास्त्राची काही वैशिष्ट्ये डार्विनच्या मानक अनियत-योगाच्या म्हणजे रॅन्डम-चान्सच्या स्पष्टीकरणाचे खंडन करतात, कारण ते अभिकल्पित असल्याचे दिसून येते. अभिकल्पना अथवा योजनेसाठी तार्किकदृष्ट्या एका बुद्धिमान रचनाकाराची गरज भासते, अभिकल्पनेचा देखावा रचनाकारासाठी पुरावा असतो. बुद्धिवान आकृतीबंधाच्या सिद्धांताचे तीन मुख्य वाद आहेत: 1) अनिवर्तनीय क्लिष्टता, 2) निर्देशित क्लिष्टता, आणि 3) मानवनिर्मित तत्व.
अनिवर्तनीय क्लिष्टतेची व्याख्या अशी करता येते "...एकल प्रणाली जी अनेक सुसंगत अन्योन्य भागांनी बनलेली आहे जी मूळ कार्यात मदत करते, ज्यात कोणत्याही एका भागास दूर केल्यास ती प्रणाली परिणामकारकरित्या कार्य करणे बंद करते." सोप्या शब्दांत, जीवन परस्परसंबद्ध भागांनी बनलेले आहे जे उपयोगी ठरण्यासाठी एकमेकावर आधारित आहे. इतस्ततः उत्परिवर्तन नवीन भागाच्या विकासाचे कारण होऊ शकते, पण ते क्रियाशील यंत्रणेसाठी आवश्यक विभिन्न भागांच्या एक संपाती विकासाचे कारण ठरू शकत नाही. उदाहरणार्थ, मनुष्याचा डोळा हा स्पष्टपणे अत्यंत उपयोगी यंत्रणा आहे. बुबुळ, डोळ्याचे मज्जातंतू, आणि दृष्टीची मध्यत्वचा यावाचून अहेतूपूर्वक अपूर्ण डोळा एखाद्या प्रजातीच्या अस्तित्वासाठी परिणामकारक नसेल आणि त्यामुळे नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतून बाहेर काढला जाईल. जोपर्यंत डोळ्याचे सर्व भाग अस्तित्वात नसतील आणि त्याचवेळी योग्यरित्या कार्य करीत नसतील तोपर्यंत डोळा एक उपयुक्त यंत्रणा नाही.
स्पेसिफाईड कॉम्प्लेक्सिटी अर्थात विनिर्दिष्ट व्यामिश्रता ही अशी संकल्पना आहे की, जीवांमध्ये विशिष्ट गुंतागुंतीचे नमूने आढळून येतात, त्यामुळे कुठल्या तरी स्वरूपाचे मार्गदर्शन त्यांच्या मूळाचे कारण ठरले असावे. स्पेसिफाईड कॉम्प्लेक्सिटी अर्थात विनिर्दिष्ट व्यामिश्रता म्हणते की यादृच्छिक प्रक्रियेद्वारे जटिल नमुन्यांचे विकसित होणे अशक्य आहे. उदाहरणार्थ, 100 वानरांनी आणि 100 कम्पुटरने भरलेली एक खोली अखेरीस काही शब्द तयार करू शकते, किंवा कदाचित एखादे वाक्यही, परंतु ते शेक्सपियरच्या नाटकाची निर्मिती कधीही करणार नाही. आणि शेक्सपियरच्या नाटकापेक्षा जैविक जीवन किती अधिक जटिल आहे?
मानववंशीय तत्त्व असे सांगते की पृथ्वीवरील जीवनास वाव देण्यासाठी जग आणि विश्व यांत "थोडे फेरबदल" करण्यात आले आहेत. जर पृथ्वीच्या हवेमधील घटकांचे गुणोत्तर प्रमाण किंचित बदलले तर अनेक प्रजातींचे अस्तित्व लगेच संपुष्टात येईल. सूर्यापासून पृथ्वी काही मैलांच्या जवळ किंवा पुढे असती, तर अनेक प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले असते. पृथ्वीवरील जीवनाचे अस्तित्व आणि विकास यासाठी अनेक चलांचे पूर्ण स्वरसाम्य असणे इतके जरूरी आहे की सर्व चल अनियत, असंघटित घटनांद्वारे अस्तित्वात येणे शक्य नाही.
इंटेलिजंट डिझाईन थिअरी बुद्धिमत्तेचा स्रोत (मग तो देव असो किंवा यूएफओ असो किंवा अन्य काही असो) ओळखत असल्याचे मानत नाही, तर बहुसंख्य बुद्धिमान डिझाईन थिओरिस्ट देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे आहेत. ते देवाच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून जैविक जगामध्ये व्याप्त असलेल्या डिझाइनचा देखावा पाहतात. तथापि, काही नास्तिक आहेत, जे डिझाइनचे मजबूत पुरावे नाकारू शकत नाहीत, परंतु ते निर्माणकर्ता देवास कबूल करण्यास तयार नाहीत. ते त्या माहितीचा अर्थ हा पुरावा म्हणून लावतात की काही वेगळ्या अलौकिक प्राण्यांच्या (एलियन) कुशल वंशाच्याद्वारे पृथ्वीची वाढ झाली. अर्थात, ते एलियनचे मूळ काय आहे ते सुद्धा सांगत नाहीत, त्यामुळे ते मूळ तर्कवितर्कांकडे परत येतात ज्यात कोणतेही विश्वासार्ह उत्तर नाही.
बुद्धिवान आकृतीबंधाचा सिद्धांत बायबलवर आधारित उत्पत्तीरचनेशी संबंधित नाही. दोन्ही मतांत एक महत्वाचा फरक आहे. बायबल उत्पत्ती अभ्यासक ह्या निष्कर्षाने सुरुवात करतात की सृष्टीरचनेविषयीचा बायबलमधील वृतांत विश्वासार्ह आणि अचूक आहे, की पृथ्वीवरील जीवन एका बुद्धिमान अभिकत्र्याने — परमेश्वराने तयार केले आहे. त्यानंतर ते या निष्कर्षास समर्थन करण्यासाठी नैसर्गिक क्षेत्रातील पुराव्यांचा शोध घेतात. बुद्धिवान आकृतीबंधाचा सिद्धांत मांडणारे सिद्धांतिक नैसर्गिक क्षेत्रापासून प्रारंभ करतात आणि या निष्कर्षापर्यंत पोहोचतात की पृथ्वीवरील जीवन एका बुद्धिमान अभिकत्र्याद्वारे (तो जो कोणी का असेना) घडविण्यात आले होते.
English
बुद्धिवान आकृतीबंधाचा सिद्धांत काय आहे?